MHT CET Scam Row: Viral Calls 12 ते 15 लाख देऊन Top Govt Engineering College मध्ये Admission ची हमी – mht cet scam viral recording 12 14 lakh for govt college
MHT CET Scam Row: Viral Calls 12 ते 15 लाख देऊन Top Govt Engineering College मध्ये Admission ची हमी – mht cet scam viral recording 12 14 lakh for govt college
#MaharashtraCET #CETControversy #CETCommissioner #CETScandal #CETResult #EngineeringAdmissionMHT सीईटी परीक्षेसाठी १२ ते १४ लाख रुपये द्या आणि नामवंत शासकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवा. असं जर तुम्हाला कुणी सांगितलं तर; कारण मार्क्स आम्ही मिळवून देऊ असं थेट आश्वासन देण्यात येतंय. महत्त्वाचं म्हणजे हे घडतंय कुठे तर आपल्याच महाराष्ट्रात. महाराष्ट्रात MHT सीईटी परीक्षेत घोटळा झाल्याचा संशय आणि आरोप करण्यात येतोय. याला कारण ठरल्यात सोशल मीडियात व्हायरल झालेल्या कॉल रेकॉर्डिंग. कारण व्हायरल झालेल्या कॉल रेकॉर्डिंगमधून काही खासगी व्यक्ती विद्यार्थ्यांच्या पालकांना तुम्ही जर १२ ते १४ लाख रुपये दिले तर आमच्या सोयीच्या सेंटरवरून तुमच्या मुलांचे नामवंत शासकीय महाविद्यालयात प्रवेश होतील एव्हढे मार्क्स मिळवून देऊ असे थेट आश्वासन देण्यात आलेय. त्यामुळं CET परीक्षा देत असताना अशा प्रकारे सेंटर निवडण्याचा चॉईस मुलांना निवडता येतो का यावरून प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बारावीनंतर खऱ्या अर्थानं मुलांच्या भविष्याची आणि आयुष्याची सुरूवात होत असताना त्याच्याशी कुणी खेळ करतंय का, १० ते १५ लाखांमध्ये नामवंत शासकीय महाविद्यालयात प्रवेश घेणे कितपत शक्य आहे, त्यासंदर्भात व्हायरल झालेल्या कॉल रेकॉर्जिंग्जमधील व्यक्ती काय म्हणताय आणि सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी याचं खंडन करताना कोणती महत्त्वाची माहिती दिलीय ते पाहूयात.Pay ₹12-14 lakh and get admission in a top government engineering college through MHT CET — this is the promise being made to parents in Maharashtra. Viral call recordings show private individuals assuring parents that for this amount, they will arrange a favourable exam centre and ensure high enough marks for prestigious government college seats. This has raised serious questions about whether centre selection is possible in CET and whether students’ futures are being compromised. CET Cell Commissioner Dilip Sardesai has strongly denied the allegations.