Headlines

Nashik Ashadhi Ekadashi Wari Sant Nivruttinath Maharaj Palkhi Road from Trimbak to Nashik is Open on Right Side; 29 जूनला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचं पंढरीच्या दिशेने प्रस्थान, त्याआधी जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय; असा असेल पालखीचा मार्ग


Nashik Nivruttinath Maharaj Palkhi Ceremony : ‘ग्रामविकास विभागातर्फे आषाढी पालखी सोहळ्यासाठी मागील वर्षीपासून निधीची तरतूद करण्यात येत आहे. यंदाच्या पालखी सोहळ्यासाठी ७६ कोटी रुपयांना मान्यता देण्यात आली आहे,’ अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी शुक्रवारी दिली. ‘आषाढी वारीमध्ये एकाही वारकऱ्याला असुविधेचा सामना करावा लागणार नाही, अशा दृष्टीने सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून पालखी सोहळ्याचे नियोजन करावे,’ अशी सूचना त्यांनी दिली.

Nashik Nivruttinath Maharaj Palkhi Ceremony
निवृत्तीनाथ महाराज पालखी त्र्यंबक ते नाशिक उजवी बाजू खुली(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.प्रतिनिधी, नाशिक : संत निवृत्तीनाथ महाराज यांची आषाढ वारी पालखी २९ जून रोजी त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. या पार्श्वभूमीवर दिंडी सोहळ्यासाठी त्र्यंबक ते नाशिकपर्यंतचा रस्ता वारकऱ्यांना उजव्या बाजूने खुला करुन देण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे पालखी मार्ग सुखकर होईल, असा आशावाद वारकरी भाविक व संत निवृत्तीनाथ महाराज ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

पालखीसाठी उजवी बाजू खुली

त्र्यंबक ते नाशिक पायी पालखी सोहळा मार्ग पाहणी दौरा विविध विभागातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाला. हा मार्ग वारकऱ्यांसह इतर वाहनांसाठी गौरसोयीचा ठरत असल्याने निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानचे अध्यक्ष राहुल महाराज साळुंखे व पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यानुसार तहसीलदार गणेश जाधव, पोलिस निरीक्षक महेश कुलकर्णी, मुख्याधिकारी गोविंद जाधव व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मार्गाची पाहणी करुन दिंडी सोहळ्यासाठी मार्गाची उजवी बाजू खुली करण्याचे आश्वासन दिले.
Maharashtra TimesPune Crime : होणाऱ्या बायकोच्या बर्थडेचं सेलिब्रेशन , सोबत दोन जवळचे मित्र, लोहगडावर केतनच्या मृत्यूआधी काय घडलं? घटनाक्रम समोर
नाशिक ग्रामीण व शहरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक व पोलिस अधीक्षक डी.एस स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन बारी, सहाय्यक पोलिस आयुक्त अद्विता शिंदे आणि सातपूरचे पोलिस निरीक्षक आहेर सातपूरचे पोलिस निरीक्षक आहेर यांनी हॉटेल संस्कृती ते ‘सीबीएस’पर्यंतच्या मार्गाची पाहणी केली. या मार्गाचे काम त्वरित पूर्ण करुन तो खुला केला जाईल, अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली.

पालखी मार्गात बदल नाही

संस्थानने स्पष्ट केले की, त्र्यंबकेश्वर ते नाशिकदरम्यानच्या पायी पालखी मार्गात कोणताही बदल केलेला नाही. मार्गावर केवळ तीन ठिकाणी किरकोळ वळण असतील. रस्त्याचे काम सुरु असले, तरी वारकऱ्यांना आणि वाहतुकीला अडचण येणार नाही याची काळजी घेतली जाई.
Maharashtra TimesGirish Mahajan : महिलेसोबत कथित छायाचित्रं व्हायरल; गिरीश महाजन म्हणाले, फोटो पूर्णपणे मॉर्फ, आक्षेपार्ह काय आहे कळत नाही

…असे होईल पालखीचे प्रस्थान

त्र्यंबकेश्वर, पेगलवाडी, पिंपळगाव बहुला, सातपूक, पंचायत समिती नाशिक येथे स्वागत सोहळा

जिल्हाधिकारी कार्यालय, काजीपुरा विठ्ठल मंदिर, गणेशवाडी मनपा शाळा, द्वारका, नाशिकरोडला बिटको, मुक्तिधाम मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (नाशिकरोड विसावा)
Maharashtra TimesSatara Accident : कर्तव्यदक्ष पोलिस, पण आईसाठी धडपडताना काळाच्या तावडीत; साताऱ्यात कॉन्स्टेबलचा भीषण अपघातात मृत्यू, पत्नी गंभीर, नेमकं काय घडलं?
सिन्नरकडे मार्गक्रमण पळसे, लोणारवाडी, सिन्नर (येथे खासदार व लोकप्रतिनिधींकडून स्वागत), वावी वेस, लोंढे गल्ली, कुंडेवाडीपासून पुढे मार्गस्थ

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा