Headlines

Siya Goyal and Chetan Chaudhary Sent to 14-Day Judicial Custody


आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी पोलिसांकडून आरोपींच्या तीन दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. पण न्यायालयाने ही मागणी फेटाळली. न्यायालयाने दोन्ही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता पोलिसांसमोरील तपासाची आव्हानं वाढणार आहेत.

pune news
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. प्रतिनिधी लोणावळा : बांधकाम व्यावसायिक केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणात मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना वडगाव मावळ सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडीची मुदत शुक्रवारी संपत होती. मोठ्या बंदोबस्तात दोघांना वडगाव मावळ न्यायालयात हजर करण्यात आले. अधिक तपासासाठी पोलिसांनी दोघांना तीन दिवसांची कोठडी देण्यात यावी, अशी न्यायालयाकडे मागणी केली होती. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने पोलीस कोठडीची मागणी फेटाळत दोघांना १४ दिवस न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचे आदेश दिले.

बांधकाम व्यावसायिक केतन विशाल अग्रवाल याची होणारी नियोजित पत्नी सिया प्रविण गोयल हिने तिचा प्रियकर चेतन बाबुलाल चौधरी यांनी कट रचून १८ जूनला मावळातील लोहगड किल्ल्यावरील एका कड्यावरुन सुमारे साडेतीनशे फूट खोल दरीत ढकलून हत्या केली होती. ह्या अनोख्या हत्याकांडाने महाराष्ट्रासह संपूर्ण देशात खळबळ उडाली होती.

पोलिसांकडून तीन दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी

या प्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांची कसून तपासणी केल्यानंतर या घटने प्रकरणी रोज नव नवीन अनेक धक्कादायक खुलासे उजेडात येत होते. शुक्रवारी दोघांची पोलीस कोठडीची मुदत संपणार असल्याने दोघांना शुक्रवारी दुपारी वडगाव मावळ येथील सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी दोघांना पुन्हा तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली अशी मागणी न्यायालयाकडे केली होती.

न्यायाधीशांनी पोलिसांची मागणी फेटाळली

न्यायाधीश ए.एम. विभुते यांच्या समोर ही सुनावणी पार पडली. पोलिसांनी सिया आणि चेतन या दोघांना आतापर्यंत देण्यात आलेल्या पोलीस कोठडी दरम्यान कसून तपासणी, या प्रकरणी हाती लागलेले महत्वाचे धागेदोरे व पुरावे न्यायालयात सादर केले. यावेळी पोलिसांनी दोघांना पुन्हा एकदा तीन दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने दोन्ही बाजूकडील युक्तिवाद ऐकल्यानंतर पोलिसांनी केलेली पोलीस कोठडीची मागणी फेटाळत दोघांची 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

पोलिसांनी काय-काय माहिती दिली?

यावेळी न्यायालयात दोन्ही बाजूकडील युक्तिवाद झाला. सिया आणि चेतन यांना देण्यात आलेल्या पोलिस कोठडी दरम्यान तपास यंत्रणांनी याप्रकरणी अनेक महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात आल्याचा दावा यावेळी करण्यात आला. यामध्ये घटनानस्थळानांचा पंचनामा, आरोपींनी कट रचलेल्या ठिकाणे, केतनला ढकलण्यासाठी सराव करण्यात आलेल्या ठिकाणांसह आरोपींची कपडे जप्त करणे,
मोबाईलमधील डिलीट करण्यात आलेला डेटा रिकव्हर करण्यासह इतर तपासांची माहिती आज न्यायालया समोर मांडण्यात आली.

पोलिसांना सांकेतिक भाषेचा शोध घ्यायचाय

यावेळी न्यायालयात तपास अधिकाऱ्यांनी आरोपींच्या मोबाईलमधील डेटा प्राप्त झाला असून, त्याची समोरासमोर पडताळणी करणे गरजेचे आहे. तसेच रिकव्हर करण्यात आलेल्या डेटामध्ये वापरण्यात आलेली सांकेतिक भाषा आणि निकनेमचा वापर करून दोघांमध्ये झाल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले असून, या सांकेतिक संभाषणाचा नेमका काय अर्थ, या हत्याकांडात आणखी कोणाचा सहभाग आहे का? यासह इतर काही शिल्लक बाबी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांना आरोपींसमोर बसवून चौकशी करून पडताळणी करणे आवश्यक असल्याचा युक्तिवाद करत पुन्हा तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली, अशी मागणी पोलिसांच्या वतीने करण्यात आली होती.

सरकारी वकील काय म्हणाले?

यावेळी सरकारी वकीलांनी न्यायालयात सांगितले की, सिया गोयल हिच्या जप्त करण्यात आलेल्या दुसऱ्या मोबाईलमधील डिलीट करण्यात आलेला डेटा रिकव्हर करण्यात आला असून, त्यामध्ये वापरण्यात आलेली सांकेतिक भाषा आणि निकनेमची पडताळणी करण्यासाठी आरोपींची समोरासमोर चौकशी करणे अत्यंत आवश्यक असल्याने यासाठी दोघांना आणखी काही दिवस पोलीस कोठडी देण्याची गरज असल्याचा आग्रह सरकारी वकीलांनी न्यायालयात धरला होता.

आरोपींच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

तर बचाव पक्षाचे वकिल विपुल दुशिंग न्यायालयात आपली बाजू मांडताना म्हणाले की, सियाने तपासात पूर्णपणे सहकार्य केले आहे आणि करत आहे. तसेच पोलिसांनी ज्या मोबाईलचा उल्लेख केला आहे तो मोबाईल यापूर्वीच जप्त करण्यात आला आहे. केवळ मोबाईलमधील संदेशाचा अर्थ लावण्यासाठी किंवा सांकेतिक भाषांमधील चिन्हानची पडताळणी करण्यासाठी पोलीस कोठडी मागणे कायदेशीरदृष्ट्या योग्य नसल्याचा युक्तिवाद ॲड. दुशिंगे यांनी यावेळी करत पोलीस कोठडी नाकारावी अशी मागणी केली.

सुनावणीत नार्को चाचणीचा मुद्दा

सुनावणी दरम्यान दोघांच्या नार्को चाचणीचा मुद्दा उपस्थित केला गेला. यावेळी न्यायालयाधिशांनी नार्को चाचणीसाठी आरोपींची सहमती आवश्यक असल्याने त्यांच्या सहमतीशिवाय अशा प्रकारच्या चाचण्यांना परवानगी देता येणार नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी सरकारी वकीलांनी सध्या तरी नार्को चाचणीची गरज नसल्याचे न्यायालयाला सांगितले. दोन्ही बाजूकडील सविस्तर युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने पोलिसांनी आणखी तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळावी ही मागणी फेटाळत दोघांची १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा