Nagpur Manewada and Kamathi Minor Girl Young Girl Died in Terrible Accident; बाईकवरून जाताना अचानक तोल गेला, मागून येणाऱ्या बसची धडक; तरुणीचा जागीच मृत्यू
Nagpur Manewada and Kamathi Minor Girl Young Girl Died in Terrible Accident; बाईकवरून जाताना अचानक तोल गेला, मागून येणाऱ्या बसची धडक; तरुणीचा जागीच मृत्यू
Nagpur Accident News : राज्यात अपघातांचं प्रमाण वाढत चाललं आहे. असाच एक भीषण अपघात नागपुरात घडलेला आहे. या अपघातात एका चिमुरडीचा आणि एका तरुणीचा मृत्यू झाला आहे.
नागपूर अपघात बातम्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जितेंद्र खापरे, नागपूर : नागपुरात शुक्रवारी घडलेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत एका पाच वर्षीय चिमुकलीसह तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. मानेवाडा परिसरात भरधाव कारने धडक दिल्याने पाच वर्षीय मुलीचा मृत्यू झाला, तर कामठी मार्गावर ई-बाईकवरील तरुणी दुभाजकावर आदळून मनपाच्या इलेक्ट्रिक बसच्या चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या दोन्ही घटनांमुळे शहरात हळहळ व्यक्त होत असून, पोलिसांकडून अपघातांचा तपास सुरू आहे.
मानेवाड्यात भरधाव कारची चिमुकलीला धडक
मानेवाडा परिसरातील महाकाली नगरातील बद्रीनाथ सोसायटीजवळ गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हा हृदयद्रावक अपघात झाला. किशा गुरनुले (वय 5 वर्षे) ही जेवण झाल्यानंतर शेजाऱ्यासोबत घराबाहेर फेरफटका मारण्यासाठी रस्त्यावरून जात होती. त्याचवेळी गौरव मालवीय याने भरधाव वेगाने चालविलेल्या काळ्या रंगाच्या कारने किशाला जोरदार धडक दिली.
धडकेत किशा गंभीर जखमी झाली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर तिला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच हुडकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. किशाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी कारचालक गौरव मालवीय याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर परिसरात शोककळा पसरली असून, दोषी चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी कुटुंबीय आणि नातेवाईकांनी केली आहे.
कामठी मार्गावर तरुणीचा बसखाली येऊन मृत्यू
दरम्यान, शुक्रवारी नागपूरच्या कामठी मार्गावर आणखी एक भीषण अपघात झाला. सायोना पब्लिक स्कूलसमोर अंजली पांडे ही तरुणी ई-बाईकवरून जात असताना अचानक दुचाकीवरील नियंत्रण सुटले. रस्त्याचे बांधकाम सुरू असल्याने या मार्गावर एकाच बाजूने दोन्ही दिशांची वाहतूक सुरू होती. याच मार्गावरील खड्ड्यामुळे ई-बाईकचा ताबा सुटल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
अंजली रस्त्यावर कोसळल्यानंतर मागून येणाऱ्या नागपूर महानगरपालिकेच्याइलेक्ट्रिक बसच्या चाकाखाली आली. या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कपिलनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मनपाच्या इलेक्ट्रिक बसचालकाला ताब्यात घेतले असून, अपघात नेमका रस्त्यावरील खड्ड्यामुळे झाला की अन्य कोणत्या कारणामुळे, याचा तपास सुरू आहे. एका बाजूला घराबाहेर पडलेल्या अवघ्या पाच वर्षांच्या चिमुकलीचा भरधाव कारच्या धडकेत जीव गेला, तर दुसरीकडे रस्त्याच्या परिस्थितीमुळे तरुणीला जीव गमवावा लागल्याची शक्यता आहे. सलग घडलेल्या या दोन अपघातांनी नागपुरातील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा