Headlines

Nagpur Kewalramani High School Student Dies after Suffering from Dizziness in School; ‘माझा जीव गेलाय’; शाळेत चक्कर येऊन खाली कोसळला, चिमुकल्याचा हृदयद्रावक अंत, आईचा काळीज पिळवटणारा आक्रोश


Nagpur Student Dies due to Dizziness : नागपुरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. शाळेत चक्कर येऊन एका चिमुकल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. यावेळी आईने एकच आकांत केला.

Nagpur Student Dies due to Dizziness
विद्यार्थ्याचा चक्कर येऊन मृत्यू(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जितेंद्र खापरे, नागपूर : नागपूर शहरातील जरीपटका परिसरातील राजकुमार केवलरामाणी हायस्कूलमध्ये तिसरी तिसऱ्या वर्गामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेत प्रकृती बिघडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल बुधवारी घडली. या घटनेमुळे शाळा परिसरासह संपूर्ण भागात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी शाळा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप करत सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

अचानक चक्कर आणि खाली कोसळला

मिळालेल्या माहितीनुसार, खणीत कटरे हा विद्यार्थी राजकुमार केवलरामाणी हायस्कूलमध्ये तिसऱ्या वर्गात शिक्षण घेत होता. बुधवारी दुपारच्या सुट्टीदरम्यान तो इतर विद्यार्थ्यांसोबत शाळेच्या मैदानात असताना त्याला अचानक चक्कर आली आणि तो जमिनीवर कोसळला. घटनेची माहिती मिळताच शिक्षक आणि शाळेतील कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी खणीतला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली. मुलाच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.
Maharashtra TimesFarmer Loan Waiver 2026 : बळीराजासाठी सुखकर बातमी! कर्जमुक्तीला अखेर सुरुवात, लाभार्थींची प्रातिनिधिक यादी जाहीर; किती लाख जमा होणार?

‘माझा जीव गेलाय’

मृत विद्यार्थ्याच्या आईने सांगितले की, ‘खणीत सकाळी घरून पूर्णपणे ठणठणीत अवस्थेत शाळेत गेला होता. तो जेवण करूनच घरातून निघाला होता. शाळेतही त्याची प्रकृती ठीक होती. मात्र, दुपारी अचानक शाळेतून फोन आला आणि तो मैदानात बेशुद्ध पडल्याची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्यानंतर त्याला योग्यवेळी आवश्यक वैद्यकीय उपचार मिळाले नाहीत. तसेच शाळा प्रशासनाने पुरेशी तत्परता दाखवली नसल्यामुळे हा दुर्दैवी प्रकार घडल्याचा त्यांचा दावा आहे. माझा जीव गेलाय, या संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी’, अशी मागणी त्यांनी केली आहे.
Maharashtra TimesCrime News : ‘तुम्ही ‘वेलकम हॉटेल’ला या’; विभक्त राहणारा नवरा बायकोला भेटायला गेला, हॉटेलच्या रुममध्ये संतापजनक कृत्य
तर दुसरीकडे, शाळा प्रशासनाने विद्यार्थ्याला चक्कर आल्यानंतर तातडीने रुग्णालयात हलविण्यात आल्याचे सांगितले आहे. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असून, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आणि वैद्यकीय तपासणीनंतरच स्पष्ट होईल, असे शाळेकडून सांगण्यात आले. दरम्यान, या प्रकरणाची पोलिसांकडून आणि संबंधित यंत्रणांकडून चौकशी सुरू असून, शवविच्छेदन अहवाल आणि प्राथमिक तपासानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. तपासाच्या निष्कर्षानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा