Headlines

Milk Testing: भेसळयुक्त दूध कसे ओळखावे? घरच्या घरी तपासा दूधाची शुद्धता, पाहा खास टिप्स – how to check purity of adulterated milk at home ready tips


शर्मिला कलगुटकर,मुंबई : ‘दुधाने तोंड पोळले की ताकही फुंकून प्यावे’ अशी म्हण असली तरी सध्या दररोज दूधभेसळीचे प्रकार उघडकीस येत असल्यामुळे आपल्या घरी येणारे दूध काळजीपूर्वक तपासण्याची वेळ आली आहे. दूध हा सर्वाधिक पोषणमूल्य असलेला अन्नघटक आहे.

राज्याच्या कानाकोपऱ्यांमध्ये अन्न व औषध प्रशासनाने दूधभेसळीविरोधात धडक कारवाया सुरू केल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये चिंता वाढली आहे. त्यामुळे आपल्या घरात येणाऱ्या या दुधाची गुणवत्ता उत्तम आहे, हे ओळखायचे कसे, असा प्रश्न अनेकांसमोर आहे. मात्र घरगुती साध्या चाचण्यांनीही प्राथमिक स्तरावर दूधामध्ये भेसळ आहे का, हे ओळखता येणे शक्य असते.

Maharashtra TimesFarmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफी योजनेत मोठा बदल; शेतकऱ्यांना 50 हजारांऐवजी 2 लाखांपर्यंत सूट, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
कशी ओळखाल दूधातील भेसळ?
दूधात पाणी मिसळले आहे का?

काचेच्या ताटलीवर किंवा स्लाइडवर १–२ मि.ली. दूध उभ्या पद्धतीने सोडा.
शुद्ध दूध : हळूहळू वाहते आणि पांढरी रेघ मागे राहते.
भेसळयुक्त दूध : पटकन वाहते, मागे पांढरी रेघ राहत नाही.

फॉरमॅलिनची भेसळ
दहा मिली दुधात पाच मिली सल्फ्युरिक ॲसिड हळुहळू सोडावे. जांभळ्या रंगाची रिंग तयार होऊन दोन थरांत दिसल्यास त्यात भेसळ असल्याचे समजावे.

दुधात डिटर्जंट आहे का?
५–१० मि.ली. दूध बाटलीत किंवा पारदर्शक भांड्यात घेऊन जोरात हलवा. शुद्ध दूध असेल तर फेस तयार होत नाही. भेसळयुक्त दूध असेल तर भरपूर फेस तयार होतो.

Maharashtra TimesOmraje Nimbalkar : शिवसेना प्रवेशानंतर खा. ओमराजे निंबाळकर अ‍ॅक्शन मोडमध्ये, एकनाथ शिंदेंकडे मोठ्या मागण्या
पीठभेसळ
दुधात काही थेंब टिंक्चर आयोडिन किंवा आयोडिन द्रावण टाकावे. निळा रंग आल्यास स्टार्च किंवा पीठाची भेसळ केल्याचे दिसेल. जर दूध शुद्ध असेल तर आयोडिन टाकल्यानंतर त्यात कोणताही बदल होत नाही.

कृत्रिम दूध असे ओळखा
-पाण्यामध्ये युरिया, स्कीम मिल्क पावडकर, कॉस्टिक सोडा मिसळून कृत्रिम दूध तयार केले जाते. त्याला फेस अधिक येतो आणि हे दूध द्रवरूप साबणासारखे दिसते. या दुधाची चव कडू असते. तापवल्यानंतर त्याचा रंग बदलून तो पिवळा होतो.
-युरिया चाचणी : कपभर दुधामध्ये तितकीच सोयाबिन पावडर घालून त्यात लिटमस पेपर एक मिनिट ठेवावा. लाल रंगाचा लिटमस पेपर निळा झाल्यास तसेच, दूध व सोडा द्रावण एकत्र केल्यानंतर अमोनियासारखा तीव्र वास आल्यास त्यात युरिया असल्याची शक्यता असते.

Maharashtra TimesEl Nino वेगाने सक्रिय, कमी पावसाचा अंदाज असताना धो-धो बरसला; हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट
वासावरून परीक्षा
शुद्ध दुधाचा वास गोडसर असतो तर भेसळयुक्त दुधाला रसायनासारखा वास येतो. हा वास घेताच झिणझिण्या आल्यासारख्या वाटतात.

आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम
भेसळयुक्त दुधाचे सेवन केल्यामुळे तीव्र स्वरूपाची पोटदुखी, डोकेदुखी, मूत्रपिंडाशे निगडित आजार, यकृताच्या समस्या, त्वचाविकार यांसारखा त्रास उद्भवू शकतो, याकडे फिजिशिअन डॉ. व्ही. एन. मोरे लक्ष वेधले. अशा दुधाच्या सेवनामुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. फॉर्मेलिनसारख्या रसायनांचा समावेश असलेल्या दुधाचे सेवन केल्यास आरोग्याला धोका निर्माण होतो. युरियाची भेसळ असेल तर मूत्रपिंड आणि यकृताव ताण वाढते. अति पाणी मिसळल्यामुळे जंतुसंसगांचा धोका वाढतो. या दुधाचे सेवन लहान बाळांनी केल्यास त्यांची प्रकृती लगेच बिघडू शकते. भेसळ हो तीव्र असल्याची शंका असल्यास लगेच एफडीएला कळवावे, असे अन्न विश्लेषक शोला गवळी यांनी सांगितले.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत