Headlines

Mumbai Property Registration Fee Hike; 30000 रुपयांऐवजी 50 हजार रजिस्ट्रेशन फी? मुंबईत घर खरेदी महागणार; गृहखरेदीदारांच्या खिशाला झळ बसण्याची शक्यता


Mumbai Property Registration Charges: मुंबईत घर घेण्याचं सर्वसामान्यांचे स्वप्न लवकरच महागू शकते. मुंबईमध्ये प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी लवकरच अतिरिक्त पैसे खर्च करावे लागू शकतात. राज्यातील फडणवीस सरकार आपला महसूल वाढवण्यासाठी मालमत्ता नोंदणी म्हणजे रेजिस्ट्रेशनसाठी लागणारा शुल्क वाढवण्याचा गांभीर्याने विचार करत असून सध्याच्या मालमत्ता नोंदणी शुल्क 30000 रुपयांवरून 50000 रुपयांपर्यंत वाढवण्यावर सरकार काम करत आहे.

Mumbai Property Registration Fees Hike
मुंबईत मालमत्ता नोंदणी शुल्कात वाढ होण्याची शक्यता(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
Property Registration: मुंबईमध्ये मालमत्ता खरेदी करणं आता पूर्वीपेक्षा जास्त महागात पडू शकते. स्वप्ननगरीत घर, फ्लॅट किंवा मालमत्ता खरेदीसाठी अतिरिक्त पैसे खर्च करावे लागू शकतात. राज्य सरकार आपल्या तिजोरीतील महसूल वाढवण्यासाठी मालमत्ता नोंदणी शुल्क वाढवण्याबाबत गांभीर्याने विचार करत आहे.

मुंबईतील मालमत्ता नोंदणी शुल्क वाढणार?

राज्य सरकार मालमत्ता नोंदणी शुल्क सध्याच्या 30,000 रुपयांवरून 50,000 रुपयांपर्यंत वाढवण्यावर विचार करत असून नोंदणी महानिरीक्षक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या जवळपास 10 वर्षांपासून नोंदणी शुल्क जशास तसे राहिले आहेत. पण आता वाढत्या मालमत्ता किमतींना आळा घालण्यासाठी आणि महसूल वाढवण्यासाठी ही सुधारणा करण्याची योजना आखली जात आहे.

Maharashtra TimesAI Startup: मिस्ड कॉलनं नशीब पालटलं! भारतीय इंजिनीअरनं US मध्ये उभारली तब्बल 8300 कोटींची कंपनी
मात्र, या प्रस्तावावर मंत्री स्तरावर केवळ चर्चा झाली आणि अंतिम निर्णय झालेला नाही, असे IGR च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. वाढीव नोंदणी शुल्क सर्व मालमत्ता व्यवहारांना समान रीतीने लागू करायचे की केवळ महागड्या मालमत्ता व्यवहारांना, याबाबत सध्या निर्णय घेतला जात आहे.

मुंबईतील मालमत्ता बाजार मजबूत

मुंबईची स्थावर मालमत्ता बाजारपेठ सतत मजबूत असताना राज्य सरकारकडून नवीन बदल लागू केला जाऊ शकतो. मुंबई मालमत्ता नोंदणी विभागाने दिलेल्या माहितीनुसार जून 2026 मध्ये मुंबईत 13,413 मालमत्तांची नोंदणी झाली, जी मागील सर्व जून महिन्यांतील एकूण घरांच्या विक्री संख्येपेक्षा जास्त आहे. मागील वर्षी जून 2025 च्या तुलनेत गेल्या महिन्यात 1,851 अधिक मालमत्ता नोंदण्या झाल्या.

Maharashtra Times8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगात अपेक्षेपेक्षा जास्त मिळणार, फक्त पगार नाही HRA दणकावून वाढणार; घरभाडे भत्त्यात सुधारणा होणार

मालमत्ता नोंदवाणीतून सरकारला महसूल

जून 2026 मध्ये राज्य सरकारने मुद्रांक शुल्क आणि आणि नोंदणी शुल्कातून 1,085 कोटींचा महसूल मिळाला, जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 50 कोटी रुपयांनी जास्त आहे. एक वर्षाआधी 2025 मध्ये मुंबईत वर्षभरात 1,50,293 मालमत्तांची नोंदणी झाली, तर जानेवारी ते जून 2026 या कालावधीत मुंबईत 80,330 नोंदण्या झाल्या आहेत.

Maharashtra TimesMutual Fund Investment: तुमचीही SIP तोट्यात? म्युच्युअल फंडात ‘Stay’ वा ‘Switch’ करण्याचा फॉर्म्युला प्रत्येक गुंतवणूकदाराला माहिती पाहिजे

नोंदणी शुल्क वाढीचा तुमच्यावर काय परिणाम होणार?

घर, जमीन, फ्लॅट, दुकान किंवा इतर कोणत्याही मालमत्तेच्या खरेदी व्यवहारावर शुल्क भरणे अनिवार्य आहे, आणि त्यानंतरच नोंदणी प्रक्रिया पूर्ण होते. त्यामुळे, शुल्कवाढीला मंजुरी मिळाल्यास खरेदीदारावर 20000 रुपयांचा अतिरिक्त भार पडेल.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा