Headlines

Mumbai Ahmedabad Highway Two Wheeler Accident Three Members of the Same Family Dead; भरधाव वाहनाची बाईकला धडक, तिघांचा जागीच मृत्यू; त्रिकोणी कुटुंबाचा क्षणार्धात करुण अंत


Palghar Accident News : ढेकाळे येथील वाघोबा परिसरात एक भीषण अपघात झाला आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. क्षणार्धात त्रिकोणी कुटुंबाचा अंत झाला आहे.

Palghar Accident Three Dead
पालघर अपघात तिघांचा मृत्यू(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील ढेकाळे येथील वाघोबा खिंड परिसरात एका भीषण अपघाताची घटना घडली आहे. या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. मोटरसायकलवरील तिघांचा मृत्यू झाला आहे. भरत शंकर माघी, वंदना भरत माघी आणि सुर्या भरत माघी अशी मृत्यू झालेल्या प्रवाशांची नावे असून हे सर्व विक्रमगड येथील राहणार आहेत.

नेमका कसा झाला अपघात?

अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा आणि पुढील कार्यवाही सुरू आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सध्या सुरू असून मनोर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन मनोर ग्रामीण रुग्णालयात हलवले आहेत. दरम्यान, अपघात करून फरार झालेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून पुढील तपास सुरू आहे. अतिशय भयंकर हा अपघात घडला असून शनिवारी सायंकाळच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे.
Maharashtra TimesMumbai Crime: मुंबईमध्ये हत्या प्रकरणांची मालिका; वडाळ्यात पत्नीला संपवलं, अँटॉप हिलमध्ये २४ वर्षीय तरुणाची बॉडी सापडली

मुंबई–गोवा महामार्गावर भीषण अपघात

दरम्यान, काल पेण तालुक्यातील आंबिवली गाव हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताने पुन्हा एकदा बेदरकार वाहनचालकांचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. अतिवेग, निष्काळजीपणा आणि नियंत्रण सुटलेले वाहन यांचा संगम झाल्याने एका निष्पाप तरुणाला आपला जीव गमवावा लागला. गुढीपाडव्याच्या दिवशीच काळाने झडप घालत या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Maharashtra TimesNeeraj Jadhav : अशोक खरात प्रकरण; सगळं कांड ज्याच्यामुळे उघड, त्या ‘मास्टरमाइंड’ नीरज जाधवचा फोटो समोर

दि. १८ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे १.४५ वाजण्याच्या सुमारास आंबिवली गावाच्या हद्दीत नवीन साई सहारा हॉटेलसमोर हा अपघात घडला. अक्षत बाबूलाल राठोर (वय ३५, रा. जेएनपीटी टाउनशिप, उरण) हा त्याच्या ताब्यातील एक्सएल ६ कारने पेणहून पनवेलकडे जात असताना अतिवेगात वळण घेत होता. वेगावर नियंत्रण सुटल्याने त्याने निष्काळजीपणे वाहन चालवत उजव्या बाजूने जाणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीस्वार शुभम देविदास पाटील (वय २७, रा. आंबिवली, ता. पेण) गंभीर जखमी झाला.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा