Mutual Fund Rule Change: सेबीने म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना नवीन सुविधा देण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. यानुसार आता म्युच्युअल फंड गुंतवणूकदार डिमॅट खात्यांमधून SWP आणि STP व्यवहार करू शकतील. तसेच युनिटधारकांच्या मृत्यूनंतर दावा प्रक्रिया पूर्वीपेक्षा सोपी आणि अधिक जलद केली गेली आहे.

म्युच्युअल फंडचा नवीन नियम काय
आतापर्यंत ही सुविधा फक्त अशा गुंतवणूकदारांना मिळायची ज्यांचे युनिट्स ‘स्टेटमेंट ऑफ अकाउंट’ स्वरूपात होते आणि त्यांनी म्युच्युअल फंड योजना AMCs किंवा एजंटमार्फत या सुविधेचा लाभ घेतलेला. सेबीच्या या निर्णयाचा उद्देश गुंतवणूकदारांसाठी प्रक्रिया सुलभ करणे आणि गुंतवणुकीची सोय मिळवून देण्याचा असून हा नवीन नियम दोन टप्प्यात लागू केला जाईल. पहिल्या टप्प्यात गुंतवणूकदारांना युनिट-आधारित SWP आणि STP सूचना देता येतील. यामध्ये यामध्ये पैसे विड्रॉ करण्यासाठी किंवा त्याच म्युच्युअल फंडाच्या दुसऱ्या योजनेत हस्तांतरित करण्यासाठी, एका निश्चित वेळी फंडाच्या निश्चित संख्येतील युनिट्स विकण्याचा समावेश आहे.
Mutual Fund Investment: तुमचीही SIP तोट्यात? म्युच्युअल फंडात ‘Stay’ वा ‘Switch’ करण्याचा फॉर्म्युला प्रत्येक गुंतवणूकदाराला माहिती पाहिजे
त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात युनिट-आधारित तत्त्वावर ही सुविधा लागू केली जाईल, ज्यामुळे गुंतवणूकदार गरजेनुसार विशिष्ट वेळी निश्चित रक्कम काढता येईल किंवा हस्तांतरित करू शकतील.
यासह सेबीने डिपॉझिटरीजना 31 जानेवारी 2017 पर्यंत युनिट-आधारित सुविधा लागू करण्याचे निर्देश दिले तर, 30 एप्रिल 2027 पर्यंत रक्कम-आधारित सुविधा लागू करणे अनिवार्य असेल. संपूर्ण प्रक्रिया 31 ऑक्टोबरपर्यंत वेबसाइटवर प्रसिद्ध करणे देखील आवश्यक आहे.
म्युच्युअल फंडात नॉमिनीचे पैसे अडकणार नाही
याशिवाय कठीण काळात, विशेषतः जेव्हा आपल्या जवळच्या व्यक्तीचे निधन होते, तेव्हा आर्थिक दावे आणि कागदपत्रांची पूर्तता करताना शोकाकुल कुटुंबाचे दुःख अधिकच वाढवू शकते. या वस्तुस्थितीची दखल घेऊन सेबीने नवीन निर्देश जारी केले आहेत, ज्यामुळे म्युच्युअल फंड युनिट धारकाच्या मृत्यूनंतर दावा हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सोपी आणि वेगवान होऊ शकेल. यामुळे किरकोळ विसंगतींमुळे आता दावे अडकून राहणार नाही आणि गुंतवणूकदारांच्या हिताचे पूर्ण संरक्षण होऊ शकेल.
म्युच्युअल फंड युनिटधारकाच्या मृत्यूनंतर युनिट्स किंवा रकमेवर दावा करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सेबीने AMFI ला निर्देश दिले असून AMFI ने आपल्या मानकांमध्ये खालील सुधारणा केल्या आहेत.
संबंधित कागदपत्रे सादर करणे आवश्यक
- मृत गुंतवणूकदाराच्या नोंदणीकृत पत्त्यातील विसंगतीमुळे दावे अनेकदा रखडतात आणि बहुतेक AMCs नवीन उपलब्ध पत्त्याच्या तपशिलावर अवलंबून राहू शकतात. त्यामुळे, नवीन पत्त्याशी संबंधित कागदपत्रे सादर करणे अनिवार्य असेल.
- स्वाक्षरी जुळत नसेल तर अशा प्रकरणांत रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट – RTAs – तफावतीच्या स्वरूपानुसार योग्य प्रक्रियेचे पालन करू शकतात.
- नावातील तफावत दूर करण्यासाठी आता गुंतवणूकदार पासपोर्ट, आधार कार्ड इत्यादी स्वयं-प्रमाणित कागदपत्रे सादर करू शकतात.
सेबी आणि AMFI च्या या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा मृत गुंतवणूकदारांच्या कुटुंबीय आणि नामनिर्देशित व्यक्तींना होईल. याआधी पत्ता किंवा सहीतील किरकोळ फरकांमुळे दाव्याचे निराकरण महिनोन्महिने लांबणीवर पडायचे, तर आता या बदलामुळे वेळ वाचेल आणि त्रास कमी होईल.

