Headlines

Nashik NCP Corporator Dr Hemlata Patil stops Smart City Optical Fibre work after Concrete Road Demolished; चार महिन्यांपूर्वी बांधलेला रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला, नाशिक महापालिका राष्ट्रवादी नगरसेविका डॉ हेमलता पाटील यांचा संताप, काम बंद पाडत जाब विचारला


Nashik News : महापालिकेच्या परवानगीशिवाय रस्ते फोडू नयेत, असे निर्देश दिले असताना चार महिन्यांपूर्वी तयार केलेला सिमेंटचा रस्ता स्मार्ट सिटी कंपनीने ऑप्टिकल फायबर केबलसाठी फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी रस्ता खोदण्याचे काम तत्काळ बंद पाडत अधिकाऱ्यांना जाब विचारला.

Nashik Hemlata Patil Maharashtra Times
हेमलता पाटील(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी आणि ‘एमएनजीएल’वर नाशिक शहरातील खड्डे आणि रस्त्यांच्या दुरवस्थेचा ठपका ठेवल्यानंतरही या दोन्ही कंपन्यांची मुजोरी कायम आहे. चार महिन्यांपूर्वी काँक्रिटीकरण झालेला सीबीएस ते कॅनडा कॉर्नर हा नवाकोरा रस्ता स्मार्ट सिटीने ‘ऑप्टिकल फायबर केबल’साठी पुन्हा फोडल्याचे समोर आले आहे. नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी रस्ता खोदण्याचे काम तत्काळ बंद पाडत, अधिकाऱ्यांना जाब विचारला. या प्रकाराने, ‘विकासकामे नेमकी कोणासाठी आणि कुणाच्या नियोजनाने?’ असा सवाल उपस्थित होत आहे.

स्मार्ट सिटी कंपनीने सिमेंटचा रस्ता फोडला

पावसामुळे नाशिक शहरातील रस्त्यांची चाळण झाल्यानंतर शनिवारी (दि. ८) महासभेत या स्थितीला स्मार्ट सिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’ला जबाबदार धरण्यात आले. तसेच ठेकेदारांवर दंडात्मक कारवाईचे निर्देश महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी दिले आहेत. महापालिकेच्या परवानगीशिवाय रस्ते फोडू नयेत, असे निर्देश दिले असताना महासभेला दोन दिवस उलटत नाहीत तोच, स्मार्ट सिटी कंपनीने ऑप्टिकल फायबर केबलसाठी चार महिन्यांपूर्वी तयार केलेला सिमेंटचा रस्ता फोडल्याचा प्रकार समोर आला आहे.

डॉ हेमलता पाटील आक्रमक

कुलकर्णी गार्डन येथे सदर केबल टाकण्यासाठी सिमेंटच्या रस्त्याची तोडफोड सुरू असताना नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी धाव घेत काम थांबवले. धक्कादायक बाब म्हणजे काम सुरू असताना घटनास्थळी स्मार्ट सिटी अथवा महापालिकेचा एकही अभियंता उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले. कामगार धुळ्याहून आले असल्याची माहितीही समोर आली आहे. संबंधित ठेकेदार फिरोज यांच्याशी संपर्क साधला असता ते देवळाली येथे असल्याचे सांगण्यात आले आणि स्मार्ट सिटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी चेंबर करण्याचे काम सुरु असल्याची माहिती मिळाल्याचं डॉ हेमलता पाटील यांनी सांगितलं.

Maharashtra TimesCrime News : 19 वर्षीय प्रेयसीचा जीव घेतला, 20 वर्षीय प्रियकराला पळून जाताना विमानतळावर अटक, रिलेशनमध्ये असताना अत्याचाराचा संशय

डॉ. हेमलता पाटील यांचे स्मार्ट सिटीला प्रश्न

-रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यापूर्वी सीसीटीव्ही चेंबर, केबल आणि अन्य सुविधांचे नियोजन का झाले नाही?
-स्मार्ट सिटी आणि महापालिका यांच्यात समन्वयाचा पूर्ण अभाव आहे का ?
-चार महिन्यांतच नव्याने केलेला रस्ता फोडण्याची वेळ का आली ?
-पुन्हा रस्ता दुरुस्त करण्याचा खर्च नागरिकांच्या खिशातूनच जाणार का?

विकासकामांना आमचा विरोध नाही

या प्रकरणाची तातडीने चौकशी करून रस्ता फोडण्यासंदर्भातील परवानग्या तपासाव्यात. लेखी परवानगीशिवाय काम तातडीने थांबवावे आणि फोडलेला काँक्रीट रस्ता दर्जेदार पद्धतीने पूर्ववत करावा, अशी मागणी डॉ. हेमलता पाटील यांनी केली. विकासकामांना आमचा विरोध नाही; पण विकासाच्या नावाखाली नियोजनशून्य कामांना आणि नागरिकांच्या पैशांच्या अपव्ययाला नक्कीच विरोध आहे, असं हेमलता यांनी स्पष्ट केलं.

कोण आहेत डॉ हेमलता पाटील?

डॉ हेमलता पाटील या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आहेत. त्यांच्याकडे सध्या पक्षाच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी आहे. नाशिक महापालिकेत प्रभाग क्रमांक १२ येथून त्या नगरसेविका आहेत. याआधी काँग्रेसमध्ये कार्यरत असलेल्या हेमलता पाटील यांनी दिवंगत अजित पवार यांच्या निधनापूर्वी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले होते.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सही शिक्क्यांचा गैरवापर करून कोणीतरी बनावट पत्र बनवले आणि मला गटनेते पदापासून रोखले गेले, असा गंभीर आरोप नाशिक महापालिका निवडणुकांनंतर डॉ. हेमलता पाटील यांनी केला होता. अजित दादांनी आपल्याला शब्द दिला असताना सीमा ठाकरे गटनेत्या कशा झाल्या, असा सवाल उपस्थित करत डॉ हेमलता पाटील यांनी खंत व्यक्त केली होती.

Maharashtra TimesPune News : दुचाकीवरुन पडल्याने हात फ्रॅक्चर, ऑपरेशनवेळी पुण्यात 28 वर्षीय विवाहितेचा मृत्यू, डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोपनाशिक महापालिकेसाठी जानेवारी २०२६ मध्ये झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची एकहाती स्पष्ट सत्ता आली आहे. एकूण १२२ जागांपैकी भाजपने ७२ जागा जिंकून बहुमत मिळवले आहे.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा