Headlines

Mumbai Mega Block: मध्य, हार्बरवर रविवारी मेगाब्लॉक; लोकलसह मेल-एक्स्प्रेसवर परिणाम, कसे आहे नियोजन? पाहा वेळापत्रक – mumbai local update mega block on central harbour railway line on 30 august 2026


मुंबई : विद्याविहार ते ठाणे आणि ठाणे ते वाशी/नेरूळदरम्यान मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. तर वसई रोड ते भाईंदरदरम्यान पश्चिम रेल्वेवर आज, शनिवारी मध्यरात्रीनंतर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे

स्थानक : विद्याविहार ते ठाणे

मार्ग : पाचवी आणि सहावी मार्गिका

वेळ : सकाळी ८ ते दुपारी ३.३०

परिणाम : ब्लॉकवेळेत पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवरील मेल-एक्स्प्रेस अप आणि डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. यामुळे गाडी क्रमांक ११०५५ गोदान, (११०६१) जयनगर, (१६३४५) नेत्रावती, (१७२२२) काकीनाडा पोर्ट, (२२२२६) सोलापूर वंदे भारत, (११०१०) सिंहगड, (१२१२४) डेक्कन क्वीन, (१२१२६) प्रगती, (१२१३४) मंगळूरू, (१३२०१) राजगीर, (१७२२१) काकीनाडा, (१२१६८) बनारस, (१२३२१) हावडा आणि (१२८१२) हटिया एक्स्प्रेस विलंबाने धावणार आहे.

Maharashtra TimesNepal Flood : मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? नेपाळमध्ये बेपत्ता जीवलगांच्या कुटुंबांची घालमेल, मुंबई-पुण्यातील ग्रुप संपर्काबाहेरहार्बर रेल्वे

स्थानक : ठाणे ते वाशी/नेरुळ

मार्ग : अप आणि डाऊन

वेळ : सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१०

परिणाम : ब्लॉकवेळेत ठाणे ते वाशी नेरूळ पनवेलदरम्यान अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. सीएसएमटी ते वाशी/पनवेलदरम्यान आणि बेलापूर ते उरणदरम्यान रविवार वेळापत्रकानुसार लोकल धावणार आहेत.

Maharashtra TimesShiv Sena vs BJP : शिवसेनेकडील खात्यांमध्ये CMO ची ढवळाढवळ, मंत्र्यांची शिंदेंकडे जाहीर नाराजी, रिक्षाचालकांच्या मराठीला मुदतवाढ मिळताच कडेलोटपश्चिम रेल्वे

स्थानक : वसई रोड ते भाईंदर

मार्ग : अप आणि डाऊन जलद

वेळ : शनिवारी रात्री ११.३० ते रविवारी पहाटे ४.४५

परिणाम : ब्लॉकवेळेत अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल अप आणि डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. यामुळे रात्री उशिरा धावणाऱ्या लोकल विलंबाने धावणार आहे. रात्रकालीन ब्लॉकमुळे रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक असणार नाही.

Maharashtra TimesMPSC Paper Leak : संशय नको, 10 प्रश्न मुद्दाम चुकीचे लिही, एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात ऋतुजा पाटीलला दिलेला सल्ला; लग्नासाठी जमवलेल्या 12 लाखांची 77 प्रश्नांसाठी डीलरक्षाबंधनदिनीही विलंबाची भेट

रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यासाठी निघालेल्या बहीणभावांना शुक्रवारी मध्य रेल्वेच्या कारभाराचा फटका बसला. धीम्या आणि जलद मार्गावरील लोकल फेऱ्या विलंबाने धावत असल्याने लोकलसह रेल्वे स्थानकांवर गर्दी वाढली होती. यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. शुक्रवारी सुट्टी असल्याने सकाळी रक्षाबंधन करून मुंबई फिरण्यासाठी आलेल्या भावा-बहिणींची लोकलमध्ये गर्दी दिसून आली. गणेशोत्सवाच्या खरेदीसाठीही अनेकांनी रक्षाबंधनाचा मुहूर्त निवडला. यामुळे अनेक प्रवासी खरेदीच्या बॅग, पिशव्यांसह लोकलमधून प्रवास करत होते. अशातच लोकल विलंबाने धावत असल्याने दादर, घाटकोपर, कुर्ला स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी उसळली होती. गर्दीमुळे अनेक प्रवासी तिकीट नसतानाही, प्रथम श्रेणीच्या डब्यात आणि वातानुकूलित लोकलमध्ये बिनदिक्कत प्रवास करताना आढळले.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत