Nashik Married Woman Rupali Patil Dies in Resort Boyfriend kills over Affair posing Car Accident Crime News; नाशिकमधील 34 वर्षीय विवाहितेच्या मृत्यू प्रकरणाला वळण, दोन वर्षांचे प्रेमसंबंध, रिसॉर्टवर 43 वर्षीय प्रियकराने जीव घेतला
Nashik Married Woman Rupali Patil Dies in Resort Boyfriend kills over Affair posing Car Accident Crime News; नाशिकमधील 34 वर्षीय विवाहितेच्या मृत्यू प्रकरणाला वळण, दोन वर्षांचे प्रेमसंबंध, रिसॉर्टवर 43 वर्षीय प्रियकराने जीव घेतला
Nashik Rupali Patil Murder : ३४ वर्षीय रुपाली पाटील यांचे ४३ वर्षीय दीपकसोबत गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. रिसॉर्टमध्ये पोहोचल्यानंतर दोघांमध्ये आधी वाद झाला. त्यानंतर रूपाली कारमधून उतरून रिसॉर्टच्या गेटकडे जात असताना दीपकने डाव साधला
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. वृत्तसेवा, सिडको, नाशिक : वाडीवऱ्हे परिसरातील सांजेगाव येथील मिरची हॉटेल-रिसॉर्टच्या प्रवेशद्वाराजवळ झालेल्या ३४ वर्षीय रूपाली पाटील यांच्या मृत्यूचे गूढ अखेर उलगडले आहे. सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या घटनेमागे प्रेमसंबंधातून झालेला खूनाचा प्रकार असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. मित्राचे नियंत्रण सुटल्याने कार प्रवेशद्वाराला धडकली आणि वाहनाच्या खाली येऊन रुपाली यांचा मृत्यू झाला, असा सुरुवातीला संशय होता.
संशयित प्रियकराला अटक
रूपाली यांच्याशी वाद झाल्यानंतर संशयित दीपक सैंदाणे याने कारने पाठीमागून धडक देऊन त्यांचा जीव घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात अपघातासह खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित दीपक शिवाजी सैंदाणे याला अटक करण्यात आली आहे.
कारमध्येच संशयिताचे मद्यपान
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रूपाली नीलेश पाटील (३४, रा. शिवनारायण अपार्टमेंट, एकदंतनगर, अंबड, नाशिक) या सिडको परिसरातील एका डायग्नोस्टिक सेंटरमध्ये कार्यरत होत्या. कंपनीच्या कामानिमित्त मित्र तथा प्रियकर दीपक सैंदाणे (४३, रा. अंबड) याच्यासोबत कारने वाडीवऱ्हे परिसरात गेल्या होत्या. दोघे सांजेगाव येथील एका रिसॉर्टमध्ये जेवणासाठी गेले. त्यापूर्वी कारमधून फिरत असताना दीपकने कारमध्येच मद्यपान केल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
दोन वर्षांपासून प्रेमसंबंध, चौकशीत गुन्ह्याची कबुली
रिसॉर्टमध्ये पोहोचल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे झटापटीत रूपांतर झाले. त्यानंतर रूपाली कारमधून उतरून रिसॉर्टच्या प्रवेशद्वाराकडे जात असताना दीपकने कार पाठीमागून वेगाने नेत त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या रूपाली यांचा मृत्यू झाला. रुपाली पाटील यांच्या पश्चात पती, सात वर्षांची मुलगी आणि सासू-सासरे असा परिवार आहे. या घटनेची माहिती सिडको परिसरात पसरताच खळबळ उडाली.
घटनेनंतर हा प्रकार प्रथमदर्शनी अपघात असल्याचे भासत होते. मात्र, परिस्थिती संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी दीपकला तत्काळ ताब्यात घेतले. कसून चौकशीत रूपाली आणि आपले मागील दोन वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याची कबुली त्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा