Headlines

Mumbai Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Station Redevelopment Changes in Important Trains till August 21; मुंबईकरांना आणखी पंधरवडाभर त्रास! सीएसएमटी पुनर्विकासासाठी कधीपर्यंत रेल्वेगाड्यांची रखडपट्टी, महत्त्वाच्या गाड्यांमध्ये बदल


Mumbai Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Redevelopment : रेल्वे जमीन विकास प्राधिकरणााकडून (आरएलडीए) सीएसएमटी पुनर्विकासाचे काम सुरू आहे. हे काम अत्यंत धीम्या गतीने होत आहे. त्याचा फटका लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांना आणि प्रवाशांना बसत आहे.

Mumbai Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Redevelopment
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पुनर्विकास(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) पुनर्विकासासाठी सुरू असलेल्या कामांमुळे फलाट क्रमांक १६वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला मध्य रेल्वेने पुन्हा मुदतवाढ दिली आहे. आता २१ ऑगस्टपर्यंत तेजस एक्स्प्रेससह चार मेल-एक्सप्रेस गाड्यांचा प्रवास सीएसएमटीऐवजी दादर आणि ठाणे येथेच संपणार आहे.

सीएसएमटी पुनर्विकासाचे काम सुरू

रेल्वे जमीन विकास प्राधिकरणााकडून (आरएलडीए)सीएसएमटी पुनर्विकासाचे कामसुरू आहे. हे काम अत्यंत धीम्या गतीने होत आहे. त्याचा फटका लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांना आणि प्रवाशांना बसत आहे. या कामांसाठी यापूर्वी १ फेबुवारी ते २६ एप्रिल या कालावधीत ब्लॉक जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर १९ मे, १३ जून, ५ ऑगस्ट आणि आता २१ ऑगस्टपर्यंत त्याला टप्प्याटप्प्याने मुदतवाढ देण्यात आली आहे. परिणामी, २२१२० मडगाव – सीएसएमटी तेजस, १२८१० हावडा – सीएसएमटी, १२११२ अमरावती – सीएसएमटी या गाड्या दादर स्थानकात आणि १२१३४ मंगळुरू – सीएसएमटी एक्स्प्रेस ठाणे स्थानकाच्या पुढे जात नाहीत.

प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त

पुनर्विकासाच्या कामांचा कालावधी सातत्याने वाढत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्तहोत आहे. विशेष म्हणजे मुदतवाढ देताना फलाट क्रमांक १६ वरील काम केव्हा पूर्ण होणार, सध्या कोणते काम सुरू आहे आणि पुनर्विकासाचे एकूण किती टक्के काम पूर्ण झाले, याबाबत कोणतीही माहिती आरएलडीएने अद्याप जाहीर केलेली नाही.

Maharashtra TimesThane News: लाडक्या बहिणी ‘निराधार’! ऑपरेटरच्या चुका, सिस्टीममधील घोळामुळे आधार कार्ड तूर्त स्थगित

घाटकोपर-अंधेरी मेट्रो आता नियमित

गर्दीच्या वेळेत प्रवाशांचा प्रतीक्षा कालावधी कमी करण्यासाठी मेट्रो रेल्वेच्या फेऱ्यांच्या नियोजनात बदल करण्याचा निर्णय ‘मुंबई मेट्रो वन’ने घेतला आहे. उद्या, सोमवारपासून मिक्स लूप पद्धतीने अर्थात घाटकोपर ते वर्सोवासह घाटकोपर ते अंधेरी अशा मेट्रो फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. यामुळे प्रवाशांना दर तीन मिनिटांनी एक फेरी उपलब्ध होणार आहे. परिणामी सर्वाधिक गर्दी असलेल्या घाटकोपर ते अंधेरी या मार्गांदरम्यान प्रवासी क्षमतेत २० टक्के वाढ होणार आहे.

रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या मुंबई मेट्रो वनकडून सध्या घाटकोपर-अंधेरी-वर्सोवादरम्यान मेट्रो चालवली जाते. प्रवासी मागणी सातत्याने वाढल्याने प्रशासनाकडून फेऱ्यांच्या नियोजनात बदल करण्यात आला आहे. नव्या नियोजनानुसार एक मेट्रो घाटकोपर ते अंधेरी या छोट्या मार्गावर धावेल, त्यानंतरची मेट्रो नेहमीच्या घाटकोपर ते वर्सोवा या पूर्ण मार्गावर धावेल. याला मिक्स्ड लूप पद्धत असे म्हणतात. उद्या, सोमवारी सायंकाळी गर्दीच्या वेळेपासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. अंधेरीहून घाटकोपरसाठी पहिली मेट्रो सायंकाळी ६.२३ला सुटेल आणि शेवटची मेट्रो रात्री ८.२३ वाजता सुटेल.

Maharashtra TimesSupriya Sule:’एफसीआरए’ विधेयकास घाईघाईत मंजुरी नको; सुप्रिया सुळे यांची स्पष्ट भूमिका

दर तीन मिनिटांनी मेट्रो मार्गिका उपलब्ध

नव्या नियोजनामुळे अंधेरी आणि घाटकोपरदरम्यान गर्दीच्या वेळेत प्रवाशांना दर तीन मिनिटांनी मेट्रो मार्गिका उपलब्ध राहणार आहे. सध्या दोन मेट्रो फेऱ्यांमधील अंतर तीन मिनिटे आणि २० सेकंद आहे. त्याचबरोबर प्रवासी वाहून नेण्याच्या क्षमतेत वाढ होणार असून, याचा रोज २८ हजार प्रवाशांना थेट फायदा होईल. यामुळे सोमवार ते शुक्रवारी मेट्रो फेऱ्यांची संख्या ४७६वरून ४८४पर्यंत पोहोचणार आहे. वर्सोवा आणि आझाद नगरदरम्यान गर्दीच्या वेळेत मेट्रोमधील अंतर ३६२ सेकंद इतके राहणार आहे.

‘मिक्स लूप सेवा ही मेट्रोच्या सध्याच्या पायाभूत सुविधांच्या क्षमतेचा अधिकाधिक वापर करण्यासाठी आणि मेट्रो संचालन व्यवस्थेचे अनुकूलन करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहे. गर्दीच्या वेळेत या कार्यपद्धतीतील नव्या प्रयोगाची अंमलबजावणी करून प्रवाशांचा प्रतीक्षा कालावधी कमी करणे, प्रवासी वाहून नेण्याची क्षमता वाढवणे तसेच अधिक वेगवान, सुविधाजनक आणि विश्वासार्ह सेवा देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे’, असे मुंबई मेट्रो वनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्यामंतक चौधरी यांनी सांगितले.

Maharashtra TimesTukaram Mundhe: आता मोर्चा मद्य, चायनीज पदार्थांकडे! ‘एफडीए’च्या पुढील कारवाईबाबत तुकाराम मुंढे यांचे सूतोवाच
शहरातील महत्त्वाच्या मेट्रो मार्गांपैकी एक असलेल्या मुंबई मेट्रो वनकडून प्रवाशांची सोय केंद्रस्थानी ठेवून सेवा सुधारण्यावर भर दिला जात आहे. शहराच्या वाढत्या वाहतूक गरजा लक्षात घेऊन कार्यपद्धतीत नवीन बदल आणि प्रवाशांच्या गरजेनुसार सेवा सुधारणा करण्याचा प्रयत्न आहे, असाही विश्वास मेट्रो प्रशासनाने व्यक्त केला आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा