Mumbai Landslide: मुंबईत १९९२ ते २०२६ या कालावधीत दरडी कोसळून ३४० जणांचा मृत्यू, तर ३०० जण जखमी झाल्याची माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकाराखाली मिळवली आहे.

पावसाळ्यापूर्वी मुंबई आणि महानगरातील धोकादायक ठिकाणांची संबंधित महापालिका, म्हाडा, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणासह (एसआरए) विविध यंत्रणांकडून पाहणी केली जाते. या पाहणीनंतर धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते. डोंगराळ भागातील धोकादायक घरांतील रहिवाशांनाही सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या जातात. मात्र, विविध कारणांमुळे अनेक ठिकाणी या सूचनांचे पालन होत नसल्याचे दिसून येते. परिणामी, दरवर्षी पावसाळ्यात या वस्त्यांवरील दरडींचा धोका कायम राहतो.
President Medal: यंदा तरी छातीवर पदक झळकेल का? चार वर्षांपासून 364 अधिकारी, अंमलदार राष्ट्रपती पदकाच्या प्रतीक्षेतमुंबईतील ३६ पैकी २५ मतदारसंघांमध्ये तब्बल २५७ ठिकाणी डोंगराळ भागातील वस्त्या धोकादायक म्हणून वर्गीकृत करण्यात आल्या आहेत. येथील २२,४८३ झोपड्यांपैकी ९,६५७ झोपड्यांतील रहिवाशांचे अन्यत्र स्थलांतर करण्याची शिफारस म्हाडाच्या मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने राज्य सरकारकडे केली होती. उर्वरित झोपड्यांच्या सुरक्षेसाठी टेकड्यांच्या सीमेलगत संरक्षक भिंती उभारण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र, या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी अद्याप झालेली नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने सन२०१० मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार तातडीने उपाययोजना झाली असती, तर अनेक दुर्घटना टाळता आल्या असत्या, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यासंदर्भात कृती आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते; मात्र, त्याची अंमलबजावणी अद्याप पूर्ण झाली नसल्याकडेही लक्ष वेधले जात आहे.
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचा आता मोठ्या कंपन्यांना दणका; मुंबईसह राज्यभरात डॉमिनोज् पिझ्झाच्या ५ आउटलेटचा परवाना रद्द, तपासणीत काय आढळलं?घाटकोपरमध्ये वारंवार दुर्घटना
-१२ जुलै २००० : मुसळधार पावसामुळे डोंगराचा भाग पायथ्याशी असलेल्या झोपडपट्टीवर कोसळला. या दुर्घटनेत ७८ जणांचा मृत्यू, तर सात जण गंभीर जखमी झाले होते. मृतांमध्ये २७ पुरुष, १५ महिला, १५ मुलांचा समावेश
-५ जुलै २०२२ : पंचशीलनगरमध्ये मुसळधार पावसामुळे दरड कोसळून एका घराचे नुकसान झाले; मात्र जीवितहानी झाली नाही.
-१२ एप्रिल २०२४ : घाटकोपर पश्चिमेकडील हिमालय सोसायटी, वाल्मिकनगर परिसरात दरड कोसळली. महापालिकेने तातडीने १० ते १२ झोपड्या रिक्त केल्याने मोठी दुर्घटना टळली.

