Headlines

Mumbais Beloved Vada Pav Costs 600 rs in America Viral Video Surprises Netizens | अमेरिकेत मुंबईचा वडापाव किती रुपयांना मिळतो? मराठी महिलेनं दाखवली किंमत, लोक म्हणताहेत एवढ्या पैशांत अख्खं गाव खाईल


Mumbai Street Food: मुंबईकरांच्या आवडत्या वडापावची लोकप्रियता आता अमेरिकेतही पोहोचली आहे. मात्र, तिथे एका वडापावसाठी तब्बल ६०० रुपये मोजावे लागतात. हा व्हिडीओ पाहून खरंच तुम्ही देखील अचंबित व्हाल.

Vada Pav in America
(ai generated images)
वडापाववर मुंबईकरांचं खास प्रेम आहे. किंबहुना, वडापाव हा मुंबईच्या जीवनशैलीचा एक अविभाज्य घटक आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण हा पदार्थ बनवायला अत्यंत सोपा आहे. तो झटपट तयार होतो, चविष्ट असतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खिशाला परवडतो. तुम्ही दोन वडापाव खाल्ल्यानंतर दुपारचं जेवण स्किप करू शकता. असो, पण मुंबईकरांचा आवडता वडापाव अमेरिकेत किती रुपयांना मिळतो, माहिती आहे का? नुसती किंमत पाहूनच तुमच्या पोटात ढवळेल. अहो, एवढ्या पैशात तुम्ही आपल्या कुटुंब आणि मित्र-मंडळींसोबत वडापाव पार्टी करू शकता.

किती रुपयांना मिळतो?

किती रुपयांना मिळतो?

हा व्हिडीओ अमेरिकेत राहणाऱ्या एका मराठी महिलेनं punekar_in_america या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिनं मुंबईच्या वडापावची किंमत तब्बल ६०० रुपये सांगितली आहे. म्हणजे अमेरिकन चलनात ६.२९ डॉलरला एक वडापाव मिळतो. हा व्हिडीओ ६ लाख ७१ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. आणि नेटकऱ्यांनीसुद्धा या व्हिडीओवर एकापेक्षा एक अतरंगी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
(फोटो सौजन्य – Rahul Sonawane/pexels.com)

अमेरिकेतसुद्धा वडापाव मिळतो?

​ ​

मुळात अमेरिकेत वडापावसुद्धा मिळतो, ही गोष्टच अनेकांसाठी आश्चर्याची आहे. कारण अमेरिका म्हटलं की बर्गर, पिझ्झा, हॉटडॉग, टॅकोस असे पदार्थ डोळ्यांसमोर येतात. पण या अमेरिकन पदार्थांमध्ये मुंबईचा वडापावदेखील आपलं नाव राखून आहे, ही गोष्ट खरंच मजेशीर आहे. असो, तुम्हाला वडापाव खायला आवडतो का? आणि तुम्ही आतापर्यंत सर्वात महागडा वडापाव किती रुपयांचा खाल्लाय? आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की द्या.

(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा