Headlines

N Chandrasekaran Success Story; छोट्या गावातील शेतकरी कुटुंबात जन्मलेला मुलगा, इंटर्नशिपसाठी आले अन् टाटांचे झाले; फक्त पैसा नाही, तर देशाचं भविष्य उभं केलं

Tata Sons Chairman N Chandrasekaran: टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, पण फेब्रुवारी 2027 मधील सध्याच्या कार्यकाळाच्या समाप्तीपर्यंत या पदावर कार्यरत राहतील. टाटा सन्स ही टाटा समूहाची होल्डिंग कंपनी आणि समूह कंपन्यांची प्रवर्तक असून टाटा सन्समध्ये टाटा ट्रस्ट्सचा एकूण 66 टक्के हिस्सा आहे.

N Chandrasekaran Success Story TATA Sons
Businessman Success Story: नटराजन चंद्रशेखरन (एन. चंद्रशेखरन म्हणून लोकप्रिय) यांची भारतीय कॉर्पोरेट विश्वात प्रगती अत्यंत उल्लेखनीय राहिली. तामिळनाडूतील एका शेतकरी कुटुंबात लहानाचे मोठे होण्यापासून भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक समूहाचे प्रमुख बनण्यापर्यंत त्यांनीM जवळपास चार दशकांचा प्रवास पूर्ण केला. चंद्रशेखरन यांनी अलीकडेच टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला, तरी फेब्रुवारी 2027 मध्ये सध्याचा कार्यकाळ संपेपर्यंत या पदावर कायम राहतील.

कोण आहेत एन. चंद्रशेखरन

कोण आहेत एन. चंद्रशेखरन

एन. चंद्रशेखरन तब्बल नऊ वर्षांनंतर टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाले आणि यासह टाटा समूहातील जवळपास चार दशकांच्या कारकिर्दीचा शेवट झाला. 1963 मध्ये तामिळनाडूतील नामक्कलजवळील मोहनूर या छोट्या गावात जन्मलेल्या चंद्रशेखरन यांनी टाटा समूहात प्रशिक्षणार्थी म्हणजे इंटर्न प्रोग्रामर म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली आणि 1987 मध्ये पूर्णवेळ कर्मचारी म्हणून रुजू झाले.

कारकिर्दीत टाटा समूहालाच प्राधान्य दिले

कारकिर्दीत टाटा समूहालाच प्राधान्य दिले

चंद्रशेखरन यांनी सुरुवातीपासून आपली संपूर्ण कारकीर्द टाटा ग्रुपमध्ये घालवली. यादरम्यान, त्यांनी जवळपास 10 वर्षे भारताबाहेर अमेरिका, ब्रिटन आणि स्वीडनमध्ये टाटा ग्रुपसाठी काम केले. त्यानंतर TCS या भारतातील दिग्गज आयटी कंपनीतील आपला सहभाग वाढवला आणि कंपनीमध्ये हळूहळू स्थान उंचावले. आपल्या नेतृत्व कौशल्याने टाटा ग्रुपचे तत्कालीन प्रमुख रतन टाटांना प्रभावित केले. 2009 मध्ये चंद्रशेखरन यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा आला, जेव्हा टीसीएसचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक बनले. त्यांनी आठ वर्षे पदभार सांभाळला आणि या काळात ही आयटी सेवा कंपनी जगातील आघाडीच्या तंत्रज्ञान व सल्लागार कंपन्यांपैकी बनली.

2017 मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्षपदाची जबाबदारी

2017 मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्षपदाची जबाबदारी

रतन टाटांनी ऑक्टोबर 2016 मध्ये चंद्रशेखरन यांना टाटा सन्सच्या संचालक मंडळात सामील करून घेतले आणि काही महिन्यांनी जानेवारी 2017 मध्ये सायरस मिस्त्रीं च्या जागी त्यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाली. या काळात रतन टाटा आणि सायरस मिस्त्री यांच्यातील वाद माध्यमांच्या केंद्रस्थानी राहिला.

सायरस मिस्त्रींचा वाद अन् सर्वोच्च निर्णय

सायरस मिस्त्रींचा वाद अन् सर्वोच्च निर्णय

टाटा समूहामध्ये बरीच अटकळ आणि तर्कवितर्क सुरू असताना चंद्रशेखरन टाटा सन्सच्या अध्यक्षपदावर विराजमान होणारे पहिले बिगर-पारशी व्यक्तिमत्व होते. चंद्रशेखरन यांच्या पहिल्या कार्यकाळाचा मोठा भाग मिस्त्री अँड कंपनीसोबत समूहाच्या प्रदीर्घ कायदेशीर लढाईतच गेला. एका टप्प्यावर NCLAT ने त्यांची नियुक्ती बेकायदेशीर घोषित केली आणि मिस्त्रींना सर्वोच्च पदावर पुन्हा नियुक्त करण्याचे आदेश दिलेले पण, नंतर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय रद्द केला.

एन चंद्रशेखरन यांचे शिक्षण किती

एन चंद्रशेखरन यांचे शिक्षण किती

1984 मध्ये एन चंद्रशेखरन यांनी कोयंबतूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून उपयोजित विज्ञान शाखेतील विज्ञान स्नातक पदवी पूर्ण केली. त्यानंतर 1986 मध्ये आता NIT त्रिची म्हणून ओळखले जाणारे प्रादेशिक अभियांत्रिकी महाविद्यालय येथून संगणक अनुप्रयोग शाखेतील पदव्युत्तर पदवी घेतली.

टाटा समुहात चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ

टाटा समुहात चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ

टाटा ग्रुपमधील आपल्या कार्यकाळात चंद्रशेखरन यांनी मीठापासून सॉफ्टवेअर आणि ऑटोमोबाईलपर्यंत सर्व गोष्टींचे उत्पादन करणाऱ्या टाटा समूहाला पूर्णपणे नवे स्वरूप दिले. विमानचालन, सेमीकंडक्टर, इलेक्ट्रॉनिक्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांसारख्या भविष्यवेधी उद्योगांमध्ये टाटा समूहाचा विस्तार केला तर, आता काही महिन्यांतच त्यांचा कार्यकाळ संपणार असताना चंद्रशेखरन यांच्या कार्यकाळानंतर सुमारे 40 वर्षांनी टाटा समूहाची उलाढाल 400 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा