Headlines

Nagpur Khushi Mundhada dies in Accident near Sangli Hospital last rites at Ambazari Ghat Crime News; मुंबईत मेडिकल शिक्षण, उदयोन्मुख डॉक्टर तरुणी खुशी मुंधडा मृत्यू, रुग्णसेवेनंतर मध्यरात्री घरी जाताना काळाचा घाला


Nagpur Doctor Khushi Mundhada Death : बुधवारी रात्री अडीच वाजता नेहमीप्रमाणे निवासी सेवा देऊन डॉ खुशी मुंधडा हॉस्पिटलमधून मोपेडने घरी जात असताना एका कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.

Nagpur Khushi Mundhada dies Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नागपूर : नागपुरातील महिला डॉक्टरचा सांगलीत झालेल्या अपघातात मृत्यू झाला. खुशी पवन मुंधडा (वय २५, रा. दिग्विजय अपार्टमेंट, शिवाजीनगर) असे मृत डॉक्टरचे नाव आहे.

कुटुंबातील मोठी मुलगी

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर शहरातल्या शिवाजी नगर भागात माहेश्वरी समाजातील मुंधडा कुटुंब राहतं. पवन मुंधडा यांचा स्वतःचा व्यवसाय आहे, तर त्यांची पत्नी मानसोपचार समुपदेशक. त्यांना खुशी, पार्थ आणि पूर्वा अशी तीन मुलं. त्यापैकी सर्वांत मोठ्या खुशी यांनी २०२४ मध्ये मुंबईतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय पदवीचे शिक्षण पूर्ण केले.

शल्यक्रिया विभागात पदव्युत्तर एमएस अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे ध्येय ठेवत दुसऱ्याच वर्षी त्यांनी सांगलीतल्या भारती विद्यापीठ अभिमत विद्यापीठ मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता.

हॉस्पिटलमधून घरी जाताना अपघात

बुधवारी रात्री अडीच वाजता नेहमीप्रमाणे निवासी सेवा देऊन खुशी या हॉस्पिटलमधून मोपेडने घरी जात होत्या. त्यावेळी कारने त्यांच्या मोपेडला धडक दिली. सोबत दुसऱ्या दुचाकीने प्रवास करणाऱ्या निवासी डॉक्टरने खुशी यांना रुग्णालयात नेले, मात्र कारच्या चाकाखाली चिरडून गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना प्राण गमवावे लागले.

Maharashtra TimesVikhroli Crime : घाणेरडी गाणी लावल्याने वाद, जाऊबाईंचं दाराजवळ संतापजनक कृत्य, विक्रोळीत पती-मुलगा गमावलेल्या अंजूचा हादरवणारा जबाबआज, शुक्रवारी त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. एका उदयोन्मुख डॉक्टरचा अकाली अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेने मुंधडा परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

कारचा दरवाजा उघडल्याने पुण्यात एकाचा मृत्यू

दुसरीकडे, रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कारचे दार मागून येणाऱ्या वाहनांची खात्री न करता अचानक उघडले. यामुळे झालेल्या अपघातात फूड डिलिव्हरी करणाऱ्या २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना पुण्यातील हडपसर येथील डी. पी. रस्त्यावर घडली. या प्रकरणी कार चालकाविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra TimesPune Crime : शाळेपासून अफेअर, पुण्यात जाताच निकिता विसरली; संतप्त तरुणाने हिंजवडी गाठली, एक्सच्या प्रियकराला जीवानिशी संपवलंमार्फत फकीर अली (वय २७) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी त्याचा भाऊ अब्दुल सलाम फकीर अली यांनी तक्रार दिली आहे. १७ जुलै रोजी दुपारी हा अपघात झाला. तेव्हापासून मार्फत अली रुग्णालयात मृत्युशी झुंज देत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्फत फूड डिलिव्हरीसाठी जात असताना रस्त्याकडेच्या कारमधील चालक रज्जाक लालासाहेब नदाफ (३०) याने मागून येणाऱ्या वाहनांची खात्री न करता कारचे दार अचानक उघडले. त्यामुळे मार्फतची दुचाकी दाराला जोरात धडकली आणि तो रस्त्यावर कोसळून गंभीर जखमी झाला.