Headlines

Mira Road Beverly Park RBK School Five Young Girl Rescued from Immoral Activities at Spa Center; स्पा सेंटरच्या नावाखाली अनैतिक प्रकार, शाळेसमोरच संतापजनक कृत्य; पोलिसांकडून मोठ्या घटनेचा पर्दाफाश


Mira Road Crime News : ज्या स्पा सेंटरवर ही कारवाई करण्यात आली ते शहरातील आरबीके शाळेसमोरच असल्यानं शैक्षणिक संस्थेजवळ अशा प्रकारचे कथित अवैध प्रकार सुरू असल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

Mira Road Spa Center Raid
मिरा रोड बेव्हर्ली पार्क रोड स्पा सेंटर तरुणींची सुटका(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
ठाणे : मिरा रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका स्पा सेंटरवर पोलिसांनी काल सोमवारी दुपारी छापा टाकून स्पाच्या आड सुरू असलेल्या कथित देहव्यापाराचा पर्दाफाश केला. या कारवाईत पाच तरुणींची सुटका करण्यात आली असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

शोळासमोरच संतापजनक कृत्य

पोलिसांना बेव्हर्ली पार्क रोड, आरबीके शाळेसमोरील A.N.K. Luxury Salon & Spa येथे स्पाच्या नावाखाली कथित देहव्यापार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार माहितीची खातरजमा करून सहाय्यक पोलीस आयुक्त गणपत पिंगळे यांच्या पथकानं स्पा सेंटरवर छापा टाकला. कारवाईदरम्यान स्पा सेंटरमधून पाच तरुणींची सुटका करण्यात आली. स्पाच्या आड कथित देहव्यापार चालविल्याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
Maharashtra TimesPune News : लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक, महिलेचा सभेत स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न, जि.प. सदस्यावर गंभीर आरोप; पुण्यात काय घडलं?

इतर बाबींचीही चौकशी सुरू

धक्कादायक म्हणजे ज्या स्पा सेंटरवर ही कारवाई करण्यात आली ते शहरातील आरबीके शाळेसमोरच असल्यानं शैक्षणिक संस्थेजवळ अशा प्रकारचे कथित अवैध प्रकार सुरू असल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल केला असून स्पा सेंटरचा परवाना, कागदपत्रे आणि या व्यवसायाशी संबंधित इतर बाबींचीही चौकशी सुरू आहे. तसेच या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग आढळल्यास त्यांनाही अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

रमेश म्हात्रेंची कोर्टाकडे विनवणी

कल्याण डोंबिवली महापालिकेचे वादग्रस्त नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी मुंबई हायकोर्टात जामीन मिळावा यासाठी अक्षरश: विनवणी केल्याची माहिती समोर येत आहे. रमेश म्हात्रे यांच्याकडून वारंवार जामीनासाठी अर्ज करण्यात आला आहे. याआधी झालेल्या सुनावणीवेळी हायकोर्टाने रमेश म्हात्रे यांच्या वकिलांना खडेबोल सुनावले होते. ‘रमेश म्हात्रे 25 वर्षाचा तरुण असल्यासारखं डॉक्टरांना मारहाण करतानाच्या व्हिडीओत भासतात. त्यांनी महिलांनाही मारहाण केली. त्यामुळे त्यांना काही दिवस कोठडीत राहू द्या’, असं हायकोर्टाने म्हटलं होतं. यानंतर काल पुन्हा या प्रकरणावर सुनावणी पार पडली. यावेळी रमेश म्हात्रे यांनी जामिनासाठी हायकोर्टाकडे विनवणी केली.
Maharashtra TimesAmravati Student Food Poisoning: सेंट्रल किचन रडारवर! विषबाधेनंतर मेळघाटातील टेंभली केंद्र तात्पुरते बंद, मालकासह 6 जणांवर गुन्हे
‘माझे वय पाहता मला जामीन मंजूर करावा, हवं तर महाराष्ट्राबाहेरच राहायचं, यासह कठोर अटी घालाव्यात’, अशी विनंती न्यायालयीन कोठडीमुळे तुरुंगात असलेले नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी वकिलांमार्फत हायकोर्टाला केली. मात्र, इंडियन मेडिकल असोसिएशनची बाजू मांडण्यासाठी त्यांचे वकील वैयक्तिक कारणामुळे कोर्टात उपस्थित नसल्याने हायकोर्टानं त्या विनंतीबाबत कोणताही अंतरिम दिलासा दिला नाही. हायकोर्टानं आता पुढील सुनावणी शुक्रवारी 31 जुलै दुपारी होणार आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा