Headlines

Nagpur News: २०० कोटींच्या बॉण्डचा मार्ग मोकळा ; नागपूर महापालिकेला इंडिया रेटिंग्जकडून एए+/ क्रेडिट रेटिंग,नागनदी प्रदूषणमुक्ती प्रकल्पाला बळ


Nagpur News: नागनदी प्रदूषणमुक्ती प्रकल्पासाठी म्युनिसिपाल बॉण्डच्या माध्यमातून २०० कोटी रुपये उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.यामुळे नागनदी प्रदूषणमुक्ती प्रकल्पाला बळ आल आहे.

२०० कोटींचा बॉण्डचा मार्ग मोकळा
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.प्रतिनिधी,नागपूर:नागपूर महापालिकेला इंडिया रेटिंग्जकडून एए+/स्टेबल क्रेडिट रेटिंग मिळाले आहे. त्यामुळे नागनदी प्रदूषणमुक्ती प्रकल्पासाठी म्युनिसिपल बॉण्डच्या माध्यमातून २०० कोटी रुपये उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, बॉण्ड जारी करण्यापूर्वी महापालिकेला राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे.

क्रेडिट रेटिंग मिळाल्यानंतर निधी उभारणीचा प्रस्ताव

महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी सदाशिव शेळके यांनी सांगितले की, क्रेडिट रेटिंग मिळाल्यानंतर निधी उभारणीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. सरकारची परवानगी मिळाल्यानंतर सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबीकडे बॉण्ड इश्यूची प्रक्रिया सुरू केली जाईल.

महापालिकेला एए+/स्टेबल रेटिंग देण्यात आले.

इंडिया रेटिंग्जने महापालिकेची गेल्या पाच वर्षांतील आर्थिक स्थिती, अर्थसंकल्पआणि इतर आर्थिक कागदपत्रांची तपासणी केली. त्यानंतर महापालिकेला एए+/स्टेबल रेटिंग देण्यात आले. शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी हे उच्च दर्जाचे क्रेडिट रेटिंग मानले जाते. म्युनिसिपल बॉण्ड बाजारात प्रवेश करण्यासाठी क्रेडिट रेटिंग ही महत्त्वाची अट असते.

Maharashtra TimesBoarding Pass Swap : ठाण्यातील प्रवाशासोबत बोर्डिंग पासची अदलाबदल, विमानतळावर कारनामा, नेपाळचं तिकीट, कॅनडाला जाण्याचा डाव

सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर पुढील औपचारिक प्रक्रिया

स्थायी समितीच्या अध्यक्ष शिवानी दानी-वाखारे यांनी महापालिकेच्या अर्थसंकल्पात म्युनिसिपल बॉण्डद्वारे निधी उभारण्याचा प्रस्ताव यापूर्वीच जाहीर केला होता. आता प्रशासन प्रस्ताव तयार करून राज्य सरकारकडे पाठविणार आहे. सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर पुढील औपचारिक प्रक्रिया सुरू होईल.

क्रेडिट रेटिंग मिळविण्यात योगदान दिल्याबद्दल महापौर ठाकरे यांनी स्थायी समिती अध्यक्ष शिवानी दानी-वाखारे, सत्तापक्ष नेते नरेंद्र बोरकर, महापालिका आयुक्त विपीन इतनकर, सदाशिव शेळके तसेच आर्थिक सल्लागार ए. एस. कुलकर्णी ॲण्ड असोसिएट्स यांचे कौतुक केले.

Maharashtra TimesAmravati Hospital Fire: फायर ऑडिट कडे द़ुर्लक्ष, स्वस्त अन् निकृष्ठ दर्जाची उपकरणे रडारवर; मागच्या महिन्यातच दिला होता इशारा

नागनदी प्रकल्पासाठी २०० कोटींची उभारणी

नागनदी प्रदूषणमुक्ती प्रकल्प सुमारे १,९२७ कोटी रुपयांचा आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या सहभागातून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पात महापालिकेच्या आर्थिक वाटा ३०१ कोटी रुपये आहे. त्यापैकी २०० कोटी रुपये म्युनिसिपल बॉणडच्या माध्यमातून उभारण्याचा मनपाचा प्रयत्न आहे.

मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी निधी उभारताना अनुदानावरील अवलंबित्व आणि पारंपरिक कर्जाचा भार कमी करण्यासाठी बॉण्डचा पर्याय निवडण्यात येत आहे.महापौर नीता ठाकरे यांनी क्रेडिट रेटिंग मिळाल्याने महापालिकेसाठी निधी उभारणीचा नवा मार्ग खुला झाल्याचे सांगितले.

कांचन परुळेकर

लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.

कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.

२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.आणखी वाचा