Headlines

mazi ladki bahin yojana 710 mens fake applications in nandurbar ; लाडकी बहीण योजनेत 710 पुरुषांचे अर्ज; एका चुकीने बिंग फुटलं, नंदुरबार जिल्ह्यातील प्रकार


Ladki Bahin Yojana: नंदुरबार जिल्ह्यात लाडकी बहिण योजनेत मोठी फसवणूक उघडकीस आली आहे. तब्बल ७१० पुरुष या योजनेचा लाभ घेत होते. कसं फुटलं बिंग?

ladki bahin yojana
ladki bahin yojana(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा. वृत्तसेवा, धुळे: नंदुरबार जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणावर अपात्र लाभार्थी आढळून आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.

जिल्ह्यात एकूण चार लाख २२ हजार ७५८ लाभार्थी नोंदणीकृत असताना, पात्रता व अपात्रता निकषांच्या पडताळणीनंतर ३७ हजार ११५ लाभार्थ्यांचे डिसेंबर महिन्यापासून हप्ते थकीत असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे जिल्हाभरात ७१० पुरुषांचे अर्ज या योजनेत आढळून आले आहेत. यामुळे अर्ज प्रक्रियेतील त्रुटी व पडताळणी यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या योजनेत ६५ वर्षांवरील चार हजार ८३ लाभार्थी, घरातील सदस्य शासकीय नोकरीत असलेले तब्बल ३० हजार २७१ लाभार्थी, तसेच ई-केवायसी मध्ये वय २१ वर्षांखाली दर्शविण्यात आलेले दोन हजार ५१ लाभार्थी आढळून आले आहेत. या सर्व गटांचा एकत्रित आकडा ३७ हजार ११५ इतका असून, या लाभार्थ्यांना सध्या योजनेचा लाभ थांबविण्यात आला आहे.

Maharashtra Timesbuldhana Accident: सासुरवाडीवरुन घरी परतताना काळाचा घात; जावयाचा दुर्दैवी मृत्यू, कुटुंबावर दु:खाचा डोंगर
दरम्यान, केवायसी करताना तांत्रिक त्रुटी किंवा चुकून चुकीची माहिती भरली गेली असण्याची शक्यताही प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या आकड्यांवर अंतिम निर्णय घेण्यापूर्वी सखोल पडताळणी केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, अपात्र लाभार्थ्यांमुळे खऱ्या गरजू महिलांना योजनेचा लाभ वेळेवर मिळतो की नाही, याकडे लक्ष देण्याची गरज असून, भविष्यात अशा त्रुटी टाळण्यासाठी अर्ज व पडताळणी प्रक्रियेत अधिक काटेकोर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

Maharashtra TimesYavatmal News: पाकिस्तानच्या देशभक्ती गीतावर नृत्य? यवतमाळच्या शाळेतील घटनेची भाजपकडून तक्रार
केवायसी प्रक्रियेदरम्यान काही त्रुटी झाल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या समोर आलेले आकडे प्राथमिक स्वरूपाचे आहेत. अंतिम पडताळणी झाल्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होईल. –संजय पाटील, प्रभारी जिल्हा व बालकल्याण अधिकारी, नंदुरबार

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा