Nanded Contractor Gajanan Devkatte Ends his Life in Navi Mumbai due to Non Payment of Work Bills; कामांची बिले देण्यासाठी पाच लाखांची मागणी, कर्जबाजारीपणाला कंटाळले; नांदेडच्या कंत्राटदाराने नवी मुंबईत स्वत:ला संपवलं
Nanded Contractor Gajanan Devkatte Ends his Life in Navi Mumbai due to Non Payment of Work Bills; कामांची बिले देण्यासाठी पाच लाखांची मागणी, कर्जबाजारीपणाला कंटाळले; नांदेडच्या कंत्राटदाराने नवी मुंबईत स्वत:ला संपवलं
Nanded Contractor Ends Life in Navi Mumbai : शासकीय कामे पूर्ण करूनही दीर्घकाळ कामाचे बिले मिळत नसल्याने राज्यातील छोट्या-मोठ्या शासकीय कंत्राटदारांवरील आर्थिक संकट दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचा दावा कंत्राटदारांच्या संघटनांनी केला आहे. या आर्थिक विवंचनेतून नवी मुंबईतील गजानन देवकत्ते या शासकीय कंत्राटदाराने आत्महत्या केल्याची घटना घडली.
कंत्राटदार गजानन देवकत्ते आत्महत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अर्जुन राठोड, नांदेड : राज्यात कंत्राटदारांच्या थकीत बिलांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. वर्षानुवर्षे केलेल्या कामांची बिले मिळत नसल्यानं कंत्राटदार टोकाचं पाऊल उचलत आहेत. अशीच एक दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी घटना नवी मुंबईत घडली आहे. गेल्या दोन वर्षांपासून कामाचे सुमारे दीड ते दोन कोटी रुपये थकीत असल्यानं, नांदेडच्या एका कंत्राटदाराने नवी मुंबई येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. गजानन देवकत्ते असं या कंत्राटदाराचं नाव आहे. या घटनेमुळे कंत्राटदार वर्गात प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, ‘थकीत बिल मंजूर करण्यासाठी संबंधित अधिकारी लाचेची मागणी करत होता’, असा गंभीर आरोप मृत कंत्राटदाराच्या पत्नीने केला आहे.
नेमकी घटना काय?
गजानन देवकत्ते हे मूळचे नांदेडजिल्ह्यातील मुखेड येथील रहिवासी होते. गेल्या काही वर्षांपासून ते मुंबईत वास्तव्यास असून तिथेच कंत्राटदारी (गुत्तेदारी) करत होते. कंत्राटदारीच्या कामात त्यांनी स्वतःचे आणि व्याजाने घेतलेले सुमारे दीड कोटी रुपये गुंतवले होते. कामासाठी त्यांनी पत्नी व आईचे दागिनेही गहाण ठेवले होते, असे नातेवाईकांनी सांगितले. काम पूर्ण होऊनही गेल्या दोन वर्षांपासून बिल निघत नसल्यानं आणि कर्जाचा डोंगर वाढल्यानं ते तीव्र मानसिक तणावाखाली होते.
बिल काढण्यासाठी अधिकारी लाचेची मागणी करत असल्याचं देवकत्ते यांच्या पत्नीनं सांगितलं. ‘भूषण फेडगे नावाच्या अधिकाऱ्याने पाच लाख रुपयांची लाच मागितली होती, तसेच यापूर्वीही त्याने लाच मागितली होती’, असा थेट आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे. गजानन देवकत्ते यांच्यामागे दोन लहान मुले आणि वृद्ध तथा आजारी आई असा परिवार आहे. त्यांच्या आत्महत्येमुळे संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडलं असून, शासनाने या प्रकरणी योग्य न्याय द्यावा, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. गजानन देवकत्ते यांचा मृतदेह त्यांच्या मूळ गावी मुखेड येथे आणण्यात आला असून, तिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे नांदेड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
विशेष म्हणजे, थकीत बिलांसंदर्भात देवकत्ते यांनी 4 जून 2025 रोजी संबंधित विभागाला निवेदन दिलं होतं. ‘शासकीय कामांचे पैसे वेळेवर मिळत नाहीत; कामासाठी आणि थकीत बिलांसाठी कार्यालयात 10-10 वेळा फेऱ्या माराव्या लागत आहेत. कष्टाचे पैसेच मिळणार नसतील, तर जगायचे कसे?’, असा सवाल त्यांनी या निवेदनात उपस्थित केला होता. तसेच, ‘पैशांपुढे कोणाला काहीच दिसत नाही,’ अशी हताश खंतही त्यांनी त्यावेळी व्यक्त केली होती.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा