Headlines

Mumbai Churchgate Fast Local Train Mayank Lohar Murder Case Railway Police big Information Accused Roshan Suvarna; मुंबई लोकल ट्रेन मयंक लोहार मृत्यू प्रकरण; आरोपी रोशन सुवर्णाचे नवीन कारनामे उघड, रेल्वे पोलिसांची मोठी माहिती


Mumbai Local Train Mayank Lohar Murder Case Accused Roshan Suvarna : चर्चगेट फास्ट लोकल ट्रेनमध्ये मयंक लोहार हत्या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. आरोपी रोशन सुर्वणाचे कारनामे आता समोर आले आहेत.

Mumbai Local Train Mayank Lohar Murder Case Accused Roshan Suvarna
मुंबई लोकल तरुण खून(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : चर्चगेट-नालासोपारा लोकलमध्ये आरोपी रोशन सुवर्णाने प्रवासी मयंक लोहार याच्यावर हल्ला करताना, डब्यातील अन्य प्रवाशांना चाकू दाखवून धमकावले होते. यामुळे मयंकच्या मदतीसाठी कोणी पुढे आले नाही. लोकलमध्ये चढण्यापूर्वी रोशन याचा अंधेरी रेल्वे स्थानकाबाहेर रिक्षाचालकाशीही सुट्ट्या पैशांवरून किरकोळ वाद झाला होता, अशी माहिती रेल्वे पोलिसांच्या हाती लागली आहे.

सुट्ट्या पैशांवरून वाद

पावसाचे पाणी डब्यात येत असल्याने दरवाजा बंद करावा, यावरून सुरू झालेल्या वादानंतर आरोपी रोशन याने प्रवासी मयंकवर चाकूने हल्ला करत त्याची हत्या केली. आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी रोशन हा घटनेदिवशी, मंगळवारी रात्री अंधेरीतील एका हॉटेलमधून मद्यपान करून बाहेर पडला होता. त्यानंतर रेल्वे स्थानकाबाहेर त्याचा एका रिक्षाचालकाशी सुट्ट्या पैशांवरून वाद झाला. रिक्षाचालकाने मीटरप्रमाणे झालेले भाडे नेमके द्यावे, अशी मागणी केली. रोशन याने शंभर रुपये दिल्यावर, सुट्ट्या पैशांवरून वाद सुरू झाला. हा संपूर्ण प्रकार स्थानकाबाहेरील एका सीसीटीव्हीत कैद झाला आहे. त्यानंतर आरोपीने अंधेरी रेल्वे स्थानकात प्रवेश केला, असे रेल्वे पोलिसांनी सांगितले.
Maharashtra TimesMumbai Local Crime: मुंबई लोकलमध्ये नक्की काय चाललंय? आधी तरुणाला संपवलं, आता Sorry बोलल्यानंतरही एकाला चाकूने भोसकलं

रोशन अतिशय मद्यधुंद अवस्थेत

अंधेरी स्थानकाच्या फलाटावरून लोकलमध्ये प्रवेश करताना रोशन अतिशय मद्यधुंद अवस्थेत असल्याचे दिसले. लोकलच्या दरवाजाजवळ उभा असलेला रोशन दरवाजा उघडा ठेवण्याचा आग्रह धरत होता. मात्र, पावसाचे पाणी डब्यात येत असल्याने मयंकने दरवाजा बंद केला. यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. शिवीगाळही करण्यात आली. अपमान झाल्याच्या रागातून रोशनने बॅगेतून चाकू काढला आणि मयंकवर सपासप वार केले.
Maharashtra TimesByculla Moharram : मुंबईच्या इतिहासातील सर्वांत मोठा विषप्रयोग; मोहरममध्ये उंदीर मारण्याच्या गोळ्या, भायखळ्यात 30 हजार भाविकांना संपवण्याचा कट

रोशन चाकू आणि बॅग घेऊन लोकलमधून उतरला

अचानक झालेल्या हल्ल्यानंतर डब्यात एकच गोंधळ उडाला. आरोपीने डब्यातील अन्य प्रवाशांनाही चाकू दाखवत धमकावले. यामुळे संपूर्ण डब्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्रवासी डब्याच्या दुसऱ्या टोकाला पळाले. दरम्यान लोकल बोरिवली स्थानकात थांबण्यापूर्वीच आरोपी रोशन चाकू आणि बॅग घेऊन लोकलमधून उतरला, असे प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा