Nagpur Crime News: प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या पतीला पत्नीने प्रियकरासह त्याच्या मित्राच्या मदतीने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

हत्येमागील पार्श्वभूमी मृत अशोक मीना आणि कौशल्याबाई यांचे २१ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. हे दाम्पत्य वेरूळ येथे शेतात आले काढण्याचे काम करीत होते. या दरम्यान, आले व्यावसायिक असलेल्या रियाज शहा याच्याशी कौशल्याबाईची ओळख झाली आणि त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. ही बाब पती अशोक यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पत्नीला गावी मध्य प्रदेशला परत चालण्याचा आग्रह धरला. यामुळे आपल्या प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीचा कायमचा काटा काढण्याचा कट पत्नी कौशल्याबाई आणि प्रियकर रियाजने आखला.
Nagpur Crime: कुख्यात एमडी तस्कर आशी डेला निर्घृणपणे संपवलं; कन्हान नदीत फेकली बॉडी, प्रियकराचा शोध सुरु
बुधवारी २९ जुलै रोजी रियाजने काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून अशोक यांना सिल्लोड येथे बोलावून घेतले. शहरात काही वेळ फिरवल्यानंतर, दुपारी भोकरदन रस्त्यावरील नगरपालिकेच्या पाण्याच्या टाकीजवळ रियाज आणि त्याचा मित्र आकाश यांनी कटरने अशोक यांचा गळा चिरला आणि डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केली. शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक शामसुंदर कौठाळे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष मिसळे, विजयसिंह राजपूत, उपनिरीक्षक लहू घोडे, शहर ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद भिंगारे, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कायंदे व शहर, गुन्हे शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी गुन्ह्याचा तपास केला.
Tukaram Mundhe : एआय वाईट नाही, पण वापरावर यश अवलंबून; तुकाराम मुंढेंचा सल्ला, सोशल मीडियावर दिसतं म्हणून प्रत्येक रील खरं नसतं
हातावर गोंदवलेले नाव
घटनेनंतर आरोपी पसार झाले होते. मृतदेहाच्या हातावर गोंदलेले नाव (मीना) पाहून पोलिस तपासाची चक्रे फिरली. सिल्लोड शहर व गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तांत्रिक बाबी आणि गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या पाच दिवसांत या हत्येचा गूढ उकलला. पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई करीत पत्नी कौशल्याबाईसह तिन्ही आरोपींना गजांआड केले.

