सुमारे ४.३ अब्ज डॉलर खर्चून तयार करण्यात आलेली ही दुर्बीण ‘स्पेस-एक्स’च्या शक्तिशाली ‘फाल्कन हेवी’ रॉकेटद्वारे केनेडी स्पेस सेंटरवरून प्रक्षेपित करण्यात आली. ही दुर्बीण पृथ्वीपासून सुमारे १६ लाख किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘वेब स्पेस टेलिस्कोप’जवळ स्थापित केली जाईल. तेथे पोहोचण्यासाठी तिला तीन महिन्यांचा कालावधी लागेल.
Nepal Flood: मास्तरांना कडक सॅल्यूट! महापुरासारखा काळ समोर असताना १६४३ विद्यार्थ्यांना वाचवलं, पण शेवटी आक्रित घडलं‘नासा’च्या पहिल्या मुख्य खगोलशास्त्रज्ञ स्वर्गीय नॅन्सी ग्रेसी रोमन यांच्या सन्मानार्थ या दुर्बिणीला रोमन स्पेस टेलिस्कोप असे नाव देण्यात आले असून, ‘नासा’ने महिलेचे नाव दिलेली ही पहिलीच दुर्बीण आहे. ही दुर्बीण अंतराळाचा आतापर्यंतचा सर्वांत विस्तृत दृश्यपट (फिल्ड ऑफ व्ह्यू) टिपणार आहे. तिची क्षमता हबल दुर्बिणीपेक्षा १०० पटीने जास्त असून, कार्यवेग एक हजार पटीने अधिक आहे.
रोमन दुर्बीण हजारो सुपरनोव्हा, हजारो ग्रह आणि अब्जावधी आकाशगंगा शोधून काढेल; तसेच ब्रह्मांडाचा बहुतांश भाग व्यापणाऱ्या; परंतु अदृश्य असलेल्या ‘डार्क मॅटर’ आणि ‘डार्क एनर्जी’चा अभ्यास करून अंतराळाच्या विस्ताराचा वेग समजण्यास मदत करील. यात ताऱ्यांचा प्रकाश रोखणारे ‘कोरोनाग्राफ’ हे उपकरण असल्याने अंधुक ग्रहांची थेट छायाचित्रे घेणे शक्य होणार आहे.
Nepal Flood: नेपाळमध्ये प्रलयबळी 788वर; अडीच हजारांहून अधिक बेपत्ता, शोधपथकांची कसोटीअंतराळातील गूढ उलगडणार…
– विश्वाचा विस्तार, डार्क एनर्जी, डार्क मॅटर आणि दूरच्या आकाशगंगांचा अभ्यास करणे हा उद्देश
– हबल टेलिस्कोपइतकी तीक्ष्ण प्रतिमा देण्याची क्षमता, पण आकाशाचा खूप मोठा भाग एकाच वेळी पाहू शकते
– सौरमालेबाहेरील म्हणजेच एक्सोप्लॅनेट्स शोधण्यासाठीही ही दुर्बीण महत्त्वाची ठरणार
– नासाची ही पुढील पिढीतील अवकाश दुर्बीण असून, प्रक्षेपण या दशकात अपेक्षित

