Headlines

Mukesh Khanna : ‘फक्त भक्तांनाच नाही, तर देवालाही लुटतायत’, अयोध्या राम मंदिरातील देणगी घोटाळ्यावर मुकेश खन्ना यांचा संताप


Mukesh Khanna Post : अयोध्या राम मंदिरातील देणगी घोटाळ्याचा खुलासा झाल्यानं लोक थक्क झाले आहेत. आता मुकेश खन्ना यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Mukesh Khanna On Ayodhya Ram Mandir Donation Scam
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – अयोध्या राम मंदिराच्या एसआयटी तपासात एक मोठा खुलासा झाला असून, राम मंदिरातील देणगी घोटाळ्याचा पर्दाफाश झाला आहे. यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. मंदिरातील देणगीच्या नावाखाली झालेल्या या घोटाळ्याचा सर्वांनी संताप व्यक्त करत निषेध केला आहे. यानंतर, उत्तर प्रदेश सरकार आणि पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) यांनी तातडीनं कारवाई सुरू केली आहे. ‘शक्तीमान’ फेम मुकेश खन्ना यांनीही या वादावर प्रतिक्रिया देत जनतेला एक महत्त्वपूर्ण आवाहन केलं आहे.

मुकेश खन्ना यांचं जनतेला आवाहन

मुकेश खन्ना यांनी राम मंदिर घोटाळ्यासंदर्भात इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी लिहिलं की, ‘तुम्हाला माहित आहे का, मंदिरांमध्ये तुम्ही दिलेली रोख देणगी देवापर्यंत पोहोचतच नाही. ती मध्येच कुठेतरी गायब होते. सगळीकडे लूटमार सुरू आहे. ‘लूट सको तो लूट लो’ अशी एक म्हण आहे आणि लूटणारे लोक इथे मोठ्या प्रमाणात आहेत. मी एकदा म्हटलेलं, ‘भरे पड़े हैं चोर, डाकू और बेईमान, फिर भी मेरा देश है महान.’ पण देणगी लुटणाऱ्या या लोकांना मी कोणतं नाव देऊ? चोर, डाकू की बेईमान? यापैकी काहीच नाही, कारण हे लोक या सगळ्याच्या पलीकडचे आहेत.’

मुकेश खन्ना यांचा सल्ला

‘हे फक्त भक्तांनाच नाही, तर देवालाही लुटत आहेत. मी भक्तांना एवढाच सल्ला देईन की, तुम्ही देणगी देणं बंद केलं, तर घोटाळाही होणार नाही. त्यामुळे मंदिरांमध्ये देणगी, खासकरून पैसे आणि दागिने अर्पण करणं बंद करा. यातच देवाला आनंद होईल.’ असंही मुकेश यांनी पुढे म्हटलंय.
Maharashtra TimesGirija Oak : ‘आता आम्ही फार संपर्कात नाही, त्यांचंही कुटुंब आहे’, वडील गिरीश ओक यांच्याबद्दल गिरिजा ओकचं वक्तव्य
दरम्यान, संपूर्ण अयोध्या राम मंदिर नैवेद्य घोटाळ्यासंदर्भात, एसआयटीनं अलीकडेच १५ पानी अहवाल सादर केला आहे, ज्यात धक्कादायक खुलासे झाले आहेत. गेल्या ४० दिवसांत ७० वेळा देणगी चोरीला गेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस छाप्यांमध्ये आतापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा