Headlines

Nanded Manyar Galli Pakistani Beauty Products Saled in Shop FDA Seizes Goods 60 Lakhs; ट्रॅव्हलिंग बिझनेसच्या नावाखाली भलताच धंदा, पाकिस्तानी बनावटीच्या सौंदर्य प्रसाधनांची विक्री, तुकाराम मुंढेंचा आदेश; एका रात्रीत खेळ खल्लास


Nanded Pakistani Beauty Products : नांदेडमधील मन्यार गल्ली भागातील एका गोदामात मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनांचा साठा दडवून ठेवण्यात आल्याची गोपनीय माहिती FDA आणि पोलिसांना मिळाली होती.

Manyar Galli Pakistani Made Cosmetics
मन्यार गल्ली पाकिस्तानी बनावटीचे सौंदर्य प्रसाधने(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अर्जुन राठोड, नांदेड : आरोग्याला हानिकारक ठरू शकणाऱ्या पाकिस्तानी उत्पादनांवर अन्न-औषध प्रशासन आणि पोलिसांनी नांदेडमध्ये मोठी कारवाई केली आहे. एका दुकानावर छापा टाकून एफडीए आणि पोलिसांनी 38 प्रकाराचे भारतात प्रतिबंधित असलेले पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधने जप्त केले आहेत. काल गुरुवारी रात्री नांदेड शहरातील मन्यार गल्ली येथे ही कारवाई करण्यात आली असून एकाला ताब्यात घेतल्याची माहिती आहे. धक्कादायक म्हणजे दुकान मालक हा टूर्स एन्ड ट्रॅव्हल्स व्यवसायाच्या आडमध्ये हा गोरखधंदा करत होता, अशी माहिती देखील समोर आली आहे. जप्त करण्यात आलेला मुद्देमाल 50 ते 60 लाखांचा असल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

किंमत तब्बल 50 ते 60 लाख

अफ्रा जनरल स्टोअर्स दुकानात पाकिस्तानी उत्पादन असलेले सौंदर्याचे साधने विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती इतवारा पोलिसांना मिळाली. काल गुरुवारी रात्री पोलिसांनी अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी अशोक राठोड यांना सोबत घेऊन दुकानात आणि गोदामात छापा टाकला. छाप्यात भारतात विक्रीसाठी पूर्णपणे बंदी असलेली तब्बल 38 प्रकारची पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधने जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या या मालाची किंमत तब्बल 50 ते 60 लाख रुपयांच्या घरात असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
Maharashtra TimesNandigram Express Honeymoon : हनिमूनसाठी रेल्वेच्या फर्स्ट AC कोचमध्ये अनधिकृत सजावट, घटनेनंतर रेल्वेचं कठोर पाऊल; ट्रेनमध्ये नेमकं काय घडलं होतं?

उत्पादनांचे विविध नमुने गोळा

दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या या सौंदर्य प्रसाधनांमध्ये नेमके कोणते घातक रासायनिक घटक मिसळले गेले आहेत? जे मानवी त्वचेला आणि आरोग्याला हानी पोहोचवू शकतात, याची तपासणी केली जाणार आहे. यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या मदतीने या उत्पादनांचे विविध नमुने गोळा करून ते पुढील तपासणीसाठी शासकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असल्याची माहिती एफडीए विभागाचे अधिकारी अशोक राठोड यांनी दिली. दरम्यान, या खळबळजनक कारवाईनंतर पोलिसांनी संबंधित दुकानाच्या मालकाला ताब्यात घेतलं आहे.
Maharashtra TimesAshwini Bhide: अश्विनी भिडेंनी नाकारलं, पण रिपोर्टमध्ये तेच सत्य समोर आलं! मुंबईत झाड कोसळून झालेल्या मृत्यू प्रकरणात महत्त्वाची माहिती उघड

पाकिस्तानी उत्पादनांचा साठा कुठून आला?

भारतात पूर्णपणे बंदी असलेला हा पाकिस्तानी उत्पादनांचा एवढा मोठा साठा नांदेडमध्ये कसा आणि कोठून आणण्यात आला? या बेकायदेशीर रॅकेटच्या मागे आणखी कोणाकोणाचे हात आहेत? आणि हा माल पुढे कोणाकोणाला पुरवला जाणार होता? या सर्व बाजूंचा इतवारा पोलीस आणि प्रशासन अत्यंत सखोलपणे तपास करत आहेत. या कारवाईमुळे शहरात बंदी असलेल्या आणि आरोग्याला घातक उत्पादनांची विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. दुकानमालक टूर्स एन्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करायचा, याच व्यवसायाच्या आडमध्ये दुकानमालक गोरखधंदा करत असल्याचं बोललं जात आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा