Nashik Crime: प्रकरणातील संशयितांवर रुग्णालयात मृत तरुणाच्या नातेवाइकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत परिस्थिती नियंत्रणात आणली.

मृत तरुणाचे वडील मोतीराम एकनाथ चौरे यांनी याप्रकरणी कळवण पोलिसांत फिर्याद दिली आहे. तालुक्यातील नरुळ येथील सचिन मोतीराम चौरे ( वय २५ ) याचे आठ वर्षांपासून आठंबे येथील एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. या संबंधांची माहिती दोन्ही कुटुंबीयांना होती. त्यामुळे दोन्ही कुटुंबीयांच्या सहमतीने रविवारी ( दि. १४ ) तरुणीच्या वडिलांनी तिला कन्हेरवाडी येथे सचिनच्या बहिणीच्या घरी पाठवून दिले होते.
Nashik Accident: बाप-लेकीची पहिली अन् शेवटची भेट; गावी सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघातात करुण अंत, अख्खं गाव हळहळलं
दरम्यान, सोमवारी मुलीचे चुलत भाऊ योगेश मोहन बागूल (वय २३), प्रकाश मोहन बागूल (वय २५) रा. साकोरेपाडा तसेच मुलीचा मेहुणा संदीप पवार (वय ३७) रा. चणकापूर यांनी या प्रेमप्रकरणाचा राग मनात धरून कन्हेरवाडी येथे सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास पोहोचत सचिनवर तीक्ष्ण हत्याराने छातीवर वार केला. या हल्ल्यात सचिनचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेनंतर सचिनच्या नातेवाइकांनी आरडाओरड केल्याने गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत तिन्ही संशयित आरोपींना पकडून चोप देत कळवण पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी कळवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Nashik Accident: भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार दाम्पत्याचा मृत्यू; नाशिक-पुणे महामार्गावरील घटना
संशयितांवर हल्ल्याचा प्रयत्न
संशयित आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले असता सचिनच्या संतप्त नातेवाइकांनी संशयितांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत परिस्थिती नियंत्रणात आणली व संशयितांची सुरक्षितपणे ठाण्यात रवानगी केली.

