Mrunal Dusanis Fight With Husband Neeraj More Front Of Mother In Law ; Mrunal Dusanis On Mother In Law ; पूर्वी आम्ही रूमध्ये जाऊन भांडायचो आता आईंसमोरच भांडतो! मृणाल दुसानिसने सासूबाईंबद्दल सर्वकाही सांगितलं
Mrunal Dusanis Fight With Husband Neeraj More Front Of Mother In Law ; Mrunal Dusanis On Mother In Law ; पूर्वी आम्ही रूमध्ये जाऊन भांडायचो आता आईंसमोरच भांडतो! मृणाल दुसानिसने सासूबाईंबद्दल सर्वकाही सांगितलं
Mrunal Dusanis On Family Bonding : मृणाल दुसानिस काही वर्षांपूर्वीच पुन्हा एकदा भारतात स्थायिक झाली. इथे आल्यावर ती पुन्हा एकदा झपाट्याने कामाला लागलीय पण हे सर्व तिच्या सासूबाईंमुळे शक्य झाल्याचं तिने सांगितलं.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
आई वडील हे जर कामावर जाणारे असले तर मुलांना कुठे ठेवायचं म्हणजे ते सुरक्षित राहतील असा प्रश्न नेहमी उद्भवतो. कारण आपण काम करत असताना आपल्या माघारी मुलांवर उत्तम संस्कार व त्यांची उत्तम जडणघडण होणे सुद्धा महत्त्वाचं असतं. बरेचदा पर्याय नसल्यामुळे पाळणाघरासारखे पर्याय निवडावे लागतात मात्र बहुतांशवेळी आजी आजोबा आपल्या नातवंडांचा सांभाळ करण्यासाठी पुढे येतात. त्यांच्या छत्रछायेखाली किंवा संस्कारात मुलं अगदी नीट वाढतात. त्यामुळेच आई-वडील अगदी निर्धास्त होऊन आपलं करियर सांभाळत असतात.
फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणारे कलाकार हे बरेचदा त्यांच्या कामाच्या वेळापत्रकामुळे कुटुंबासोबत फारसा वेळ घालवू शकत नाहीत. आत्ताच्या मालिका विश्वात रोज लागणाऱ्या सीरीयल या 7 ही दिवस टेलिकास्ट होतात त्यामुळे कलाकारांनाही उसंत असा मिळत नाही. बरेच कलाकार आपल्या मुलांना पाळण्या़घरात तर काहीजण आपल्या आई-वडिलांकडे ठेवतात. अभिनेत्री मृणाल दुसानिस ही काही वर्षांपूर्वी आपल्या मायदेशी परतली. प्रेग्नेंसीच्या काळात काही वर्ष अमेरिकेत स्थायिक झाल्यानंतर पुन्हा भारतात येऊन काम करणं, शिवाय मुलीसाठी देश नवीन असल्यामुळे तिला त्यात नीट स्थिरस्थावर करणं हे सुद्धा महत्त्वाचं होतं. पण अशावेळी मृणालच्या मदतीला तिच्या सासूबाई धावून आल्या. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मृणाल दुसानिसने त्यांच्या नात्याबद्दल सांगितले आहे.
मृणाल म्हणाली की, मी आणि नीरज जे काही काम करू शकतोय ते फक्त आणि फक्त आमच्या आईंमुळे करू शकतो. त्या आहेत म्हणूनच आम्ही घराबाहेर पडू शकतो. त्या असल्याने आम्ही इतके रिलॅक्स असतो की सगळं काही त्यांच्यावरच सोडून देतो. त्या सुद्धा काहीच तक्रार करत नाही. खरंतर त्या 65 वर्षांच्या आहेत, त्या सुद्धा थकल्या आहेत पण तरीही सगळं काही बघतात. नूर्वी आणि तिच्या आजीचा एक वेगळा बॉण्ड आहे. त्या असल्यामुळेच आम्ही आमचं करिअर करू शकतो. आम्हा दोघांनाही वाटतं की घरात आजी आजोबा असणं गरजेचं आहे त्यामुळे खूप फरक पडतो आणि आम्हाला तो जाणवतो सुद्धा.
आम्ही नसलो तरीही आमची मुलगी छान खाते पिते, तिची आजी तिला घड्याळ शिकवते, एक रुपया दोन रुपया कसे ओळखायचे हे सगळं शिकवणं चाललेलं असतं. आता नूर्वीला कळतं की आई शूटिंगला जाते त्यामुळे जे टीव्हीवर दाखवतात ते खोटं असतं. बाबा रेस्टॉरंट बघताय त्यामुळे तेही बिझी असतात. दोघांना यायला वेळ लागतो. आम्ही झोपलेलो जरी असलो तरी ती आईंना सांगते की आई-बाबांना झोपू देत… मला माझ्या सासूबाईंमुळे मुलीला डे केअर मध्ये ठेवावं लागत नाही.
नवरा बायकोच्या नात्याबद्दल सांगताना मृणाल म्हणाली की, हल्ली मीच नीरजची तक्रार आईंकडे करते की आई बघा हा कसा वागतोय आणि मग त्या आमची भांडणं बघून हसतात. आमची छोटी मोठी भांडण त्यांच्यासमोरच होतात. आधी आम्ही रूम मध्ये भांडायचो पण आता आम्ही त्यांच्यासमोरच भांडायला लागलो आहे. हे सगळं मजे मजेत चालू असतं…. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मृणाल या गोष्टी सांगितल्या.
लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले.
लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या.
करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला.
त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे.
शैक्षणिक माहिती
आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.… आणखी वाचा