Mumbra Local Train Accident Thane GRP Constable Vicky Mukhyadal Death Wife waits for job a year after Crime News; चार वर्षांचा संसार अर्धवट, लेकाच्या बर्थडेच्या तोंडावर रेल्वे पोलिसाचा झालेला अंत, वर्षभरानंतरही पत्नी नोकरीच्या प्रतीक्षेत
Mumbra Local Train Accident Thane GRP Constable Vicky Mukhyadal Death Wife waits for job a year after Crime News; चार वर्षांचा संसार अर्धवट, लेकाच्या बर्थडेच्या तोंडावर रेल्वे पोलिसाचा झालेला अंत, वर्षभरानंतरही पत्नी नोकरीच्या प्रतीक्षेत
Vicky Mukhyadal : ७ जूनला विकी यांचा वाढदिवस झाला होता, तर १७ जूनला विकी यांचा मुलगा प्रणय याचा वाढदिवस असतो, मात्र ९ जून २०२५ रोजी मुंब्रा येथे झालेल्या अपघातात लोकलमधून पडून त्यांचे निधन झाले
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. वृत्तसेवा, ठाणे : अवघ्या चार वर्षांच्या संसारानंतर अर्ध्यावर डाव मोडून पत्नी आणि मुलाला मागे सोडून गेलेल्या रेल्वे पोलिस कर्मचारी विकी मुख्यदल यांच्या मृत्यूला आज वर्ष पूर्ण झाले. मात्र पतीच्या आठवणीत हरवलेल्या दीपाली अजूनही धक्क्यात आलेत. आपल्या एकुलत्या एका मुलाच्या भविष्यासाठी पतीच्या जागेवर नोकरी मिळण्याची त्यांना अपेक्षा आहे. त्यासाठी आवश्यक ती कार्यवाही पूर्ण झाली असून मेडिकल नंतर नोकरीचे नेमणूक पत्र दिले जाणार असल्याचे पोलिस खात्याकडून सांगण्यात आले.
ड्युटीवर असताना मृत्यूने गाठलं
सध्या जालना येथे आपल्या आईवडिलांकडे असलेल्या दीपाली नोकरीच्या कामासाठी अधूनमधून कल्याणात येत असतात. तर मुलाला त्यांनी तिथल्याच शाळेत दाखल केल्याचे सांगितले. रेल्वे पोलिस दलात चार वर्षापासून नोकरी करणारे विकी मुख्यदल हे नेहमीप्रमाणे ९ जून २०२५ रोजी ठाणे रेल्वे स्थानकात ड्युटीवर जात होते. कल्याण ते ठाणेदरम्यान मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ इतर काही प्रवाशांसह रेल्वेतून खाली पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यांच्या मागे पत्नी दीपाली, तीन वर्षाचा मुलगा प्रणय, आई वडील आणि छोटा भाऊ असा परिवार आहे.
पतीच्या मृत्यूनंतर एकट्या पडलेल्या दीपाली या पतीची बॉडी घेऊन जालना येथील घरी गेल्या होत्या. तेव्हापासून त्या आपल्या आई वडिलांकडे राहत असून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून मिळणाऱ्या मदतीवर पत्नीसह आई वडील आणि नातेवाईकांनी दावा केल्यानंतर ही रक्कम सरकारच्या तिजोरीतच पडून आहे. तर रेल्वे प्रशासनाकडून अद्याप जाहीर केलेली मदत त्यांना मिळालेली नाही.
दरम्यान, दिवा-मुंब्रा दरम्यानच्या रेल्वे रुळांच्या वळणाची तपासणी केल्यानंतर ‘शेड्युल ऑफ डायमेंशन’मध्ये कोणतीही तांत्रिक त्रुटी आढळली नाही, असे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे. दिवा स्थानकातून सीएसएमटीच्या दिशेने लोकल सुरू करण्यासाठी तीन ते चार रेल्वे मार्ग ओलांडावे लागतील, त्यामुळे इतर लोकल फेऱ्यांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. म्हणूनच ही योजना व्यवहार्य नसल्याचे मध्य रेल्वेचे म्हणणे आहे. परंतु वाढत्या प्रवासी संख्येच्या तुलनेत पर्यायी उपाय योजना दिसून येत नसल्याने वर्षभरानंतर तशीच स्थिती आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा