Nanded Toshniwal Medical License Cancelled : नांदेडमध्ये अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पहिली कारवाई केली आहे. मुदतबाह्य गोळ्या विकणाऱ्या तोष्णीवाल मेडिकलचा परवाना रद्द करण्यात आला आहे.
नांदेड तोष्णीवाल मेडिकल परवाना रद्द(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अर्जुन राठोड, नांदेड : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी कारवाईचा धडाका सुरु केला आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या अनेकांवर कारवाई करत गुन्हे देखील दाखल केले जात आहेत. त्याचदरम्यान, मुदतबाह्य झालेल्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या शहरातील तोष्णीवाल मेडिकल चालकाला तुकाराम मुंडे यांनी चांगलाच दणका दिला आहे. नियमांचं उल्लंघन करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या तोष्णीवाल मेडिकलचा परवाना रद्द करण्यात आला आहे. तुकाराम मुंडेंची नांदेडमध्ये ही पहिली धडक कारवाई असून या कारवाईमुळे जिल्ह्यातील मेडिकल चालकांचे धाबे दणाणले आहेत
‘आता आमच्याकडे आलेले जे ग्राहक आहेत. ते गेल्या 10 वर्षांपासून माझे ग्राहक आहेत. यावेळी चुकून कोणीतरी मुदतबाह्य गोळ्या आम्हाला आणून दिलेल्या आहेत. त्या गोळ्या आमच्याकडे मुदतबाह्य औषधांमध्ये ठेवल्या जातील. आम्ही या गोळ्या होलसेलरला परत करत असतो. परंतु तीन महिन्यापेक्षा जास्त असेल तर तो घेत नाही. त्याच्यामुळे ती चुकून राहिली होती. नजरचुकीने ते सारखे दोन डब्बे आजूबाजूला असल्यामुळे, ते चुकून देण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे आम्ही त्यांची माफी मागतो, आणि अशी चूक पुन्हा होणार नाही. कारण मला देखील मेडिकल सुरु करुन 40 वर्ष झाले आहेत. नांदेड शहरामध्ये कुठे काही मिळत नाही, ते तोष्णीवाल मेडिकलमध्ये मिळतं. त्यामुळे आम्ही आमचं काम व्यवस्थित करु, 100 टक्के रुग्णाची काळजी घेऊ’, असं मेडिकलचालक किरण तोष्णीवाल यांचे लहान बंधू अनिल तोष्णीवाल यांनी म्हटलं आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा