Mumbai Manhole Accident : एखाद्याचा जीव जाईपर्यंत महापालिका वाट का पाहत बसते? हे असेच चालणार आहे का? मानवी जीवन अमूल्य असून त्याचे संरक्षणच सर्वोच्च प्राधान्याचे आहे. जीव गेल्यानंतर कार्यवाही करणार आहात का?’ असे संतप्त सवाल न्या. अजय गडकरी व न्या. कमल खाता यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान महापालिकेसमोर उपस्थित केले.

‘जीव जाईपर्यंत महापालिका वाट का पाहते?’
‘मॅनहोल उघडे राहत नसल्याचा दावा मागील सुनावणीत मुंबई महापालिकेने केल्यानंतरही हा प्रकार घडला आणि आता प्रतिज्ञापत्र व केलेल्या कामांच्या अहवालाची कागदपत्रे आम्हाला दाखवली जातात. मुंबईतील पावसाळी परिस्थिती ही दरवर्षीची आणि सर्वज्ञात आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना अपेक्षित आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच आवश्यक उपाययोजना का करता येत नाहीत? एखाद्याचा जीव जाईपर्यंत महापालिका वाट का पाहते? हे असेच चालणार का? मानवी जीवन अमूल्य असून त्याचे संरक्षणच सर्वोच्च प्राधान्याचे आहे. जीव गेल्यानंतरच कार्यवाही करणार का?’, असे संतप्त प्रश्न न्या. अजय गडकरी व न्या. कमल खाता यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान महापालिकेसमोर उपस्थित केले.
महापालिकेने काय सांगितलं?
रस्त्यांवरील खड्डे व उघडे मॅनहोल हे प्राणघातक ठरत असल्याने न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या कठोर निर्देशांचेही पालन होत नसल्याचे, ॲड. रुजू ठक्कर यांनी २ जुलै रोजी साकीनाका येथील उघड्या मॅनहोलमध्ये पडून ५५ वर्षीय अस्लम शेख यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आणत खंडपीठाला सांगितले. त्यामुळे त्याविषयी खंडपीठाने विचारणा केली असता, त्या घटनेनंतर महापालिका आयुक्तांनी संबंधित चार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली असून, चौकशी समितीही स्थापन केल्याचे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी प्रतिज्ञापत्राच्या आधारे सांगितले. तसेच, शेख यांच्या कुटुंबाला दहा लाखांची भरपाई देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
Mumbai Crime : आई फोन का नाही उचलत! लेकीची चिंता वाढली, नातेवाईकांनी पवार कुटुंबाचं दार तोडलं, घरात भयंकर दृश्य, २३ वर्षांचा शेजारी अटक
शिवाय, ‘यापुढे अशी अनुचित घटना घडणार नाही, याची खबरदारी घेऊ. मुंबईत कुठेही मॅनहोल उघडे असल्यास पुढील १२ तासांत बंदिस्त केले जातील. तसेच दुरुस्तीसाठी कोणतेही मॅनहोल उघडण्यात आल्यास तिथे बॅरिकेड्स लावण्यासह एक कर्मचारी तैनात केला जाईल’, अशी हमी त्यांनी दिली. त्यावर नागरिकांचे जीव गेल्यानंतरच अशी जाग का येते? असा उद्विग्न प्रश्न खंडपीठाने उपस्थित केला.
व्हॉट्सॲप क्रमांकाची व्यापक प्रसिद्धी
रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावर तत्काळ कारवाई होण्याच्या दृष्टीने यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकाची वृत्तवाहिन्या व वर्तमानपत्रांच्या माध्यमातून व्यापक प्रसिद्धी देण्यात येईल. जेणेकरून २४ तासांत खड्डे बुजवण्याची कार्यवाही होईल, अशी हमी यावेळी महापालिकेतर्फे देण्यात आली. तसेच, आत्तापर्यंत आलेल्या एकूण १३०० तक्रारींपैकी १,२२५ तक्रारींचे निरसन झाल्याची माहितीही दिली.
VIDEO | मुंबईकरांसाठी महापौर रितू तावडे आणि किशोरी पेडणेकर एकत्र
ठाणे महापालिका इतकी अवंसेदनशील कशी?
ठाण्यातील धर्मवीर नगर येथील ज्ञानसाधना महाविद्यालयाजवळ असलेल्या पर्जन्य जलवाहिनीच्या उघड्या चेंबरमध्ये पडून सुमारे दोन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना नोव्हेंबर २०२५ मध्ये घडली होती. अशा प्रकरणांत मृत्यूबाबत पीडित कुटुंबाला सहा लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा न्यायालयाचा ऑक्टोबर २०२५चा सरसकट आदेश आहे. तरीही सहा महिन्यांत या बाळाच्या बाबतीत कोणताच निर्णय झाला नसल्याचे ॲड. रुजू यांनी मागील सुनावणीत निदर्शनास आणले होते. तेव्हा, आयुक्तांकडून याविषयी वेळ दिला जात नसल्याबद्दल खंडपीठाने नाराजी व्यक्त केली होती.
Siya Goyal : सिया-चेतनचा चार महिन्यापूर्वी गुपचूप विवाह? केतन अग्रवाल केसमध्ये सर्वात मोठा गौप्यस्फोट, व्हॉट्सॲप चॅटमधून लग्नाची गोष्ट समोर
त्या पार्श्वभूमीवर, ७५ हजारांची भरपाई निश्चित केल्याचे महापालिकेच्या वकिलांनी सांगितले. त्यावरूनही खंडपीठाने महापालिकेला फैलावर घेतले. ‘चेंबर उघडे राहिल्याची चूक तुम्ही मान्य करता, तरी भरपाई फक्त ७५ हजारांची कशी? न्यायालयाच्या आदेशांना तुम्ही बांधील आहात की नाही? आपले बाळ गमावलेल्या पालकांना काय वाटत असेल? ठाणे महापालिका इतकी असंवेदनशील कशी? अधिकाऱ्यांचा हा निर्लज्जपणा आहे’, अशा कठोर शब्दांत खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. अखेरीस याप्रश्नी मंगळवार, १४ जुलै रोजी भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश महापालिकेला दिले.

