Headlines

Nanded Ardhapur farmer Gunaji Pawar Ended his Life due to Bank Loan; डोक्यावर कर्जाचा डोंगर, कंटाळेल्या वडिलांनी स्वत:ला संपवलं, चार लेकी बापाविना पोरक्या, मृत्यूनंतरही बँकेची नोटीस, कागद बघून लेकी हमसून हमसून रडल्या


Nanded Ardhapur farmer Gunaji Pawar End Life : घटनेची माहिती मिळताच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. सपकाळ हे 23 जून मंगळवारी रोजी आसूड मोर्चासाठी नांदेडला आले होते. यावेळी त्यांनी कुटुंबाची चर्चा करून सांत्वन केलं. आर्थिक मदत देखील केली. यावेळी खासदार रविंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

Nanded Ardhapur farmer Gunaji Pawar End Life
अर्धापूर शेतकरी गुणाजी पवार आत्महत्या प्रकरण(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अर्जुन राठोड, नांदेड : कधी आसमानी, तर कधी सुलतानी या दुहेरी संकटात शेतकरी राजा नेहमी अडचणीत सापडत असतो. वर्षभर शेतात राबवून देखील शेतकऱ्याच्या शेतमालाला समाधानकारक भाव मिळत नाही. या संकटाचा सामना करत असताना नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात मन सुन्न करणारी घटना घडली आहे. बँकेचं आणि खासगी कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या एका 39 वर्षीय गुणाजी पवार या अल्पभूधारक शेतकऱ्याने विष प्राशन करून जीवन संपवलं.

मुलींच्या डोक्यावरील बापाचं छत्र हरपलं

शेतकऱ्याने उचललेल्या या टोकाच्या पाऊलामुळे आई-वडिलांनी घरातील कर्ताधर्ता मुलगा गमवावा लागला, तर पत्नीचा आधारवड हिरावून गेला आणि चार मुलींच्या डोक्यावरील बापाचं छत्र हरवलं. वडिलांच्या घेतलेल्या टोकाच्या पाऊलामुळे चारही मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेनं अख्खं घर उघड्यावर आलं असून सर्वत्र हळहळ व्यक्त होतं आहे.
Maharashtra TimesSunday Mega Block : प्रवाशांसाठी मोठी बातमी! रविवारी तब्बल 5 तास ट्रान्स-हार्बर मार्ग बंद राहणार, मध्य रेल्वेवरही मेगाब्लॉक
गुणाजी पवार हे अर्धापूर तालुक्यातील येळेगाव येथील रहिवासी आहेत. गुणाजी हेच घरातील कर्ताधर्ता असून शेतीवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह होता. शेतीसाठी त्यांनी बँकेकडून कर्ज घेतले होते, शिवाय खासगी संस्थेतील फायनान्समधून पैसे उचलले होते. पाच लाखाहून अधिक कर्ज असल्याचं पीडित कुटुंबियांनी सांगितलं. चार मुलींच्या शिक्षणाचा वाढता खर्च, कर्जबाजारीपणा, सततची नापिकी आणि पीककर्जाचा ताण याच मानसिक तणावातून गुणाजी पवार यांनी 15 जून सोमवारी रोजी विष प्राशन केलं आणि 18 जून रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शेतकऱ्याच्या निधनाने अख्खं कुटुंब उघड्यावर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे शेतकऱ्याच्या मृत्यूनंतरही बँकेनं कर्जाच्या परतफेडसाठी नोटीस पाठवली आहे.

मुलींचं शिक्षण अंधारात, अर्धांगवायू आलेल्या बापाच्या डोळ्यात अश्रू

गुणाजी पवार हे अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांना केवळ दोन एकर शेती आहे. तर घरात आई-वडील, एक भाऊ, पत्नी आणि चार मुली असा परिवार आहे. चारपैकी एक मुलगी अकरावीत आहे तर अन्य तीनजण शिक्षण घेत आहेत. यातील एक मुलगी मुकबधीर असल्याची माहिती आहे. दरम्यान, गुणाजी यांच्या वडिलांना अर्धांगवायूचा झटका आल्यानं पलंगावर आहेत. घराची जवाबदारी गुणाजी यांच्यावर होती.
Maharashtra TimesSiya Goyal : केतनने खूप जीव लावला, आदर दिला, मुलासारखाच होता; सिया गोयलच्या पालकांनी पहिल्यांदाच सोडले मौन, लेकीच्या कृत्यावर म्हणाले…
आसमानी आणि सुलतानी संकटासोबत कर्जबाजारीचा सामना त्यांना करावा लागत होता. या संकटातून वडिलांनी टोकाचं पाऊल उचलल्यानं चारही मुलींचं शिक्षण अंधारात सापडलं आहे. दुसरीकडे कुटुंबाचा एकमेव कमावता आधार हरवल्यानं कुटुंबियांचे डोळे पाणावले आहेत. शिवाय एका गरीब कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा