Headlines

Mumbai Raigad Ferry Service Closed from May 25 Maharashtra Maritime Board; पर्यटकांसाठी मोठी बातमी; अलिबाग फेरीला पावसाळी ब्रेक, कधीपासून सेवा बंद? पर्यटकांची नाराजी


Alibaug Ferry Service Closed from May 25 : मुंबईकरांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. 25 मेपासून फेरी सेवेला थांबा मिळणार आहे. येणाऱ्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Alibaug Ferry Service Closed from May 25
मुंबई अलिबाग फेरीसेवा २५ मेपासून बंद(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अमुलकुमार जैन, रायगड : मुंबई ते अलिबाग प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी आणि पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया ते रायगड जिल्ह्यातील मांडवा दरम्यान धावणाऱ्या प्रवासी फेरी सेवेला येत्या 25 मे 2026 पासून पावसाळी ब्रेक लागणार आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने सुरक्षेच्या कारणास्तव ही सेवा 31 ऑगस्ट 2026 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मुंबई-मांडवा जलवाहतुकीचा यंदाचा हंगाम संपुष्टात येणार असून 25 मे हा शेवटचा प्रवासी दिवस असणार आहे.

प्रवासी बोटींच्या सुरक्षिततेला धोका

दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात समुद्रातील मोठ्या लाटा, वादळी वारे आणि खराब हवामान लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. पावसाळ्यात अरबी समुद्र खवळत असल्याने प्रवासी बोटींच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रवासी जलवाहतूक बंद करण्यात येत असल्याचे महाराष्ट्र सागरी मंडळाने स्पष्ट केलं आहे.
Maharashtra TimesPune Crime : गर्लफ्रेंडच्या आईसोबत प्रेमसंबंध, आईच्या बॉयफ्रेंडचा तरुणीला संबंध तोडण्याचा सल्ला; रागातून पुण्यात तरुणाला मध्यरात्री संपवलं

काही प्रवाशांना दिलासा

पीएनपी, मालदार, अजंठा तसेच इतर खासगी कंपन्यांच्या गेटवे-मांडवा मार्गावरील फेरी बोटी 26 मे ते 31 ऑगस्टदरम्यान बंद राहणार आहेत. मात्र, मांडवा ते भाऊचा धक्का दरम्यानची रो-रो सेवा सुरू राहणार असल्याने वाहनधारक आणि काही प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. तसेच दिघी-आगरदांडा मार्गावरील जेट्टी वाहतूकही सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. मुंबईकरांसाठी अलिबाग हे अत्यंत लोकप्रिय पर्यटनस्थळ मानलं जातं. कमी वेळात, कमी खर्चात आणि समुद्रमार्गाच्या रोमांचक अनुभवामुळे गेटवे ते मांडवा फेरी सेवेला वर्षभर मोठी मागणी असते. विशेषतः शनिवार-रविवार आणि सुट्ट्यांच्या काळात हजारो पर्यटक या मार्गाने अलिबाग, नागाव, काशिद, मुरुड यांसारख्या पर्यटनस्थळांकडे रवाना होत असतात. मात्र, आता पुढील तीन महिने ही सेवा बंद राहणार असल्यानं पर्यटकांना रस्तेमार्गाचा आधार घ्यावा लागणार आहे.

पर्यटकांच्या नियोजनावर परिणाम

फेरी बंदीमुळे अलिबागचा प्रवास तुलनेनं अधिक वेळखाऊ आणि खर्चिक होण्याची शक्यता आहे. मुंबईहून रस्तेमार्गानं अलिबाग गाठण्यासाठी अधिक वेळ लागत असल्यानं अनेक पर्यटकांच्या नियोजनावर परिणाम होऊ शकतो. याचबरोबर रायगड जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायालाही या बंदीचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक हॉटेल व्यावसायिक, रिसॉर्ट चालक, दुकानदार आणि पर्यटनाशी संबंधित व्यवसाय मोठ्या प्रमाणावर या जलवाहतुकीवर अवलंबून असतात.
Maharashtra TimesNEET Paper Leak Shubham : नीट पेपरफुटी प्रकरणात शुभमबाबत मोठी अपडेट; प्रतिविद्यार्थी किती पैसे? BAMSची परीक्षा दिली नसल्याचं स्पष्ट, पाच वर्षांपासून अनुपस्थित
महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने संबंधित कंपन्यांना अधिकृत पत्र पाठवून पावसाळी हंगामात सेवा बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच प्रवाशांनी 25 मेपूर्वी आपल्या प्रवासाचे नियोजन करावे आणि पावसाळ्यात सुरक्षित पर्यायांचा वापर करावा, असं आवाहनही प्रशासनानं केलं आहे. दरम्यान, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यानंतर हवामानाचा आढावा घेऊन पुन्हा फेरी सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मांडवा बंदर विभागाकडून देण्यात आली आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा