Nandurbar Photographer booked for using Drones defying Collector Dr Mittali Sethi Orders of No Fly Zone Eknath Shinde Shiv Sena Taloda Nandurbar rally; नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांचा नो फ्लाय झोन नियम धुडकावणं महागात, एकनाथ शिंदे तळोदा जाहीर सभेत फोटोग्राफर मयुर साठेवर गुन्हा
Nandurbar Photographer booked for using Drones defying Collector Dr Mittali Sethi Orders of No Fly Zone Eknath Shinde Shiv Sena Taloda Nandurbar rally; नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांचा नो फ्लाय झोन नियम धुडकावणं महागात, एकनाथ शिंदे तळोदा जाहीर सभेत फोटोग्राफर मयुर साठेवर गुन्हा
Nandurbar News : फोटोग्राफर मयुर साठे याने जिल्हाधिकारी यांची परवानगी न घेता सार्वजनिक सुरक्षितता भंग करून इतरांच्या जीवाला धोका निर्माण होईल असे कृत्य केल्याचा ठपका आहे.
फोटोग्राफरवर गुन्हा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
महेश पाटील, नंदुरबार : तळोदा येथे शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील मिल कंपाउंडमध्ये हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी हेलिपॅड बनवण्यात आला होता. त्यामुळे परिसरात ‘नो फ्लाय झोन’ घोषित करण्यात आला होता. परंतु या ठिकाणी विना परवानगी ड्रोन उडवणाऱ्या फोटोग्राफरच्या विरोधात तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहरात गुरुवार 27 नोव्हेंबर रोजी नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना उमेदवारासाठी प्रचार सभा घेण्यात आली होती. या सभेसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. शहरातील मिल कंपाउंडमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरसाठी हेलिपॅड तयार करण्यात आले होते.
जिल्हाधिकाऱ्यांची सूचना धुडकावली
उपमुख्यमंत्र्यांच्या सुरक्षिततेसाठी मिल कंपाऊंड परिसरामध्ये जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी यांनी ‘नो फ्लाय झोन’ घोषित केला होता. परंतु या आदेशांचे उल्लंघन करत फोटोग्राफर मयुर साठे याने सार्वजनिक सुरक्षितता भंग करून इतरांच्या जीवाला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने जिल्हाधिकारी यांची परवानगी न घेता या भागात ड्रोन उडवले होते.
दरम्यान, एकाच दिवसात अनेक प्रचार सभा घेण्यासाठी नेत्यांची चांगलीच धावपळ होत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गुरुवारी संगमनेरची सभा धावत पळत गाठावी लागली. प्रचाराची वेळ संपत आल्याने शिर्डी विमानतळावर उतरताच शिंदे वाहनांच्या ताफ्याच्या दिशेने धावत सुटले.
शिंदे यांच्यासोबत पोलिस आणि इतरांनाही या वेळी पळापळ करावी लागली. संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी एमआयडीसी आणि सरकारी रुग्णालयाचा प्रश्न शिंदे यांच्यासमोर मांडला होता. त्यामुळे शिंदे यांनी भाषण सुरू असतानाच उद्योगमंत्री उदय सामंत आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना फोन लावले. त्यांच्याकडून कामे लवकर मार्गी लावण्याचे आश्वासनही घेतले. Girish Mahajan : थकून घरी गेल्यावर मच्छरदाणीत बायकोसोबत झोपा, गिरीश महाजनांचा जाहीर सभेत सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही अशीच धावपळ उडाली. शुक्रवारी त्यांची कोपरगावमध्ये सभा होती. उशीर होत असल्याने हेलिकॉप्टरमधून उतरताच ते धावत सभास्थळी पोहोचले. स्वागताचे गुच्छही त्यांनी धावत धावत स्वीकारले.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा