Headlines

Nagpur Mother Son Reunion Lady left Home found in Mental Hospital; आई आता जिवंत नसावी, घर सोडलेल्या माऊलीबद्दल लेकराचा समज, अडीच वर्षांनी चमत्कारिक भेट, मायलेकाला अश्रू अनावर


Nagpur News : अडीच वर्षांनंतर आईला जिवंत पाहणे, हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा क्षण आहे, अशी भावना व्यक्त करत आईला मिठी मारताना मुलाच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले. तेव्हा उपस्थितांचेही डोळे पाणावले.

Nagpur Mother Daughter Reunion Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : ‘मानसिक आजारामुळे आईने घर सोडले. शोध घेऊनही न सापडल्याने शेवटी ‘आई आता जिवंत नसावी’, असे मानून आम्ही आयुष्य पुढे नेले. आज अडीच वर्षांनंतर आईला जिवंत पाहणे, हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा क्षण आहे”, अशी भावना व्यक्त करत आईला मिठी मारताना मुलाच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले आणि उपस्थितांचेही डोळे पाणावले.

नागपुरातील प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल

४२ वर्षीय लक्ष्मी (नाव बदललेले) यांना ११ मार्च २०२६ रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती पोलिसांनी शोधून काढल्यानंतर न्यायिक प्रथम वर्ग दंडाधिकारी (जेएमएफसी) यांच्या आदेशानुसार नागपुरातील प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्या मानसिकदृष्ट्या स्थिर झाल्यानंतर त्यांच्या नातेवाइकांचा शोध घेण्याची जबाबदारी स्त्री विभागाच्या समाजसेवा अधीक्षक कुंदा काटेखाये (बिडकर) यांनी स्वीकारली.

Maharashtra TimesPune News : लग्नाच्या दहा वर्षांनी पाळणा हलला, पण मोशी दुर्घटनेत 25 दिवसांच्या बाळाचं पितृछत्र हरपलं; लेकराने कष्टाळू वडील गमावलेअडीच वर्षांनंतर लक्ष्मीला आपले कुटुंब मिळवून दिले. रुग्णाच्या निरोप समारंभप्रसंगी स्त्री विभागाच्या मानसोपचारतज्ज्ञ डॉ. कृणाली उईके, समाजसेवा सिस्टर सत्कार आणि पंचशीला रोकडे उपस्थित होत्या. हा कार्यक्रम प्रादेशिक मनोरुग्णालय, नागपूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमरीश मोहबे आणि उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. पंकज बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

Latur | नीट पेपर फुटी प्रकरण, कुलकर्णी-मोटेगावकरांमधील मध्यस्थी डॉ. शिरुरेला सीबीआयकडून अटक

तमिळ भाषेमुळे संभाषणात अडथळे

रुग्ण केवळ तमिळ भाषेत बोलत असल्याने तिच्याकडून मिळणारी माहिती समजून घेणे अत्यंत कठीण होते. नागपुरातील डॉक्टर्स आणि आंध्र प्रदेशातील अधिकाऱ्यांनी या माहितीचे विश्लेषण करायला सुरुवात केली. गुगल ट्रान्सलेटरचीही मदत घेण्यात आली. तमिळनाडू येथील कडलूरचे जिल्हाधिकारी सीबी अधिथ्या सेंथिल कुमार यांच्याशी संपर्क साधण्यात आला.

Maharashtra TimesKeerthana Menon : अरेंज मॅरेज टाळण्यासाठी केस भादरले, मुंडण करताना तरुणीचा व्हिडिओ समोर, “लग्नानंतर एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यापेक्षा…”

अडीच वर्षाने मुलाचा शोध

तेलुगू आणि तामिळ भाषेतील फरकामुळे सुरुवातीला रुग्णाने दिलेली माहिती अचूक मिळू शकली नाही. त्यानंतर काही स्वयंसेवी संस्थांकडे शोधकार्य सोपविण्यात आले. रेल्वे स्थानक, ऑटो स्टँड, बाजारपेठा येथेही शोध मोहीम राबविण्यात आली. अखेर संस्थेच्या प्रतिनिधींनी त्या महिलेशी संवाद साधत मुलाचा शोध लावला. तब्बल अडीच वर्षांनंतर आई आणि मुलाचे पुनर्मिलन घडून आल्याचा आनंद सोहळा मनोरुग्णालयात पाहायला मिळाला.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा