Headlines

Nanded Asha Residency Kadam Family Girl Scores 100 Percent Marks in Chemistry Private Coaching Class Banner; NEET पेपरफुटी प्रकरण; निकाल लागण्यापूर्वीच विद्यार्थिनीला केमिस्ट्रीत पैकीच्या पैकी गुण, बॅनर छापण्याची तयारी, खासगी कोचिंग क्लासेस CBIच्या रडारवर


Nanded Kadam Family CBI Investigation : नीट पेपरफुटीचं प्रकरण आता नांदेडमध्ये येऊन ठेपलं आहे. निकाल लागण्यापूर्वीच एका कुटुंबातील विद्यार्थिनीला 180 पैकी 180 गुण मिळाल्याचं एका खासगी क्लासचालकानं आपल्या बॅनरमध्ये छापलं असल्याचं समोर आलं आहे.

NEET Paper Leak Nanded Family Investigation
नांदेड नीट पेपरफुटी प्रकरण(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अर्जुन राठोड, नांदेड : नांदेड शहरात खासगी कोचिंग क्लासेसमध्ये सध्या विद्यार्थ्यांच्या यशाची टक्केवारी दाखवण्यासाठी मोठी चढाओढ लागल्याचं चित्र आहे. आपलेच विद्यार्थी कसे गुणवंत आहेत, हे दाखवण्यासाठी कोट्यवधी रुपयांची जाहिरातबाजी सोशल मीडियावर केली जात आहे. मात्र, नांदेडमधील एका नामांकित खासगी कोचिंग क्लासेसला हीच जाहिरातबाजी आता चांगलीच अंगलट येण्याची शक्यता आहे. कारण नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने एका विद्यार्थिनीची चौकशी केली, त्या विद्यार्थिनीचा फोटो छापून क्लासने जाहिरातबाजी केली. एवढचं नाही तर त्या विद्यार्थिनीला केमिस्ट्री विषयात 180 पैकी 180 गुण असा जाहिरातीमध्ये उल्लेख देखील केला आहे. या जाहिरातीचा फोटो सध्या समाजमाध्यमावर व्हायरल होत असून निकाल येण्यापूर्वीच भाकीत वर्तवलं असून हे प्रकरण क्लासचालकाला महागात पडण्याची शक्यता आहे.

नेमकं प्रकरण काय?

नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे नांदेडपर्यंत पोहोचल्यानंतर शनिवारी सीबीआयचं एक पथक नांदेडला धडकलं. शहरातील एका कुटुंबाची कसून चौकशी केली. मुलीच्या वडिलांनी तब्बल 5 लाख रुपये देऊन तिच्यासाठी नीटचा पेपर खरेदी केल्याचा गंभीर आरोप आहे. जवळपास आठ कुटुंबियाची सीबीआयच्या पथकाकडून चौकशी करण्यात आली. धक्कादायक म्हणजे सदर विद्यार्थिनी नीट परीक्षेच्या 15 दिवसापूर्वी पुणे येथे परीक्षेच्या तयारीला गेली होती. त्यानंतर नांदेडला येऊन तिने परीक्षा दिली. नांदेडमध्ये तयारी करत असताना तिला 100 ते 120 गुण मिळत होते. मात्र, पुणे येथे तिला सरावात 560 गुण मिळाले.

Maharashtra TimesShivraj Motegaonkar : NEET पेपरफुटी प्रकरणात सर्वात मोठी अपडेट; RCC कोचिंग क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकराला सीबीआयकडून अटक, मोठे खुलासे होणार

180 पैकी 180 गुण

संशयाची सुई गडत झाल्यानं मुलीसह आई-वडिलांना उद्या मंगळवारी पुणे येथील सीबीआय कार्यालयात हजर राहण्याचे समन्स दिल्याची माहिती आहे. दरम्यान, सीबीआयकडून झालेल्या चौकशीमुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यातच या चौकशीच्या फेऱ्यात असलेल्या विद्यार्थिनीचा फोटो छापून नांदेडमधील एका खासगी कोचिंग क्लासने कमाल करत सोशल मीडियावर जाहिरातबाजी केली आहे. या जाहिरातीत संबंधित मुलीला केमिस्ट्री या विषयात 180 पैकी 180 गुण मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, पेपर फुटीनंतर नीटची परीक्षा रद्द करण्यात आली असून 21 जून रोजी पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय एनटीएने घेतला आहे. अशातच नीट परीक्षेचा अधिकृत निकाल अद्याप जाहीर झालेला नसतानाही, या क्लासने निकालापूर्वीच हे गुण मिळाल्याचं भाकीत जाहिरातीत वर्तवल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

Maharashtra TimesNanded Crime : नीटची तयारी करताना विद्यार्थिनीला 120 गुण, पुण्यात सराव परीक्षेवेळी 560 मार्क्स, NEET पेपरफुटीचे धागेदोरे नांदेडमध्ये; कुटुंबाची 8 तास चौकशी

निकाल लागण्याआधीच मार्क्स माहिती झाले

या जाहिरातीत केवळ याच मुलीचा नाही, तर इतर दोन विद्यार्थ्यांचे फोटोही अशाच प्रकारे छापण्यात आले आहेत. सध्या ही जाहिरात सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून नागरिकांमध्ये आणि शैक्षणिक वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू आहे. निकाल लागण्याआधीच क्लासेसच्या संचालकाला विद्यार्थ्यांचे अचूक गुण कसे माहित झाले? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे पेपर खरेदी करणारी विद्यार्थिनी ही संबंधित कोचिंग क्लासेसची विद्यार्थिनी असल्याची माहिती आहे. या जाहिरातबाजीमुळे क्लासेसचा संचालक सीबीआयच्या रडारवर असल्याची चर्चा आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा