Headlines

Nashik News: नाशिकमध्ये आता काविळीचा प्रकोप; एकाच इमारतीत सहा संशयित रुग्ण, महापालिकेकडून 1276 घरांचे सर्वेक्षण – jaundice outbreak in nashik six suspected cases in single building municipality surveys 1276 homes


Nashik News: विभागाने संबंधित परिसरात घरोघरी सर्वेक्षण सुरू केले असून, आतापर्यंत १,२७६ घरांतील ६ हजार ५८३ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.

Anderson Phillip Catch - 2026-08-26T081120
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: नाशिकमध्ये साथीच्या आजारांनी डोके वर काढले असून, स्वाइन फ्लू, डेंग्यूपाठोपाठ आता कावीळसदृश्य आजाराचे रुग्ण वाढत चालले आहेत. सातपूर परिसरातील सावरकरनगर भागात एका इमारतीत कावीळसदृश रुग्ण आढळून आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. विभागाने संबंधित परिसरात घरोघरी सर्वेक्षण सुरू केले असून, आतापर्यंत १,२७६ घरांतील ६ हजार ५८३ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.

शहरात सतंतधार पावसामुळे नाशिकमध्ये साथीचे आजार बळावत आहेत. शहरात स्वाइन फ्लूमुळे पाच बळी गेले असून, डेंग्यू संशयीत एका रुग्णाचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर गेली असतांनाच, आता काविळीनेही डोके वर काढले आहे. शहरात तापसदृश्य आजाराचे रुग्ण वाढल्यानंतर महापालिकेने सर्वेक्षण सुरू केले आहे.

Dada Bhuse | अभिजीत दिपकेंचं शाळांच्या दुरावस्थेवरून आंदोलन, सरकारला धसका? भुसे काय म्हणाले?

सर्वेक्षणादरम्यान एका इमारतीत कावीळसदृश आजाराचे सहा रुग्ण आढळले आहेत. या सहाही संशयित रुग्णांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून, ते पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. परिसरात आरोग्य विभागाच्या पथकाकडून सर्वेक्षण व आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत. विषाणूजन्य आजारांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

Maharashtra TimesNashik News: ‘नासाका’ पुन्हा वाऱ्यावर; संचालन करणाऱ्या पुण्याच्या कंपनीने गुंडाळला गाशा, जप्तीचीही नामुष्कीकाविळीचे खापर दूषित पाण्यावर

रुग्ण आढळलेल्या इमारतीच्या पाण्याच्या टाकीजवळ जुनी ड्रेनेज पाइपलाइन आढळून आली. त्यामुळे ड्रेनेजचे पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळत असल्याची शक्यता वैद्यकीय विभागाने व्यक्त केली आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने संबंधित पाण्याची टाकी तसेच संशयित रुग्णांच्या घरांमधील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले. प्राप्त अहवालानुसार महापालिकेच्या नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा पिण्यास योग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित इमारतीतील पाण्याची टाकी दुरुस्त होईपर्यंत तिचे पाणी पिण्यासाठी वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. टाकीचे कनेक्शन बंद करून महापालिकेच्या नळाद्वारे उपलब्ध होणारे पाणी वापरण्याच्या सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा