Tarri poha world record nagpur: नागपूरमध्ये जागतिक पोहा दिनानिमित्त शेफ विष्णू मनोहर यांनी तब्बल ३००० किलो तर्री पोहा तयार करून विश्वविक्रम केला आहे. नागपूरच्या खाद्यसंस्कृतीला जागतिक ओळख मिळावी असा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जितेंद्र खापरे, नागपूर: नागपूरच्या खाद्यसंस्कृतीची ओळख बनलेला तर्री पोहा आता जागतिक स्तरावर झळकला आहे. जागतिक पोहा दिनानिमित्त प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी तब्बल ३ हजार किलो तर्री पोहा तयार करून विश्वविक्रमाची नोंद केली. बजाज नगर येथील ‘विष्णुजी की रसोई’ येथे रविवारी सकाळी हा अनोखा उपक्रम पार पडला. या विक्रमी प्रमाणात तयार करण्यात आलेल्या तर्री पोह्याचे नागरिकांना वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे नागपूरच्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा गौरव झाला असून तर्री पोह्याची ओळख देशासह जगभर पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
नागरिकांची मोठी गर्दी
नागपूरची शान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तर्री पोह्याला जागतिक व्यासपीठ मिळावे आणि या पदार्थाची स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक, खाद्यप्रेमी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. विक्रमी प्रमाणात तयार करण्यात आलेल्या पोह्याचा आस्वाद घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली.
विष्णू मनोहर म्हणाले..
यावेळी बोलताना शेफ विष्णू मनोहर यांनी सांगितले की, नागपूरचा तर्री पोहा ही शहराची वेगळी ओळख आहे. आतापर्यंत या पदार्थाचा कोणताही विक्रम झाला नव्हता. पोह्याचा उल्लेख झाला की नागपूर आणि इंदूर या दोन शहरांची नावे प्रामुख्याने घेतली जातात. मात्र इंदूरचा पोहा आणि नागपूरचा तर्री पोहा यांची चव व बनविण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. नागपूरच्या या खास खाद्यपदार्थाची ओळख जगासमोर यावी, यासाठी हा विक्रम करण्याचा निर्णय घेतल्याचे शेफ विष्णू मनोहर यांनी सांगितले.
‘जागतिक स्तरावर मान्यता मिळावी’
हा विक्रमी तर्री पोहा तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात साहित्याचा वापर करण्यात आला. यामध्ये सुमारे ४०० किलो चणे, ६०० किलो पोहे, ३०० किलो तेल, ५०० किलो कांदे तसेच २५० ते ३०० किलो विविध मसाल्यांचा समावेश होता. याशिवाय प्रत्येकी १०० किलो आले आणि लसूण पेस्ट वापरण्यात आली. या प्रचंड प्रमाणातील तर्री पोह्याचा आस्वाद पाच ते सहा हजारहून अधिक नागरिकांनी घेतला. तसेच प्रत्येक शहराची एक वेगळी खाद्यसंस्कृती आणि ओळख असते. नागपूरची ओळख तर्री पोह्यामुळे अधिक मजबूत व्हावी आणि या पदार्थाला जागतिक स्तरावर मान्यता मिळावी, हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू असल्याचे विष्णू मनोहर यांनी स्पष्ट केले.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा