![]()
अयोध्या श्रीराम मंदिरात देणगीच्या कथित चोरीप्रकरणी पोलिस व प्रशासनाच्या पथकाने रविवारी सकाळी सात वाजता एफआयआरमध्ये नाव असलेल्या सर्व ८ आरोपींच्या घरांवर एकाच वेळी छापा टाकला. झडतीदरम्यान इलेक्ट्रॉनिक उपकरणे, कागदपत्रे व इतर पुरावे गोळा केले. कुटुंबीय व शेजाऱ्यांचीही चौकशी केली.
आरोपींकडून ~७९.८५ लाख रुपयांची रोकड यापूर्वीच जप्त केली आहे. सोमवारी पोलिस आरोपींना न्यायालयात हजर करून कोठडीची मागणी करतील, जेणेकरून चोरीची एकूण रक्कम, बँक खाती, स्थावर-जंगम मालमत्ता व संपूर्ण नेटवर्कचा तपास करता येईल. राजकीय संघर्ष… भाजप व विरोधक आमने-सामने
योगी आदित्यनाथ: काही लोक अयोध्या व सनातन श्रद्धेला बदनाम करत आहेत. अखिलेश यादव यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी कृष्ण जन्मभूमी मुक्ती आंदोलनाला पाठिंबा द्यावा. अखिलेश यादव: मुख्यमंत्री सर्वाधिक वेळा अयोध्येत गेले तरीही चोरीचा पत्ता लागला नाही. नेशन फर्स्ट म्हणणाऱ्यांसाठी डोनेशन फर्स्ट झाले आहे. उद्धव ठाकरे: संपूर्ण ट्रस्टची जबाबदारी निश्चित केली पाहिजे.
Source link
राम मंदिर देणगी चोरी…:सर्व 8 आरोपींच्या घरांवर छापे, कागदपत्रांसह इतर पुरावे जप्त; आरोपींना आज कोठडी मागणार
