एन चंद्रशेखरन यांच्या राजीनामा या विषयामुळे भारतीय बाजारपेठेत चर्चेला उधाण आले आहे. अशामध्ये त्यांच्या पगाराविषयीही अनेक ठिकाणी चर्चा केल्या जात आहेत. काही रिपोर्ट्सच्या माध्यमातून त्यांच्या 5 वर्षांच्या कार्यकाळातील कमाईचा एकूण आकडा समोर आला आहे. आर्थिक वर्ष 2026 मध्ये एन चंद्रशेखरन यांनी 158.6 कोटी इतकी कमाई केली आहे. गेल्या 4 वर्षांपासून त्यांची वार्षिक कमाई शेकडो कोटींमध्ये आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की एन चंद्रशेखरन यांचा वार्षिक पगार शेकडो कोटींमध्ये आहे. त्यांचा पगार फिक्स्ड असून कमिशन म्हणून त्यांना वरची कमाईसुद्धा मिळत असे.
मग एन चंद्रशेखरन यांचा एकून निश्चित पगार किती?
टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांचा निश्चित पगार 17.9 कोटी रुपये इतका आहे. त्यांना मिळणारी अतिरिक्त रक्कम हा कंपनीने केलेल्या नफ्यावरील कमिशन होता. एकंदरीत, एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये सर्वोच्च स्थानी असणाऱ्या मंडळींचा कंपनीच्या एकूण नफ्यात, महसुलात होणाऱ्या वाढीमध्ये, मोठ्या गुंतवणुकीत तसेच कंपनीच्या परदेशातील विस्तारामध्ये मोठा हातभार असतो. अशामध्ये या मंडळींना त्यांच्या या महत्वपूर्ण योगदानासाठी बक्षीस म्हणून कमिशन देण्यात येते.
एकंदरीत, एन चंद्रशेखरन यांचा ठरवलेला पगार जरी 17.9 कोटी रुपये इतका असला तरी कंपनीतील त्यांच्या महत्वपूर्ण योगदानामुळे त्यांना कंपनीच्या नफ्यावरील कमिशनही पुरवण्यात येते. त्यामुळेच 17.9 कोटी वेतन असूनही वार्षिक कमाई शेकडो कोटींच्या घरात आहे.
Gold Price Today: सोन्याचा पारा चढला! पिवळसर धातूचा भाव वधारलेलाच, चांदीच्या किमतीही आवाक्याबाहेर; ही तेजी टिकणार का?गेल्या 5 वर्षांमध्ये साडे सहाशे कोटींपेक्षा जास्त कमाई!
एन चंद्रशेखरन यांनी गेल्या 5 वर्षांत 658 कोटी रुपयांची एकूण कमाई केली आहे. तर गेल्या 4 वर्षातील कमाईचा आकडा पाहिला तर तो दरवर्षी शेकडो कोटींच्या घरात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष 2022 मध्ये एन चंद्रशेखरन यांना 94 कोटींच्या आसपास कमिशन मिळाले. आर्थिक वर्ष 2023 चा आकडा पाहिलात तर त्यांची एकूण कमाई 121 कोटी रुपये इतकी होती.
आर्थिक वर्ष 2024 मधील एन चंद्रशेखरन यांच्या कमाईचा एकूण आकडा 134.8 कोटी रुपये इतका होता. तसेच आर्थिक varsh 2025 च्या आकड्यात त्यांची एकूण कमाई 155 कोटी रुपये इतकी दाखवण्यात येत आहे. यंदाच्या वर्षात त्यांनी आजपर्यंतची सगळ्यात जास्त कमाई केली असून आकडा 158.6 कोटी रुपये इतका आहे.
Tata Sons च्या चेअरमनला किती असतो पगार?
Tata Sons चे वर्तमान चेअरमन एन चंद्रशेखरन होते, त्यांनी नुकताच राजीनामा दिला असून फेब्रुवारी 2027 पर्यंत ते कारोभार सांभाळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या नंतर नवीन चेअरमनची नियुक्ती होईल. जरी एन चंद्रशेखरन यांचा ठरलेला पगार 17.9 कोटी असला तरी पुढील चेअरमनच्या खिशातही तितकीच रक्कम पगार म्हणून येईल असे नाही. या गोष्टी पूर्णपणे पगारासंदर्भात असणाऱ्या अटींवर ठरवले जाईल. तसेच मिळणारे कमिशन कंपनीच्या नफ्यावरून तसेच संपूर्ण कामगिरीवरून ठरवले जाते.

