Headlines

Mumbai Manhole Accident Aslam Shaikh dies after falling Family demands justice Crime News; पैशांनी आमचा माणूस परत येणार का? मॅनहोल दुर्घटनेतील अस्लम शेखच्या कुटुंबाचा उद्रेक, पित्याचा फोटो दाखवत संतप्त सवाल


Mumbai Manhole Accident : कितीही पैसे दिलेत तरी आमचा माणूस परत येणार आहे का, अशा शब्दात मॅनहोल दुर्घटनेतील मयत अस्लम शेख यांच्या कुटुंबीयांनी उद्रेक व्यक्त केला.

Mumbai Manhole Accident Aslam Shaikh Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : शालेय बसवर झाड पडून ११ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची चेंबूर येथील घटना ताजी असतानाच कुर्ला साकीनाका येथे खैरानी मार्ग परिसरात उघड्या मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. अस्लम शेख (५५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. कितीही पैसे दिलेत तरी आमचा माणूस परत येणार आहे का, अशा शब्दात शेख यांच्या कुटुंबीयांनी उद्रेक व्यक्त केला.

मोबाईलवर बोलताना पडले

गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. महापालिकेच्या एल वॉर्डमधील कुर्ला साकीनाका खैरानी मार्ग परिसरात मलनिःसारण प्रचालन विभागाच्या अंतर्गत एका मॅनहोलवर संरक्षक जाळी बसवण्याचे काम सुरू होते. त्याच वेळी सकाळी ११ वाजताच्या सुमारास रस्त्यावरुन अस्लम शेख मोबाइलवर बोलत जात होते.

बचावाचे प्रयत्न फोल

ते मॅनहोलजवळ आले असता तेथे काम करत असलेल्या एका व्यक्तीने त्यांना आवाज देऊन थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र शेख यांचा तोल जाऊन ते मॅनहोलमध्ये पडले. घटनेची माहिती मिळताच महापालिका अधिकारी, अग्निशमन दल आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत शेख यांना वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले.

दीड तासाच्या शोध मोहिमेनंतर शेख यांना घटनास्थळाच्या पुढील मॅनहोलमधून बाहेर काढण्यात आले. त्यांना राजावाडी रुग्णालयातील डॉक्टरांनी मृत घोषित केले. शेख यांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपयांची आर्थिक मदत महापालिकेकडून जाहीर करण्यात आली आहे.

लेकीला अश्रू अनावर

अस्लम शेख यांची मुलगी शबनमला आपल्या भावना आवरणे कठीण झाले. कामासाठी घराबाहेर पडलेले वडील एका उघड्या मॅनहोलमध्ये पडून मरण पावले आहेत, हे समजताच तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. तिचे लहान मूल तिच्या शेजारीच चटईवर झोपले होते.
Maharashtra TimesCrime News : आज नको ना… व्रताच्या नावे ‘बायको’ संबंध टाळत राहिली, पियुषने एकदा दाढी करताना पकडलं, पूनम निघाली चंदन, खतरनाक शेवट

धाकट्या भावाला फोन

अस्लम शेख यांचा भाऊ अकबरने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, कामावर असतानाच त्याला फोन आला की त्याचा भाऊ मॅनहोलमध्ये पडला आहे. “आम्ही चार भाऊ आहोत आणि अस्लम सर्वात मोठा होता. तो विविध कामांच्या ठिकाणी डंपरमध्ये माती भरण्याचे काम करायचा. हे काम त्याला रोजंदारीवर मिळायचे आणि त्यातून तो दिवसाला साधारण ४०० ते ५०० रुपये कमवायचा. गुरुवारी सकाळी त्याला काम मिळाले नाही, त्यामुळे नेहमीप्रमाणे जिथे तो थांबायचा, त्या रस्त्याच्या कोपऱ्यावर काही वेळ वाट पाहिल्यानंतर तो घरी निघाला होता.” असे अकबरने सांगितले.

Chandrakant Khaire | सचिन अहिरांचा शिवसेनेत प्रवेश, चंद्रकांत खैरेंनी गद्दार म्हणत चांगलंच सुनावलं

पैशांनी माणूस परत येणार नाही

अस्लम शेख यांची पत्नी एका सुपरमार्केटमध्ये काम करते आणि त्यांचा २५ वर्षांचा मुलगा अली याला नुकतीच एका कार्यालयात लिपिकाची नोकरी मिळाली होती. मुंबईच्या महापौर रितू तावडे या कुटुंबाची भेट घेण्यासाठी रुग्णालयात आल्या, तेव्हा अस्लम यांच्या वहिनी, शाइस्ता यांनी त्यांना प्रश्न विचारला “शहरातील गरिबांच्याच वाट्यालाच मॅनहोलमधील मृत्यू का येतात?” शाइस्ता म्हणाल्या की, पावसाळ्यात अशा घटना घडल्याचे त्या दरवर्षी ऐकत असत, पण आपल्याच कुटुंबावर अशी वेळ येईल असा त्यांनी कधी विचारही केला नव्हता. “कितीही पैसे दिले तरी ते परत येणार नाहीत,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

एल वॉर्डमधील (कुर्ला, साकीनाका,चांदिवली) ७५ मॅनहोलवर सरंक्षक जाळ्या बसवण्याचे काम हाती घेण्यात आले असून अवघे चारच मॅनहोल जाळ्या बसवण्याचे काम शिल्लक आहे. त्यात घटना घडलेल्या मॅनहोलचाही समावेश असल्याचे समजते.
Maharashtra TimesVihan Shrivastav : आमचं बाळ आता परत येणार नाही… विहानच्या पार्थिवाशेजारी क्रिकेटचा बॉल ठेवला, जड अंतःकरणाने अखेरचा निरोप, पाऊसही धाय मोकलून रडला

यापूर्वीच्या घटना

ऑगस्ट, २०१७ : एल्फिन्स्टन रोड परिसरात उघड्या मॅनहोलमध्ये पडून डॉ. दीपक अमरापूकर यांचा मृत्यू
२०२४ : अंधेरीच्या सीप्झ परिसरात विमल गायकवाड यांचा उघड्या पर्जन्य जलवाहिनीत पडून मृत्यू

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा