नोएल टाटा यांची लेक, माया टाटा – यांच्यावर वेस्टसाइडच्या डिजिटल आणि ऑनलाइन रिटेल कामकाजाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपवली जाणार असून त्यांच्या डिजिटल अनुभवामुळे वेस्टसाइडला विकासाचा पुढील टप्पा आणि आंतरराष्ट्रीय विस्तार साधण्यास मदत होईल, अशी कंपनीला आशा आहे.
माया टाटांना मिळणार नवीन जबाबदारी
इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार माया टाटा आता Trent लिमिटेडच्या प्रमुख ब्रँड – वेस्टसाइडच्या – परदेशातील ई-कॉमर्स मार्केटिंगची जबाबदारी सांभाळतील, तर याआधी टाटा डिजिटलमध्ये जबाबदारी हाताळलेली. माया टाटा कंपनीच्या ऑनलाइन रिटेल व्यवसायाचा विस्तार करण्यावर लक्ष केंद्रित करतील अशी अपेक्षा आहे.
जून 2026 मध्ये माया टाटा समूहाचा डिजिटल व्यवसाय – टाटा डिजिटल – मध्ये रुजू झालेल्या, पण कंपनीला मोठे नुकसान झाल्यानंतर पदावरून पायउतार झाल्या. याबाबत अनेक माध्यमांमध्ये बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या, तर आता त्याच डिजिटल अनुभवाचा उपयोग वेस्टसाइडचा ऑनलाइन व्यवसाय आणि ग्राहक अनुभव सुधारण्यासाठी केला जाईल.
माया टाटांकडे अनेक अनुभव
टाटा डिजिटलमध्ये रुजू होण्यापूर्वी माया टाटा यांनी टाटा कॅपिटलमध्येही महत्त्वाच्या पदांवर काम केले. टाटा अपॉर्च्युनिटी फंडमध्ये पोर्टफोलिओ व्यवस्थापन आणि इन्व्हेस्टर रिलेशन्सचे काम हाताळले तर, नंतर टाटा Neu ॲपच्या लाँचमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.
सध्या नोएल टाटा Trent चे अध्यक्ष आहेत, तर त्यांचा मुलगा Neville टाटा कंपनीच्या हायपरमार्केट व्यवसायाची देखरेख करतात. वेस्टसाइडचा ट्रेंटच्या एकूण महसुलात अंदाजे 40% वाटा असून कंपनी आता आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवसाय अधिक मजबूत करण्याची तयारी करत आहे ज्याचा भाग म्हणून डिजिटल मार्केटिंग आणि ग्राहक प्रतिबद्धता वाढवण्याची ही नवीन जबाबदारी माया टाटांना दिली गेली आहे.
कोण आहेत माया टाटा ?
नोएल टाटांच्या तीन मुलांपैकी माया टाटा सर्वात धाकट्या आहेत. मोठी बहीण, Leah टाटा, टाटा ग्रुपच्या हॉटेल व्यवसाय, इंडियन हॉटेल्सच्या उपाध्यक्ष तर, भाऊ नेव्हिल नेव्हिल टाटा, ट्रेंट आणि स्टार बाजारच्या रिटेल व्यवसायांचे काम पाहतात.
1989 मध्ये मुंबईत माया टाटा यांचा जन्म झाला. वॉर्विक विद्यापीठातून पदवी घेतली आणि त्यानंतर बेज बिझनेस स्कूलमध्ये व्यवसाय व्यवस्थापनाचे शिक्षण पूर्ण केले. फायनान्स, गुंतवणूक आणि व्यवसाय धोरण या विषयांवर त्यांची मजबूत पकड असल्याचे मानले जाते.
याशिवाय टाटा एज्युकेशन ट्रस्ट, आर. डी. टाटा ट्रस्ट, जे. आर. डी. आणि थेल्मा जे. टाटा ट्रस्ट आणि टाटा मेडिकल सेंटर ट्रस्ट यांच्या संचालक मंडळावरही माया टाटांनी जाबाबदारी पार पाडली आहे. अशाप्रकारे, आता वेस्टसाइडच्या डिजिटल आणि आंतरराष्ट्रीय विस्ताराला त्या कशाप्रकारे दिशा देतील, याकडे सर्वांचे लक्ष त्यांच्या नव्या भूमिकेकडे लागून असेल.
झपाट्याने वाढतोय वेस्टसाइडचा व्यवसाय
इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवलानुसार माया टाटा आता आंतरराष्ट्रीय ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या रिटेल ब्रँड्सच्या विकासावर लक्ष केंद्रित करतील. वेस्टसाइड, Zudio आणि स्टार बाजार चालवणाऱ्या मूळ कंपनी, Trent ने आर्थिक वर्ष 2026 मध्ये अंदाजे 19,700 कोटी रुपयांचा महसूल मिळवला, तर कंपनीने कंपनीने 321 शहरांमध्ये 1,286 स्टोअर्सचे जाळे निर्माण केले.
याशिवाय वेस्टसाइडने अलीकडेच UAE मध्ये देखील कामकाज सुरू केले असून माया टाटा यांच्या नेतृत्वाखाली ब्रँड अधिक डिजिटल ताकद मिळवेल आणि आपली आंतरराष्ट्रीय उपस्थिती वाढवेल, अशी कंपनीला आशा आहे.

