Headlines

Nagpur 17 year old hiten dharpure breaks world record by developing the smallest robotic arm; महाराष्ट्रातील पठ्ठ्याची कमाल! जागतिक विक्रम मोडत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान; सर्वात लहान रोबोटिक आर्म विकसित


नागपूर : नागपूरच्या अवघ्या १७ वर्षीय हितेन धारपुरे याने आपली कल्पकता, तांत्रिक कौशल्य आणि जिद्दीच्या जोरावर जागतिक पातळीवर ऐतिहासिक कामगिरी करत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले आहे. हितेनने जगातील सर्वात लहान, पूर्णतः कार्यक्षम रोबोटिक आर्म विकसित करून यापूर्वीचा जागतिक विक्रम मोडीत काढला आहे.

यापूर्वी जगातील सर्वात लहान रोबोटिक आर्मचा विक्रम अमेरिकेतील इंडियाना येथील केल्टन सेरा यांच्या नावावर होता. त्यांनी विकसित केलेल्या ४४.४९ मिलिमीटर (१.७५ इंच) आकाराच्या ३डी-प्रिंटेड रोबोटिक आर्मला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची मान्यता मिळाली होती. मात्र, हितेनने केवळ ३९.२५० मिलिमीटर आकाराचा पूर्णपणे कार्यक्षम रोबोटिक आर्म तयार करून हा विक्रम मोठ्या फरकाने आपल्या नावावर केला. हितेनने विकसित केलेला ही रोबोटिक आर्म अत्याधुनिक इलेक्ट्रो-मेकॅनिकल प्रणालीवर आधारित असून तो मानवी हाताप्रमाणे विविध हालचाली करू शकते. या आर्ममध्ये मायक्रो सर्वो मोटर्स आणि उच्च अचूकतेचे पीडब्ल्यूएम कंट्रोल मॉड्यूल वापरण्यात आले आहे. तीन स्वतंत्र अक्षांवर हालचाल करण्याची क्षमता असलेल्या या उपकरणाद्वारे अत्यंत लहान वस्तूही अचूकपणे पकडता येतात.

या प्रकल्पासाठी हितेनने एफडीएम (FDM) तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतः कस्टम चेसिस डिझाइन केले आणि ३डी प्रिंटिंगद्वारे त्याची निर्मिती केली. अत्यंत मर्यादित जागेत सर्वो मोटर्स, इलेक्ट्रॉनिक घटक आणि वायरिंगचे अचूक नियोजन करणे हे या प्रकल्पातील सर्वात मोठे आव्हान होते. मात्र, सूक्ष्म नियोजन आणि तांत्रिक कौशल्याच्या जोरावर त्याने हे आव्हान यशस्वीरीत्या पेलले.

आपल्या यशाबद्दल बोलताना हितेन धारपुरे म्हणाला की, सहज उपलब्ध तंत्रज्ञानाचा वापर करूनही जागतिक दर्जाचे, उच्च अचूकतेचे रोबोटिक्स विकसित करता येतात, हे सिद्ध करण्याचा त्याचा प्रयत्न होता. सूक्ष्म उत्पादन तंत्रज्ञानाच्या मर्यादा ओलांडून नवकल्पना साकार करता येतात, हा संदेश या प्रकल्पातून द्यायचा होता. विकसित भारताच्या उभारणीत हे आपले छोटेसे योगदान असल्याचेही त्याने सांगितले.

दरम्यान, या प्रकल्पाने अत्यंत कमी जागेतही उच्च दर्जाचे रोबोटिक उपाय विकसित करता येतात, हे सिद्ध केले आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हितेनची ही कामगिरी प्रेरणादायी ठरत आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत