Narali Purnima Shubhechcha :नारळी पौर्णिमा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील एक सुंदर आणि महत्त्वाचा सण आहे.या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करून सुख, समृद्धी आणि सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली जाते. नारळी पौर्णिमा २०२६ निमित्त आपल्या प्रियजनांना मराठमोळ्या शुभेच्छा देऊन आनंद द्विगुणित करूया.

यंदा नारळी पौर्णिमा २०२६ निमित्त आपल्या प्रियजनांना, मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना मराठमोळ्या शुभेच्छा देण्यासाठी खास संदेश पाठवता येतील.नारळी पौर्णिमेच्या दिवशी घराघरात आनंदाचे वातावरण असते. नारळाचा नैवेद्य, पारंपरिक पूजा आणि गोडधोड पदार्थांची रेलचेल पाहायला मिळते. या सणाच्या निमित्ताने आपण आपल्या जवळच्या व्यक्तींना सुंदर शुभेच्छा देऊन त्यांच्या आयुष्यात आनंद, आरोग्य आणि समृद्धी नांदो अशी मनापासून इच्छा व्यक्त करू शकतो.(फोटो सौजन्य :- @iStock)
नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा
“लाटांवर स्वार होऊन येवो आनंद,नारळाच्या गोडव्याने वाढो प्रेमबंध,देवाच्या कृपेने दूर होवोत संकटे,सुख-समृद्धीने भरून जावोत आयुष्याचे क्षण!नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!”
नारळी पौर्णिमा शुभेच्छा मराठी
“दर्याच्या लाटांसोबत आनंदाची लहर येवो,
कष्टांना यशाची किनार लाभो,
प्रत्येक घरात सुख-समृद्धी नांदो.
सर्व कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!”
नारळी पौर्णिमा शुभेच्छा संदेश
“श्रावणाच्या सरींसोबत आनंद बरसू दे,
नारळाच्या गोडव्याप्रमाणे नाती गोड होऊ दे,
देवाच्या आशीर्वादाने प्रत्येक स्वप्न पूर्ण होऊ दे.
नारळी पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!”
नारळी पौर्णिमा WhatsApp Status
नारळाच्या गोडव्याप्रमाणे आयुष्यात प्रेम आणि आनंद वाढत जावो, समुद्राच्या लाटांप्रमाणे सुखाची बरसात होत राहो. नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
श्रावण पौर्णिमेच्या या पवित्र पर्वावर आपल्या घरात सुख-शांती, आरोग्य आणि भरभराट नांदो. नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
नारळी पौर्णिमा २०२६
“परंपरा जपूया, संस्कृती जपूया,
नात्यांमध्ये प्रेमाचा गोडवा वाढवूया.
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

