Headlines

Nagpur Crime: सोबत राहण्यास नकार, महिलेला बेडरुममध्ये डांबून हॉटेल मालकाची मारहाण, Video व्हायरल करण्याचीही धमकी – hotel owner confines woman in bedroom and threatens to circulate objectionable photograph in nagpur


Nagpur Crime: आक्षेपार्ह छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी देऊन एका महिलेला बेडरुममध्ये डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हॉटेल मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

nagpur crime
नागपूर क्राईम(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, नागपूर: सोबत राहण्यास नकार दिल्याने हॉटेल मालकाने बेडरुममध्ये डांबून पत्नीसमोरच महिलेला मारहाण केली. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी हॉटेल मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी आरोपी सिद्धार्थ सुनील अग्रवाल (वय ४०, रा. दरबारी अपार्टमेंट, क्लार्क टाउन) याच्याविरुद्ध ३६ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या महिलेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, गेल्या दोन वर्षांपासून ती सिद्धार्थला ओळखत असून त्याचे सावनेर मार्गावर ड्राइव्ह अॅण्ड डाइन नावाचे हॉटेल आहे. सिद्धार्थ विवाहित आहे. त्याला दोन अपत्ये आहेत. गेल्या वर्षभरापासून सिद्धार्थ हा महिलेला त्रास द्यायचा. सोबत राहण्यासाठी तिच्यावर दबाव टाकायचा. याबाबत महिलेने सिद्धार्थच्या पत्नीलाही सांगितले. मात्र तिने मदत केली नाही. शनिवारी सकाळी सिद्धार्थने महिलेच्या मोबाइलवर संपर्क साधला.

Maharashtra TimesPraful Gudadhe On Vishwas Nagre Patil: विश्वास नांगरे पाटील माझा एन्काऊंटर करतील; नागपूर काँग्रेस शहराध्यक्षांचा गंभीर आरोप
‘माझ्याकडे तुझी आक्षेपार्ह छायाचित्रे आहेत. ती समाजमाध्यमांवर व्हायरल करेन’, अशी धमकी दिली. पीडित महिलेने याबाबत सिद्धार्थच्या पत्नीला सांगितले. सिद्धार्थच्या पत्नीने तिला घरी बोलाविले. महिला मित्रासह सिद्धार्थच्या घरी गेली. त्यानंतर सिद्धार्थची पत्नी तिला बेडरुममध्ये घेऊन गेली. मागोमाग सिद्धार्थही खोलीत आला. त्याने दरवाजा बंद करीत महिलेला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तिचा गळा आवळला. महिलेने त्याच्या तावडीतून सुटका केली. दरवाजाची कडी उघडून बाहेर आली. यावेळी सिद्धार्थने तिच्यावर कैचीने हल्ला केल्याने तिच्या नाकाला जखम झाली. त्यानंतर महिला मित्रासह तेथून निघाली. तिने पोलिस ठाणे गाठून तक्रार केली. पोलिसांनी सिद्धार्थविरुद्ध हल्ल्यासह विविध कमलांन्वये गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

Maharashtra TimesCrime News: ‘गे’ डेटिंग ॲपवरून मैत्री, भेटायला बोलावलं अन् नंतर तरुणासोबत भयंकर प्रकार; सीसीटीव्ही फुटेजमधून बिंग फुटलं!
भाच्याकडून आत्याला मारहाण
‘तू मळ्यात का आली, असे म्हणत वृद्ध आत्याला भाच्यांनी दांड्याने मारहाण केली. घटना २७ जूनला गोकुळवाडी (ता. गंगापूर) येथे घडली. या प्रकरणी भागाबाई हिराचंद घुसिंगे यांच्या तक्रारीनुसार, भागाबाई यांना त्यांची नातेवाइक धर्माबाई सुलाने यांना भाचे मारहाण करीत असल्याची माहिती मिळाली. हे भांडण सोडविण्यासाठी भागाबाई घुसिंगे या मळ्यात गेले असता, या ठिकाणी अमोल सीताराम सुलाने आणि राहुल सीताराम सुलाने या दोघांनी भागाबाई घुसिंगे यांना लाकडी दांड्याने मारहाण करून जखमी केले. मारहाण करणाऱ्या अमोल आणि राहुल सुलाने या दोघांच्या विरोधात दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा