Headlines

Milind Pathak : ‘रील स्टार्सना सिनेमाच्या प्रमोशनसाठी बोलावतात, ज्यांनी सिनेमा बनवला त्यांच्या कष्टाला किंमत नाही’, मराठी अभिनेत्याचं बेधडक वक्तव्य


Milind Pathak On Social Media Influencers : मराठी अभिनेते मिलिंद पाठक यांनी सोशल मीडिया इन्फ्लूएन्सरबद्दल भाष्य केलं आहे.

Milind Pathak On Instagram Reel Stars And Social Media Influencers
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – आजकाल कलाकारांना सोशल मीडियावरील फॉलोअर्स मधून सिनेमात किंवा मालिकांमध्ये कास्ट केलं जातं. अनेक कलाकारांना अत्यंत वाईट अनुभवसुद्धा आले आहेत. प्राजक्ता देशमुख, सचिन देशपांडे, गार्गी फुले यांसारख्या कलाकारांनी यावर संताप व्यक्त केलाय. अशातच आता मराठी अभिनेते मिलिंद पाठक यांनीही रील्स स्टार्सबद्दल भाष्य केलं आहे.

मुलाखतीदरम्यान मिलिंद पाठक म्हणाले की, ‘पूर्वी ज्या जिवंत अभिनयाची, चांगलं काम बघण्याची लोकांची इच्छा होती, ती आता कमी झाली आहे, असं मला वाटतं. आता सगळं २ मिनिटांचं झालेलं आहे. त्यामुळे २ मिनिटांमध्ये जर तुम्ही लक्ष वेधलं नाही, तर मग तुम्ही बाहेर होता. सिनेमा जरी असेल, तरी त्याचे २-२ मिनिटांचे व्हिडिओ शेअर करून प्रसिद्धी मिळवायची.’
Maharashtra TimesVijay Varma : ‘त्याने मला चुकीचा स्पर्श केला, खूप किळसवाणं वाटलं’, विजय वर्मानं सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरबद्दल काय म्हणाले मिलिंद पाठक?

‘सिनेमाच्या प्रीमिअरला इन्स्टाग्रामचे लोकप्रिय चेहरे किंवा युट्युबर्सना बोलावलं जातं. त्यांच्याकडून बाईट्स घेतले जातात आणि ते पोस्ट केले जातात. ते लोक सिनेमा बघत नाहीत. ते फक्त येतात, त्यांना सिनेमा कशाबद्दल आहे हे सांगितलं जातं. त्याआधारे ते फक्त बाईट देतात. त्यानंतर कलाकारांचे त्यांच्यासोबत फोटो काढले जातात, ते प्रमोशनसाठी वापरले जातात, एवढंच असतं. हे लोक सांगतात म्हणून प्रेक्षकांनी जर सिनेमा बघायचा असेल तर ज्यांनी कष्टानं सिनेमा बनवलाय, त्यांच्या कष्टाला किंमतच नाहीये. कोणीतरी १ मिलियन फॉलोअर्स असणारा सांगतोय म्हणून आपण सिनेमा जाऊन बघणार, ह्याला काही अर्थ नाहीये.’

Celebrity Corner : प्रशांत दामलेंसह ‘शिकायला गेलो एक’ नाटकाच्या कलाकारांसोबत गप्पा

‘पूर्वी सिनेमाची कथा, दिग्दर्शक, अभिनेता हे सगळं बघायचो. आता हा खेळ आहे, त्यामुळे तो खेळावाच लागतो. म्हणून, मीसुद्धा पोस्टिंग करतो. जे मला योग्य वाटतं, तेच मी पोस्ट करतो. फॉलोअर्स बघून काम मिळणं, माझ्यासाठी नाहीये. माझी आधीची कामं बघून मला पुढची कामं मिळतात.’ असं मिलिंद यांनी शेवटी सांगितलं. ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मिलिंद पाठक बोलत होते.
Maharashtra TimesAjinkya Deo : ‘रामायण’मध्ये अरुण गोविल नाही तर ‘हा’ मराठी अभिनेता साकारणार होता राजा दशरथाची भूमिका, स्वतःच केला खुलासा
दरम्यान, मिलिंद पाठक यांच्या कामाबद्दल सांगायचं तर त्यांनी ‘बडे अच्छे लगते है’, ‘तुझसे है राबता’, ‘तुला जपणार आहे’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा