Mumbai BEST Bus Accident 65 year old Dharashiv farmer Dies Bhaskar Kagade visit his daughter Crime News; लेकीच्या भेटीला आलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्याचा बेस्ट बस अपघातात अंत, पुण्याला जाताना काळाचा घाला, संतप्त जावयाचा सवाल
Mumbai BEST Bus Accident 65 year old Dharashiv farmer Dies Bhaskar Kagade visit his daughter Crime News; लेकीच्या भेटीला आलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्याचा बेस्ट बस अपघातात अंत, पुण्याला जाताना काळाचा घाला, संतप्त जावयाचा सवाल
Mumbai BEST Bus Accident Farmer Death : मराठवाड्यातील धाराशिवचे ६५ वर्षीय शेतकरी भास्कर रावसाहेब कागदे यांचा मुंबईतील बेस्ट बसच्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ते मुंबईत आपल्या एका मुलीला भेटण्यासाठी आले होते, तिथून ते पुण्याला राहणाऱ्या दुसऱ्या मुलीच्या भेटीला निघाले होते
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : सायन-पनवेल महामार्गावरील मानखुर्द येथे ‘बेस्ट’ बस रस्त्याच्या शेजारील दुभाजकाला धडकल्याने सोमवारी झालेल्या अपघातात किमान दहा जण गंभीर जखमी झाले आहेत, तर एकाचा मृत्यू झाला. जखमींपैकी आठ जण बसमधील प्रवासी होते, तर एक चालक आणि एक वाहक आहे; मृत व्यक्ती मात्र पादचारी होती. मुलीला भेटायला आलेल्या धाराशिवच्या शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत झाला.
लेकीच्या भेटीला आलेल्या शेतकऱ्याचा अंत
मराठवाड्यातील धाराशिवचे ६५ वर्षीय शेतकरी भास्कर रावसाहेब कागदे यांचा या दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला. ते मुंबईत आपल्या एका मुलीला भेटण्यासाठी आणि कौटुंबिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आले होते. आपल्या दुसऱ्या मुलीला भेटण्यासाठी पुण्याला जाण्याच्या तयारीत असतानाच ‘बेस्ट’ बसच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.
सर्व प्रवाशांना तातडीने गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले आणि त्यातील जवळपास सर्वांनाच फ्रॅक्चर झाले आहेत. रुग्णालयाच्या प्रभारी डॉ. शुभांगी घोडके यांनी सांगितले की, “एकूण आठ रुग्णांपैकी सात जणांना शरीराच्या कोणत्या ना कोणत्या भागात फ्रॅक्चर झाले आहेत. त्या सर्वांनाच दीर्घकाळ रुग्णालयात राहावे लागेल. एका रुग्णाला सायन रुग्णालयात हलवावे लागले; त्यांच्या हाताचे हाड मोडले असून मज्जातंतूवरही दाब आला आहे.”
अनेक प्रवासी त्यांच्या नेहमीच्या दिनचर्येत मग्न होते. मानखुर्दच्या रहिवासी असलेल्या ४२ वर्षीय लता वाघेला नेहमीप्रमाणेच वाशी मार्केटला निघाल्या होत्या; तिथे फळे आणि भाज्यांची खरेदी करुन त्या परिसरात फेरीवाली म्हणून त्यांची विक्री करण्याचा त्यांचा नित्यक्रम होता.
२२ वर्षीय अंकिता जाधवला किरकोळ दुखापत झाली आहे. तिच्या आई सुरेखा जाधव म्हणाल्या, “आमचे नशीब चांगले की तिला फारशी गंभीर दुखापत झाली नाही. मुलं घराबाहेर असताना त्यांचे प्राण अशा प्रकारे धोक्यात येऊ नयेत. अशा घटना टाळण्यासारख्या असतात.”
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा