Maharashtra Boy visits Narmadapuram Ghat : वेब सीरिजमध्ये बाबांची भूमिका करणाऱ्या पात्राला भेटण्यासाठी विद्यार्थ्याने थेट मध्य प्रदेशातील नर्मदापुरम गाठले. त्यासाठी त्याने स्वत:च्याच अपहरणाचा बनावही रचला होता.

शाळेच्या बहाण्याने घरुन निघाला
बेलतरोडी पोलिस ठाण्यातून प्राप्त माहितीनुसार, रोहित (नाव बदलेले) याच्या शाळेचा पहिला दिवस होता. सकाळी ‘शाळेत जातो’ असे सांगून तो सायकलने घरून निघाला; परंतु शाळेत न जाता त्याने आपली सायकल उज्ज्वलनगर मेट्रो स्टेशनखाली पार्क केली आणि तो मेट्रोने अजनी रेल्वे स्थानकावर गेला. तेथून त्याने नर्मदापुरम येथे जाणारी रेल्वेगाडी पकडली. तिथे दिवसभर त्या वेबसीरीजमधील बाबांचा शोध घेतला. मात्र, प्रत्यक्षात ते बाबा नसल्याने त्याने मिळेल ती रेल्वेगाडी पकडून मध्यरात्री दोनच्या सुमारास नागपूर गाठले.
अपहरणाची खोटी कथा रचली
इकडे मुलगा शाळेतून घरी पोहोचला नसल्याने पालकांनी बेलतरोडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रितेश आहेर यांच्या पथकाने तातडीने शोधमोहीम सुरू केली. परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासले असता त्यांना रोहित उज्ज्वलनगर मेट्रो स्टेशनवरून अजनी रेल्वे स्थानकात गेल्याचे दिसला. दरम्यान, रोहित त्याच दिवशी सायंकाळी घरी परतला आणि त्याने अपहरणाची खोटी कथा रचली. मात्र, पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केली असता धक्कादायक वास्तव समोर आले.
Venezuela Earthquake : मी जिवंत आहे, माझ्या बायकोला सांगू नका; बोगदा खणून 8 दिवसांनी वाचवलं, त्याचेच शब्द ऐकून बचाव पथक बुचकळ्यात, कारण समजताच गलबलले
‘मला ते बोलवत आहेत’
डिजिटल माध्यमे आणि वेबसीरीजचे व्यसन मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी किती घातक ठरू शकते, याचे हे डोळे उघडणारे उदाहरण आहे. वेबसीरिज, रील्स सतत पाहिल्यामुळे मुलांना काल्पनिक आणि वास्तविक जगातला फरकच समजणे बंद होते. ‘त्या सीरीजमधील बाबा मला नर्मदापुरम घाटावर भेटायला बोलवत आहेत,’ अशा भ्रमातूनच हा प्रकार घडला.
Maharashtra Farmer Gaun Khanij Royalty Free विहीर, गोठा, शेतघरांसाठी गौण खनिज मोफत
मानसोपचारतज्ज्ञ काय म्हणतात?
‘घरातील ताणतणाव, अभ्यासाची भीती, मला हिरो बनायचे आहे, काही तरी मोठे करायचे आहे अशा भावनेतून अल्पवयीन मुले घरातून पळून जातात. ‘डोसेसिएटिव्ह फ्युगी’ या आजारातून हे होते. हा सायकोसिसचा भाग असतो. लहान मुलांच्या मोबाइलच्या अतिवापरावर बंधने आणणे हा त्यावरील उपाय ठरू शकतो,’ असे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. निखिल पांडे यांनी महाराष्ट्र टाईम्सशी बोलताना सांगितले.
लासलगावजवळ युवतीचे अपहरण
दुसरीकडे, नाशकातील डोंगरगाव येथील १६ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार लासलगाव पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. सुकन्या बसवैया असे अपहरण करण्यात आल्या मुलीचे नाव आहे. या प्रकरणी सुकन्याचे वडिल चिन्ना बसवैया व्यंकटेश किन्नरा यांनी फिर्याद दिली आहे.
Ketan Agarwal Murder : निकनेम आणि कोड लँग्वेज… चेतन-सियाने डिलीट केलेल्या चॅटची रिकव्हरी, बीडवासी वर्गमित्राबद्दलही महत्त्वाची माहिती
चिन्ना हे मूळचे तेलंगण राज्यातील असून ते सद्या डोंगरगाव येथे जडी-बुटीचा व्यवसाय करतात. त्यांची मुलगी सुकन्या हिला शनिवारी (दि. ८) रात्री ९ ते १ वाजेच्या दरम्यान डोंगरगाव रोड पालखेड कालव्यालगतच्या रस्त्यावरून अज्ञात व्यक्तीने पळवून नेले, अशी तक्रार चिन्ना यांनी लासलगाव पोलिसांकडे केली आहे. रंग काळा सावळा, उंची ५ फूट, मजबूत शरीर बांधा, चेहरा गोल, डाव्या डोळ्यात काळा तीळ, केस काळे, डाव्या हाताच्या अंगठ्याजवळ एस अक्षर गोंदलेले असे सुकन्याचे वर्णन आहे.

