Nalasopara 9 Years old Girl dies of Rabies after Stray Dog Nail scratch; भटक्या कुत्र्याचं नख लागलं, इंजेक्शनच्या भीतीने उपचार टाळले, नऊ वर्षीय मुलीचा सहा महिन्यांनी रेबीजने मृत्यू
Nalasopara 9 Years old Girl dies of Rabies after Stray Dog Nail scratch; भटक्या कुत्र्याचं नख लागलं, इंजेक्शनच्या भीतीने उपचार टाळले, नऊ वर्षीय मुलीचा सहा महिन्यांनी रेबीजने मृत्यू
Girl dies of Rabies : सहा महिन्यांपूर्वी बालिका आपल्या आजोबांबरोबर जात असताना तिला भटक्या कुत्र्याने नख मारले होते. त्यानंतर तिला रेबीजची लागण झाली
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नालासोपारा : उनाड कुत्र्यांचा धोका सगळीकडेच वाढला आहे, यामुळे यापूर्वी काहींचे जीव गेले आहेत तर अनेकांना रेबीज सारख्या भयानक रोगाचे संसर्ग झाल्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. मुंबईजवळच्या नालासोपाऱ्यात 9 वर्षीय मुलीला भटक्या कुत्र्याचे नख लागल्याने रेबीज रोगाची लागण झाली, यातच तिचा दुर्दैवाने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कशिश सहानी असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. नालासोपारा पश्चिम परिसरात ही घटना घडली आहे.
त्यानंतर काही दिवसांनी ही जखम भरल्याने हा प्रकार फारसा कोणाच्या लक्षात आला नाही. मात्र चार-पाच दिवसांपूर्वी तिची प्रकृती बिघडली तिने अन्न पाणीच बंद केल. तसेच तिचे डोळे लाल झाल्याची लक्षणे दिसली. कुटुंबीयांकडून तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचार करतात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांच्या सल्ल्याने तिला पुढे मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात तातडीने हलवण्यात आलं. मात्र याच दरम्यान तिचा उपचारादरम्यान सोमवारी मृत्यू झाला.
Harshwardhan Sadgir बनला डबल महाराष्ट्र केसरी, ‘बक्षिसाच्या पैशातून आहार..’
मृत्यू अहवालात रेबीजच्या संसर्गामुळे या मुलीचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आल्याची माहिती सुबोध सोसायटीच्या सचिव श्रुती शेनॉय यांनी दिली. या सगळ्या धक्कादायक प्रकारामुळे खळबळ उडाली असून भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. Pune Accident : रात्रीच्या अंधारात काळाचा घाला, चिंचवडच्या कुटुंबाची कार बसखाली घुसली, आई-वडील-आजीचा मृत्यू, दोन लेकरं पोरकी नालासोपारा महानगरपालिका क्षेत्रातील तातडीने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता सर्व स्तरातून होऊ लागली आहे. भटक्या कुत्र्याच्या चावल्याने अथवा नख मारल्याने एका लहान मुलीचा जीव गेला आहे या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. महानगरपालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा