Headlines

Nashik heavy Rain Red Alert Godavari Flood Video of Snake on River; वाहत्या पाण्यात वर चढण्याचा प्रयत्न, सौम्य लाटांमुळे वारंवार मेहनत, नाशिकच्या गोदा नदीत महादेवाच्या भेटीला नागराजा; मनमोहक Video


Nashik Heavy Rain Godavari River Snake Video : पुढील काही तासात नाशिक जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज पडण्याची शक्यता असून हवामान विभागाने नाशिक (Nashik Rain) जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला आहे.

Nashik Heavy Rain Godavari River Snake Video
नाशिक गोदावरी गोदावरी साप व्हिडिओ(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नाशिक : नाशिक ते त्र्यंबकेश्वरदरम्यान आज, मंगळवारी (दि. ७) ढगफुटीचा अंदाज वर्तविण्यात आला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाला सतर्कतेचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर शहरासह नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ आणि दिंडोरी तालुक्यांमधील शाळा, महाविद्यालये, आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सोमवारी जारी केले. सोमवारी रात्रीपासून बुधवारी सकाळी नऊपर्यंत त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिर आणि सप्तश्रृंगी गडावरील मंदिरही भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नका, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

‘महादेवाच्या भेटीला साक्षात नागराजा’

नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. पहाटेपासून पाऊस सुरु आहे. शहराची मुख्य नदी म्हणून ओळख असलेल्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नदी काठच्या नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगावी, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. रामकुंड, गोदाघाट परिसरात महापालिकेकडून सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचदरम्यान, नाशिकमधील गोदाकाठावरचा एका सापाचा सुंदर व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. वाहत्या पाण्यातून तो सर चढण्याचा प्रयत्न करतोय पण, वारंवार येणाऱ्या सौम्य लाटांमुळे तो पुन्हा आत ओढला जात असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ बघून भाविक सांगताय की, ‘महादेवाच्या भेटीला साक्षात नागराज आले आहेत’.

Maharashtra TimesMumbai High Court : ‘सापत्न वागणूक देणे अस्वीकारार्ह’; निवृत्त कर्मचाऱ्यांबाबत उच्च न्यायालयाने ‘बेस्ट’ला खडसावले, नेमकं प्रकरण काय?

शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

दरम्यान, मेटघर किल्ला परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. आज नाशिक जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर त्रंबकेश्वर आणि साडेतीन शक्ती पिठापैकी एक असणारे सप्तशृंगी मंदिर आज बंद राहणार आहे. यासोबतच नदीकाठच्या गावांना ही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. परिणामी आवश्यकता नसल्यास नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, इगतपुरीसह नाशिकमध्ये पावसाचा जोर वाढत असल्याने नांदूर मध्यमेश्वर बांधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. रात्री 1 वाजेपासून 1 हजार 614 वरून 3 हजार 228 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
Maharashtra TimesTukraram Mundhe : तुकाराम मुंढे स्वतः याच्या गाडीवर चायनिज खातात; मराठी नाटकाला ताज्या घडामोडींचा संदर्भ, निखिल चव्हाणचा डायलॉग चर्चेत

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा